भुसावळला ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे सजीव देवीचा देखावा

0
2

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयद्वारा विजयादशमीच्या निमित्त जामनेर रोड येथील साई जीवन सुपर शॉपीच्या समोर ओम प्लाझामध्ये रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत देवींचा सजीव देखावा दाखविण्यात येणार आहे. हा देखावा २४ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राहणार आहे. नागरिकांनी सजीव देवींचा देखावा पाहण्याचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या मुख्य संचालिका सिंधू दीदी यांनी केले आहे. यासाठी ब्रह्मकुमारी ज्योती बहन, कविता बहन, अनिल भाई, नितीन भाई, कुकरेजा भाई, दिलीप भाई, नाना पाटील, ओमशांती केंद्रातील भाई, दीदी सहकार्य करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here