Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी धरणगाव-गंगापुरी-पष्टाणे ते सोनवद अशा १० कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. त्यामुळे धरणगाव, सोनवद, हनुमंतखेडा, पष्टाणे, धानोरा, अहिरे, झुरखेडा, बाभुळगाव परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. परिणामी सोनवद परिसराच्या विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यात शासनाच्या बजेट अंतर्गत मार्च २०२३ मध्ये ४ रस्त्यांसाठी २४ कोटी निधी मंजूर केला होता. त्यात धरणगाव-गंगापुरी-पष्टाणे- सोनवद ५ कोटी, चोरगाव-चांदसर-पाळधी १० कोटी, लाडली ते रेल फाटा ६ कोटी,…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी आपले सरकार ग्रामपंचायत संगणक परिचालक राज्यातील विविध मागण्यांसाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहे. मागील हिवाळी अधिवेशनावर ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी मोर्चा काढून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप मागण्या मान्य न झाल्याने यावल तालुक्यातील संगणक परिचालकही बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. पंचायत समितीचे यावल येथील विस्तार अधिकारी हबीब तडवी यांना नुकतेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी यावल संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय तायडे, सचिव सुधाकर कोळी, पंकज पाटील, हर्षल सोनवणे, प्रभाकर तायडे, विजय पाटील, विठ्ठल कोळी, रोनक तडवी आदी उपस्थित होते. मागील आंदोलनावेळी चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी मध्यस्थी करत…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या प्रलंबित आणि नवीन प्रकरणाबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच अशी प्रकरणे गेल्या ५ ते ६ महिन्यापासून त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. तसेच नवीन प्रकरणे सुद्धा दुर्लक्षित आहे ही प्रकरणे त्वरित मिटिंग घेऊन निकाली काढण्यात यावी, अन्यथा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे येत्या १५ डिसेंबर रोजी भीक मांगो आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात छेडण्यात येईल, असा इशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनमार्फत महसूल प्रशासनाला दिला आहे. निवेदन देतेवेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष निलेश चोपडे, महाराष्ट्र सल्लागार पंकज मोरे, महाराष्ट्र सचिव शेख रईस,…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी राज्यस्तरीय राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद जळगाव येथे सुरु असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनस्थळी खा.क्षा खडसे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच शासनकडे आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा करण्याबाबत आश्‍वासन दिले. राज्यस्तरीय राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीने १० ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत शासनास कळविले होते. मात्र, शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी (समुदाय आरोग्य अधिकारी, शालेय आरोग्य तपासणी पथक, आरोग्य सेविका/सहाय्यिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निमार्ण अधिकारी, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनमार्फत राज्य, केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची अंमलबलावणीसाठी जळगाव जिल्ह्याचा पूर्व आढावा व नियोजनाबाबत केंद्र शासनाचे दोन अधिकारी आलेले आहे. याबाबत आढाव्यासह नियोजन बैठकीचे खा.रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले होते. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने एप्रिल-मे २०१८ या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच जून-ऑगस्ट २०१८ या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील ५ हजार ९५८ सीएमव्ही बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत प्रकरण ऑनलाईन झाले आहे. उद्यापासून त्यांना सजा स्तरावर विशिष्ट क्रमांक (व्ही.के. क्रमांक) उपलब्ध होईल आणि केवायसी झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा होईल, अशी माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात महसूल व कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिली. पी.एम. किसान योजना व सीएमव्हीबाबत शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी अनुदान व नुकसान भरपाईबाबत वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांची होणारी फिरफिर याची दखल घेत कृषी व महसूल विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदार निकेतन वाडे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, संजय गांधी…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे मंत्री अनिल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुर केलेल्या ११ कोटी निधीतील अमळनेर तालुका तहसील व प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व सुविधायुक्त व भव्य अशी इमारत होत आहे. कामाची पाहणी मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी जागतिक वारसा सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त घुसर्डी, पाथर्डी, नगरदेवळे जवळील संगमेश्‍वर महादेव मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्याचे आयोजन केले आहे. सर्व दुर्गसेवकांनी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड, चाळीसगाव येथे जमावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिलीप घोरपडे यांनी केले आहे.

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. रवींद्र चव्हाण यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी कोकण येथे झालेल्या दिमाखदार समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रा. रवींद्र चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची १३ वी राष्ट्रीय परिषद सावंतवाडी कोकण येथील नगरपालिका नाट्यगृहात रविवारी झाली. परिषदेतील विशेष सोहळ्यात प्रा. रवींद्र चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र चव्हाण हे मराठी व भूगोल विषयाचे…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी स्वामी नरेंद्र महाराज यांचे हिंदू धर्माचे कार्य देशभरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराजांचे अध्यात्मिक कार्य सोबत विविध सामाजिक उपक्रम संस्थानमार्फत राबवित असतात. जामनेर शहरात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा योग जिल्हाभरातील माऊली भक्तांना मिळाला आहे. सोशल मीडियाच्या गर्तेतही धार्मिक कार्यक्रमात भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. हिवरखेडा रस्त्यावरील गोविंद महाराज संस्थानच्या ग्राउंडवर जळगाव जिल्हा सेवा समितीमार्फत आयोजित श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा आयोजित केला होता. जामनेरपुरा येथून नगारखाना, गांधी चौक, नगरपालिका चौक भुसावळ चौफुली, हिवरखेडा रोड यामार्गाने माऊलींच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने…

Read More