साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर आणि बोदवड या दोन्ही तालुक्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तहसीलदारांचे प्रभारी राज आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभारी राजमुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेची ससेहोलपट थांबावी व त्यांना न्याय मिळावा, यासाठी दोन्ही तालुक्यांना कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲॅड.रोहिणी खडसे- खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कामांसाठी व विविध योजनांसाठी प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. बोदवड तालुका निर्मितीपासून बोदवड येथे तहसीलदारपदी सातत्याने प्रभारी राज सुरू आहे. आता त्याच धर्तीवर मुक्ताईनगर तहसील कार्यालयातही सद्यस्थितीत तहसीलदारांचे पद रिक्त असून…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील जे.ई.स्कुल विद्यालयातील कला शिक्षक मनोज सुरवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे तैलचित्र काढून त्यांना रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त अनोखे अभिवादन केले. सुरवाडे हे कला शिक्षक आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक महान व्यक्तींची तैलचित्रे रेखाटली आहेत. रंग व रेषा यावर त्यांचे प्रचंड प्रभुत्व असल्याने ते निसर्गचित्रे तेवढ्याच ताकदीने रेखाटतात.त्यांच्या सौंदर्यदृष्टीतून साकारलेल्या अनेक चित्रांमुळे शाळेचे सौंदर्य खुलून आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आपल्या नजरेसमोर साकार होण्याचा प्राचार्य आर.पी.पाटील यांच्यासह जे.जे.पाटील, व्ही.डी.बऱ्हाटे, सर्व सहकाऱ्यांनी अद्भुत अनुभव घेतला. अनोख्या अभिवादनामुळे सुरवाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणीव भासत असल्याने वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. नुसते वारकरी साहित्य वाटपापुरते नव्हे तर वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी नेहमीच कटिबध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व मित्र…
सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथे प्रथमच मदार फाउंडेशनतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी मुस्लिम वधू-वरांचे २१ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ झाले. अध्यक्षस्थानी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे होत्या. उद्घाटक म्हणून धुळ्याचे आ.डॉ.फारुक शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील, डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी हारूण, शिवसेनेचे अफसर खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी, समाजसेवक सोहेल खान, ज्येष्ठ पत्रकार युसूफ शाह, रफीक सेठ ऐनपूर, धनंजय चौधरी, हाजी अजमल शाह जळगाव, माजीद जकेरिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानिमित्त मदार फाउंडेशनचे पदाधिकारी रहीम शाह, फारुक अली, सलीम शाह, अमजद शाह, रशीद शाह…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी रेडक्रॉसचे सेवा कार्य हे जळगावच्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे ही जबाबदारी पार पडणे गरजेचे आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी आपापल्या परीने वेळ देऊन जळगाव जिल्ह्यात आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा व्यापक स्वरुपात राबवाव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले. रेडक्रॉसच्या वार्षिक सर्व साधारण सभेत ते बोलत होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी भवनात नुकतीच उत्साहात झाली. रेडक्रॉसचे संस्थापक सर हेनरी ड्युनंट यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्ज्वलन करून रेडक्रॉस गीत सादर करण्यात आले. कार्यकारिणी सदस्य शांताताई वाणी यांच्या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वडनगरी फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून पालकमंत्र्यांनी शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्यावतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित केली आहे. कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी आयोजक संस्था व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. याप्रसंगी उद्योजक अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गिरीष सूर्यवंशी,…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हरताळे येथे प्लॉट वॉरीयरने प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. अंतिम सामना मल्हार बॉईज आणि प्लॉट वॉरीयर क्रिकेट टीममध्ये झाला. त्यात प्लॉट वॉरीयर संघ विजेता ठरला. विजेत्या संघास सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांच्यातर्फे स्मृतीचिन्ह देऊन बक्षीस वितरीत करण्यात आले. विजेता संघात कर्णधार विकी निकम, यष्टीरक्षक अमोल जाधव, भारत इंगळे, सागर इंगळे, निलेश त्यागी, समाधान मोरे, शकील पठाण, झाकीर शेख, कदिर शेख, सचिन लांडगे, अमीन शेख, सचिन उबाळे, तुषार अवसरमल, अविनाश पानपाटील, विलास निकम यांचा समावेश होता. त्यात अनेक संघांनी सहभाग नोंदविला.
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोसगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी १४ व्या वित्त आयोगातून त्यांच्या नावे दोन वेळा प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश काढून याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही एक वर्षात ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांना न्याय न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन सादर करून प्रशासन भ्रष्टाचारांना पाठीशी घालत आहे. समजून घेताना व कारवाई होत नसल्याने येत्या आठ दिवसात जर कारवाई नाही झाली तर सर्व सदस्य आपल्याकडे राजीनामे देऊ, असे निवेदन सादर केल्याने प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचारांना कसे पाठीशी घालतात हे उघड झाले आहे. यावल तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी शासनाकडून येणाऱ्या निधीचा दुरुपयोग करून स्वतःच्या फायद्यासाठी १४ व्या…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील नरवेल-म्हैसवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. रस्त्याच्या पुर्ननिर्माणबाबत तसेच आळंद फाटा ते हरणखेड रस्ता नुतनीकरण करून रस्त्यावरील पुलांची उंची वाढविण्याची व देवधाबा रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन तायडे यांच्याकडे शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. नरवेल-म्हैसवाडी हा रस्ता एक कि.मी.चा आहे. दोन्ही गावांना जोडणारा दुवा आहे. रस्त्याचे पुर्ननिर्माण करावे तसेच आळंद फाटा ते हरणखेड रस्ता नुतनीकरण करून रस्त्यावरील पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यावरील पुलांची…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने भुसावळचे उमेश नेमाडे यांची रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी श्री. नेमाडे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, रवींद्र नाना पाटील, गुणवंत नीळ आदी उपस्थित होते.