साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी कोळी समाज बांधवांच्या समस्यांबाबत अतिशय संवेदनशीलपणे लवकरच मार्ग काढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आश्वासन दिले. तसेच जळगावला सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने कोळी समाज बांधवांनी उत्साहाच्या भावनेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यवाहीचे स्वागत करत सर्व मान्यवरांना धन्यवाद दिले. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत कोळी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव येथे कोळी समाज बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणस्थळी भेट देऊन ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लवकरच बैठकीचे आयोजन करू, अशी भावना व्यक्त करत प्रयत्न करण्याचे कोळी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता.पाचोरा उच्च न्यायालयाच्या पथकाने पाळधी गावातील जिल्हा परिषद शाळेत भेट देत शाळांमधील भौतिक सुविधांची परिस्थितीची पाहणी करुन तपासणी केली. यावेळी समितीत जळगाव जिल्हा न्यायाधीश एस.एन.राजुरकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाले उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व परिसरात समितीने भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून मुलांसोबत चर्चा केली. यावेळी शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहार, पिण्याचे पाणी, शैक्षणिक ज्ञानाविषयी समितीने मुलांना प्रश्न विचारले. यावेळी गावातील मुलां-मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. ईश्वर चोरडिया, सागर बावस्कर, पोलीस पाटील प्रवीण पाटील उपस्थित होते. यावेळी समितीसमोर शाळेतील समस्याविषयी प्रा.ईश्वर चोरडिया यांनी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मी आधी जळगाव ग्रामीणमधून लढण्याची घोषणा केली होती. तथापि, आता मला मोठे पद मिळाले आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या सारख्या छोट्या माणसाविरूध्द आपण लढणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेना-उबाठा उपनेते तथा धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी यांनी केले. ते जळगावातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्र परिषदेला उबाठाचे गुलाबराव वाघ, विष्णु भंगाळे, शरद तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अकरा दिवसांपासून जळगावात कोळी समाज बांधवांचे उपोषण सुरु आहे. तेथे अद्यापही एका अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. उपोषणस्थळी दोन मंत्र्यांनी भेट देऊनही खोटे बोलून त्यांना कोळी समाजबांधवांना फसवायचे आहे. अद्यापही न्याय आणि निर्णय दिलेला नाही. त्यामुळे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर येथील सरपंच महेश पांडे यांनी दिलेला शब्द पाळून अडीच वर्षात आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी, २० ऑक्टोबर रोजी सरपंच निवडीवेळी सरपंच पदासाठी पुरुषोत्तम उर्फ बंटी चौधरी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक अध्यक्ष अधिकारी शिवाजीराव गुडगुडे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री.चव्हाण यांनी बंटी चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यापूर्वी अरशद अली यांचीही उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर सरपंच बंटी चौधरी आणि उपसरपंच अरशद अली यांचे कासोदा ग्रामपंचायतमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं.चे सर्व १७ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायतीपासून ते संपूर्ण गावात त्यांची ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात १८ ऑक्टोबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस -मुले व मुली, वेटलिफ्टिंग-मुले व मुली, पॉवर लिफ्टींग- मुले व मुली आणि बॉडीबिल्डिंग- मुले आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. सर्व स्पर्धांसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी एरंडोल विभाग क्रीडा समितीचे सचिव, पंकज महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, अभियांत्रिकी महाविद्यालय…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे तीन हजार ऊस उत्पादकांची १५० रुपये टनप्रमाणे थकीत असलेली उसाची रक्कम आता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ३ कोटी ३० लाख रुपयांची ही रक्कम गुरुवारी चोसाकाच्या बुलढाणा अर्बन बँकेच्या खात्यात जमा झाली आहे. ऐन दसरा, दिवाळीच्या काळातच हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ गोड होणार आहे. चोसाकाकडून देणे बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकेला पाठविण्यात आली आहे. सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळावेत, यासाठी राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी बारामती ॲग्रोचे अध्यक्ष आ. रोहित पवार, उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याशी वेळोवेळी संपर्क…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील घोडगाव नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी. निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्र सरकारची ‘एक राष्ट्र एक विद्यार्थी’ योजनेअंतर्गत अपार ओळखपत्र व विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यासाठी पालक-शिक्षक संघाची सभा नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.पी.चौधरी होते. पालक-शिक्षक संघाचे सचिव एच. बी. मोतीराळे यांनी अपार ओळखपत्राविषयी माहिती दिली. देशातील सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डसारखे एक अपारकार्ड दिले जाणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र ओळख क्रमांक असणार आहे. विद्यार्थ्यांची आतापर्यंतची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रमातील सहभाग, भविष्यातील शैक्षणिक प्रवेश, विविध लाभाच्या शिष्यवृत्तीच्या योजना याची नोंद अपार कार्डमध्ये असणार आहे. अपारकार्डसाठी पालकांची संमती आवश्यक आहे. मुख्याध्यापक आर.पी. चौधरी यांनी फेब्रुवारी- मार्च…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी गायीचा दोर अडकल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात धरणगाव तालुक्यातील साकरे येथील रंजनाबाई धनराज पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वारसांना २ लाख ८६ हजाराची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने विमा कंपनीला नुकताच दिला. सविस्तर असे की, धरणगाव-चोपडा रस्त्यावर ८ डिसेंबर २०१२ रोजी रिक्षा अपघातात रंजनाबाई यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रिक्षा चालक मुरलीधर परबत पाटील याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दुचाकी चालकाने जोरात हॉर्न वाजविला. त्यामुळे बाजूला चरणारी गाय सैरवैर पळताना तिच्या गळ्यातील दोर धावत्या रिक्षात अडकला. रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी झाले. तसेच प्रवासी रंजनाबाई पाटील यांचा मृत्यू झाला, असे तक्रारीत नमुद होते. रिक्षाचा संपूर्ण विमा पॉलिसी…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘माझी माती माझा देश’ संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले आहे. देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यातून देशाप्रती मायभूमीच्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम आहे. तसेच यातून देशभक्तीची उज्ज्वल परंपरा जोपासली जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव पंचायत समितीच्या आवारात ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत अमृत कलशांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविण्यात येत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्री कल्याण, रेल्वे प्रवासी, बस प्रवासी पैदल प्रवासी, छोटे वाहन प्रवासी यांच्या हित आणि हक्कासाठी पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन इंडिया यात्री कल्याण संघाची स्थापना केली आहे. त्यात पत्रकार तथा आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश प्रभारी प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत कदम (चाळीसगाव, जि.जळगाव) यांची यात्री कल्याण संघ भारतच्या पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ तिवारी (गुजरात) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतिश परदेशी (मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत कदम यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.