Author: Sharad Bhalerao

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी नियमितपणे धावण्याचा सराव करतात. रविवारी सर्व महिला धावपटूंनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जांभळा रंगाचा टी शर्ट परिधान करून ९ कि.मी. धावून आपला भक्तिभाव देवीच्या चरणी अर्पण केला. धाव पूर्ण झाल्यानंतर सर्व महिला धावपटूंनी एकत्रितरित्या फोटो काढला. याप्रसंगी डावीकडून अनुक्रमे (उभ्या रांगेत) गुड्डी देवी, मनीषा सिंग, मंजू शुक्ला, सुनीता वाघमारे, मंगला पाटील, डॉ चारुलता पाटील, डॉ निलिमा नेहेते, पुष्पलता चौधरी, संगिता पाटील, कीर्ती मोताळकर, माधुरी चौधरी तसेच खाली बसलेल्या रांगेत डावीकडून अनुक्रमे माया पवार, ज्योती सिंग, ममता ठाकूर, निलांबरी शिंदे, दिपा स्वामी, अर्चना चौधरी, संध्या भोळे व…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव तथा जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका शितल सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, एकलव्यचे मुख्याध्यापक देविदास काळे उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेच्या सचिव साधना महाजन यांना वैष्णवी बेलदार या ११वी सायन्सच्या विद्यार्थिनीने ना. गिरीष महाजन आणि साधना महाजन यांचे स्केच फोटो काढून भेट देण्यात आले. कार्यक्रमात शारदीय उत्सवात विद्यार्थिनींनी विविध देवीच्या रांगोळी, निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत…

Read More

साईमत, पारोळा : प्रतिनिधी क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव अंतर्गत, एरंडोल विभागा क्रीडा समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथे केले होते. स्पर्धेचे उद्घाटन पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक रोहन मोरे, प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, उप-प्राचार्य डॉ. अजय पाटील, एरंडोल विभागाचे सचिव डॉ.विजय पाटील, डॉ.शैलेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील, डॉ.हर्ष सरदार, डॉ. क्रांती वाघ, डॉ. सचिन पाटील, प्रा.जे.बी.सिसोदिया आदी उपस्थित होते. स्पर्धामध्ये कबड्डी खेळात प्रताप महाविद्यालय अमळनेर मुलांचा संघ विजयी तर उपविजेता एन.वाय.एन.सी.महाविद्यालय चाळीसगाव, मुलींमध्ये आर.एन डी. भडगाव महाविद्यालय विजयी तर उपविजेता डी.डी.एस.जी.कॉलेज, चोपडा तसेच आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये प्रताप…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातून अवैधरित्या गुटखा व पानमसाला यांची वाहतूक करणारी कार चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडली आहे. त्यात कार व गुटख्यासह ४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाळीसगाव शहरातून अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पथकाने कारवाई करत कार (क्र.एमएच ४३ एक्स ५२५६) ही अडविली. त्यानंतर तिची चौकशी केल्यावर त्यात १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला मिळून आला. दरम्यान पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२२ मधील प्रलंबित असलेली उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील ५ हजार २०१ शेतकऱ्यांना ४ कोटी ३ लाख ६४ हजार ३८६ रुपये इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यामध्ये कापूस पीकासाठी ५ हजार १६८ शेतकऱ्यांना ४ कोटी १ लाख ९० हजार ९५४ रुपये, उडीद पीकासाठी ९ शेतकऱ्यांना ७७ हजार २२९ रुपये, मूग पिकासाठी २४ शेतकऱ्यांना ९६ हजार २०३ रुपये अशी पीकविमा मदत शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तसेच खरीप हंगाम २०२३ मध्ये पात्र सर्व ५७ हजार पीकविमाधारक शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई…

Read More

साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. असाच एक अनोखा उपक्रम माहेश्वरी महिला मंडळातर्फे जि. प. शाळा कासोदा येथे नवरात्रीनिमित्त कुमारिका(कन्या) पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कासोदा माहेश्वरी समाजाच्या अध्यक्षा साधना मंत्री, जळगाव जिल्हा माहेश्वरी समाजाच्या उपाध्यक्षा सरिता मंत्री उपस्थित होत्या. सुरुवातीला सर्व मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करण्यात आली. त्यांना हळदी कुंकू देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य तसेच विविध भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच भविष्यातही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देण्यात आली. प्रत्येकवेळी माहेश्वरी मंडळ मुलींना सहकार्य करतील, असेही सांगितले.…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेत दोन वर्षांसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली. त्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार दीपक वामनराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पहिली चवथीच्या पालकांमधून ९ सदस्यांची निवड शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दीपक वामन पवार, उपाध्यक्षपदी प्रल्हाद नामदेव चौधरी तर सदस्यांमध्ये प्रकाश शंकर सोनवणे, गजानन सरोदे, विद्या अनिल मेहरे, मंगला भरत लोहार, सोनी जगदीश तेली, लता पुंडलिक भिवसने, जयश्री कृष्णा कोळी यांचा समावेश आहे. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून संध्या पाटील, सचिव तथा मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत, शिक्षणतज्ज्ञ म्हणून दत्तात्रय भोसांडे यांची निवड करण्यात…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी लहान मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून सातत्याने कार्य करणाऱ्या नाट्यरंग थिएटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालनाट्याविषयी आवड जोपासावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‌‘बालनाट्य प्रेक्षकांपर्यंत‌’ उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बालप्रेक्षकांसाठी बालनाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमातंर्गत अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयात ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचे चार प्रयोग सादर झाले. १ हजार ५०० विद्यार्थ्यांनी बालनाट्याचा आनंद लुटला. ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याची निर्मिती नाट्यरंग थिएटर्स जळगाव यांची आहे. अमोल ठाकूर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हे बालनाट्य संस्कारक्षम असून गाठोड्यात लपलेल्या यंत्राद्वारे दोन विद्यार्थी जगण्यातील संस्कारांचे मूल्य बालप्रेक्षकांना समजावून सांगतात. अभ्यासू, जिज्ञासू,…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अल्पवयीन मुलगी ही बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू, ती कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी गावात राहणारा सावन शांताराम भील यानेच पळवून नेल्याची तक्रार पहूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सावन भील याच्या विरोधात…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी, १९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी, २० ऑक्टाबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी, १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. परंतू मुलीबाबत कोणतीही…

Read More