साईमत, अमळनेर : प्रतिनिधी विभागीय स्तरावर कॅरम स्पर्धेतील सहभागी विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी तुषार विजय राठोड याचा संस्थेचे चेअरमन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी आर्मी स्कूलचे प्राचार्य पी.एम.कोळी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के.बी.बाविस्कर, विकास अधिकारी आर.बी.पाटील, क्रीडा शिक्षक व्ही.जी.बोरसे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी बालसाहित्य हे सहज, सोपे वाटत असले तरी ते लिहिणे कठीण काम आहे. बालकांच्या पातळीवर बालसुलभ कथा, कविता लिहिणे म्हणजे मुलांचे भावविश्व फुलविणे. ‘मुलं जमिनीवरची तारे’ बाल-किशोर काव्यसंग्रहाच्या माध्यमातून बालकवी गोविंद पाटील यांनी कवितांमधून मुलांचे भावविश्व फुलविले असल्याचे प्रतिपादन खान्देशातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. येथील भगीरथ विद्यालयात झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. मुलांचे मनोरंजन करणे म्हणजे भगवंताशी नाते जोडणे, असे पू. साने गुरुजी म्हणत. त्या परंपरेशी गोविंद पाटील यांनी नाळ जुळवली असल्याचे प्रा. चौधरी म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सरस्वती पूजन करुन दीपप्रज्ज्वलन केले. प्रास्ताविकेतून काव्यसंग्रहाचे कवी गोविंद पाटील यांनी आपल्या कविता लेखनाचा…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयद्वारा विजयादशमीच्या निमित्त जामनेर रोड येथील साई जीवन सुपर शॉपीच्या समोर ओम प्लाझामध्ये रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत देवींचा सजीव देखावा दाखविण्यात येणार आहे. हा देखावा २४ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राहणार आहे. नागरिकांनी सजीव देवींचा देखावा पाहण्याचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या मुख्य संचालिका सिंधू दीदी यांनी केले आहे. यासाठी ब्रह्मकुमारी ज्योती बहन, कविता बहन, अनिल भाई, नितीन भाई, कुकरेजा भाई, दिलीप भाई, नाना पाटील, ओमशांती केंद्रातील भाई, दीदी सहकार्य करत आहेत.
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्यात अपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांमुळे नियुक्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण पडतो. तसेच शहरासह परिसरातील गावातील कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस ठाण्यातील रिक्त जागांवर त्वरित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. वरणगाव शहराचा दिवसेंदिवस वाढत असलेला नागरी वस्तीचा विस्तार तसेच शहराला लागून असलेल्या २७ खेडेगावातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी वरणगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र, पोलीस ठाण्यात किमान ३३ पोलीस कर्मचारी आवश्यक असतांना केवळ १८ पोलीस कर्मचारी बांधवांना वरणगाव शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळतांना…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी नारी शक्तीचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. नवरात्री उत्सव हा देवीचा जागर असतो. स्त्री शक्तीला आपण देवीच्या रूपात पाहिले पाहिजे, असे विचार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित निष्कलंक धाम वढोदे येथे कुमारिका (कन्या) पूजन विधी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराजांनी परिसरातून सजून धजून आलेल्या शेकडो कुमारिकांचे पाय धुवून पुसून त्यांचे पूजन केले. त्यांना सन्मानपूर्वक स्वादिष्ट भोजन खाऊ घातले. पुरी, भाजी, खीर, पाणीपुरी, ऊसाचा ताजा रस दिला. त्यानंतर प्रत्येकीला भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी एकदंत महाराज, शशिकांत ठोंबरे, संजीव किसन महाजन, फैजपूर येथील पांडुरंग…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्री उत्सवानिमित्त दांडिया सेलिब्रेशन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला प्राचार्य रंजना महाजन आणि प्राचार्य डॉ.किरण खेट्टे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. नवरात्रीनिमित्त मुलांनी गरबा रास खेळून आनंद व्यक्त केला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारतीयांच्या आदिम वस्त्र परंपरेशी नाते सांगत घागरा, लेहेंगा, चोळी, ओढणी आदी लोकप्रिय पोशाख मुलींनी परिधान करत तसेच मुलांनी आपल्या आवडत्या वस्त्र संस्कृती, संस्कृतीचे प्रदर्शन करून नवरात्री उत्सव कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने आनंद घेतला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रवेशक राजश्री लोखंडे, गौरी भिरूड यांनी केले. यावेळी प्रियांका फेगडे यांनी मुलांना नवरात्र…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी वडनेर भोलजी येथे पंधरा ते वीस दिवसांपासून भरकटत असलेला एक मनोरुग्ण व्यक्ती बस स्थानकात आजारी आढळून आला होता. येथून जवळील वडनेर भोलजी येथील पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल संजय निंबोळकर, ना.पो.कॉ. विक्रम राजपूत, ए.पी.आय नागेश जायले यांनी त्याला २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८-३० वाजता पोलीस चौकीचे बिट जमादार संजय निंबोळकर तसेच चौकीचे विक्रम राजपूत यांनी गावातील नागरिकांची मदत घेऊन त्यास बोदवडमधील आत्मनिर्भर फाउंडेशन येथे उपचार व योग्य देखभाल करण्यासाठी दाखल केले आहे. त्या मनोरुग्णाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डी.वाय.एस.पी.देवराम गवळी, नांदुरा पोलीस स्टेशनचे पी.आय. अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर फाउंडेशनला…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी डीजेवर पूर्णपणे बंदी आणून बँड वादकांना लोककलावंताचा दर्जा मिळावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बँड वादकांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अरुण हिवाळे होते. यावेळी बँड मालक महेंद्र वानखेडे, दामोदर सुरळकर, समाधान चंदनशिव, रवींद्र हिवाळे, दीपक पारेकर, बाबुराव तायडे, नाना बोरले, शेख रफीक, सलमान शा, सामाजिक कार्यकर्ते भास्कर आघाम, तुकाराम कसारे, कृष्णा सुरडकर, कृष्णा चंदनशिव, शाम जाधव, दिनेश चंदनशिव आदी बँड वादक उपस्थित होते. डीजेमुळे बँड वादकाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यावर अवलंबून असलेला बँड मालक व सर्व बँड कारागीर यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे आपल्या जवळ असलेल्या चलअचल संपत्तीपेक्षाही किती तरी पटीने मोठी आणि टिकणारी संपत्ती आहे. या संपत्तीद्वारे भविष्यातील येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार होणार आहे. म्हणून तिचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची भावनिक साद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी आरक्षण संरक्षण मेळाव्यात उपस्थित ओबीसी बांधवांना घातली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद रावेर विभागाच्यावतीने २१ ऑक्टोबर रोजी माळी समाज मंगल कार्यालयातील माळी भवन येथ मेळावा झाला. मेळाव्याच्या प्रवेशद्वाराला दिवंगत श्रद्धेय प्रा.हरी नरके यांचे नाव देण्यात आले होते. सुरूवातीला महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काही महिलांना समता परिषदेमध्ये…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी शहरातील चाळीस बिघा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी गदारोळ केला होता. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील आरोही राजेंद्र इंगळे या तीन वर्षीय चिमुकलीची प्रकृती खालावली होती. त्यामुळे चाळीस बिघा परिसरातील डॉ. राहुल चोपडे यांच्या रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला दाखल करण्यात आले. डॉ. रिया चोपडे यांनी तिला तपासल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला त्यांनी नातेवाईकांना दिला. परंतु, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी याच रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान डॉ. रिया…