Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा आणि भडगाव तालुक्यात रविवारी, २६ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्रीपर्यंत भडगाव तालुक्यात ३५ एमएम व पाचोरा तालुक्यात २६ एमएम पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे कापूस, तूर, मका, ज्वारी, फळपीक, भाजीपाला पिक उभे असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे पाचोरा-भडगाव निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील (कापूस, तूर आदी) पिकांचा विमा उतरविलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन पद्धतीने किंवा स्थानिक…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी बाल मेळावा होणार आहे. बाल मेळावा आयोजनासंदर्भात बैठक पार पडली. हा बाल मेळावा संपूर्ण विद्यार्थी केंद्रित असेल तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य ठरेल, असे मत बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड (मुंबई) यांनी व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. यावेळी वसुंधरा लांडगे व स्नेहा एकतारे यांनी आयोजनातील प्रमुख मुद्दे मांडले. बैठकीत बालमेळावा आयोजनाबाबत सविस्तर…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील रेल्वे कॉलनीतील सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे २७ नोव्हेंबरपासून श्रीराम चरित मानस कथेला सुरुवात झाली आहे. श्रीराम कथेचे गुरुजी श्रीधर मिश्रा यांनी कथेत श्रीराम व हनुमानाच्या लहानपणाची गोष्ट सांगत असताना तेथे मारुतीने वानरराजच्या रुपात कथेच्या ठिकाणी भेट देऊन मारुती मंदिरात जाऊन तेथे प्रसादासाठी ठेवलेला लाडू खाल्याने उपस्थित भाविकांनी दर्शन घेऊन जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. कथेच्या सुरुवातीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्तरप्रदेश मुर्झापूर येथील श्रीराम कथेचे वक्ते श्रीधर ब्रीजमोहन मिश्रा यांनी तुलसीदासजींचा वर्णन करत कथेला प्रारंभ केले. कथेत गुरुजी हे श्रीराम व हनुमानाच्या लहानपणाची गोष्ट सांगत असतांना कथेच्या जवळ असलेल्या वृक्षाच्या फांदीवर बसून मारुतीने वानरराजच्या रुपात…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर भोई समाज मदत संस्थेकडून स्व.अशोक आखाडू भोई (रा.तामसवाडी, ता. पारोळा, जि.जळगाव) यांच्या पीडित परिवाराला २० हजार रुपयाची नुकतीच आर्थिक मदत देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात भोई ज्या-ज्या ठिकाणी अशी घटना होतात. त्या-त्या ठिकाणी भोई समाज मदत संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असतो. स्व.अशोक आखाडू भोई, जावरे (वय ३७, रा.तामसवाडी, ता. पारोळा) यांचे १८ जुलै २०२३ रोजी निधन झाले होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने भोई समाज मदत केंद्र महाराष्ट्र समन्वयक समितीचे पदाधिकाऱ्यांनी भोई (जावरे) परिवाराची सांत्वन भेट देऊन त्यांना आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच २६ नोव्हेंबर २०२३ रोजी तामसवाडी, ता.पारोळा येथे स्व.…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी नांदुरा तालुक्यातील चांदुरबिस्वा येथील सासर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासु, सासरे व पतीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. तसेच तिघांना पुणे येथे अटक केली आहे. मयत विवाहितेचे वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी दिक्षाचा विवाह ८ मे २०२१ रोजी पवन प्रल्हाद तायडे (रा.हनुमान नगर, चांदुरबिस्वा, ता.नांदुरा, ह.मु.म्हसोबा मंदिराजवळ, गवळीनगर, भोसरी, पुणे) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी दिक्षा रक्षाबंधनाला माहेरी आली होती. तिने पती व सासू-सासरे यांनी काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र,…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर परिसरात संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने बरड भागातील विहिरींनी तळ गाठल्याने पिके हातची गेली. काही भागातील बागायत विहिरींना असलेल्या जेमतेम पाण्याच्या भरवश्‍यावर कपाशी फरदड ठेवली. मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हिरव्यागार असलेल्या कपाशी उपटुन फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ असल्याचे चित्र कजगावसह परिसरात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कजगावसह परिसरात संपूर्ण पावसाळ्यात एखाद दोन पाऊस झाले. पूर्ण पावसाळा कोरडा समान गेल्याने या भागातील नदी, नाले, लहान बंधारे, लहान धरणही चक्क पावसाळ्यात कोरडीठाक पडली होती.त्यामुळे शेतशिवारातील विहिरीच्या जल पातळ्या चक्क पावसाळ्यात तर वाढल्याच नाही उलट त्यांनी पावसाळ्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली होती. आता तर बरड…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरात लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा असुनही बसेस शहराच्या बायपास मार्गे मार्गक्रमण करीत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांसह महामार्गावर जाऊन बायपास जाणारी बस थांबवून चालकाला धारेवर धरीत शासनाच्या आदेशाची प्रत देऊन चांगलीच कानउघाडणी केली. वरणगाव शहराची किमान ६० हजार लोकसंख्या तसेच शहराला लगतचे आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र व परिसरातील २७ खेड्यातील प्रवाशी नागरिकांना लांब पल्ल्याच्या गावी जाण्यासाठी सुपर फास्ट बसेसला वरणगाव शहरात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणीवरून थांबा देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी संविधानाचा प्रास्ताविक आत्मा आहे. ते संविधानाचे पहिले पान आहे. संविधानाची ओळख असून त्यात ध्येय व उद्दिष्ट सांगितले आहे. सर्वांग सुंदर संविधान सामाजिक जीवन जगण्याचा जिवंत दस्ताऐवज आहे. तसेच जीवनाचा मध्यम मार्ग आहे. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात संवैधानिक जीवन जगायला पाहिजे. वाड्या, पाड्या, वस्ती, घराघरात संविधान पोहचले पाहिजे. संविधानाचा सन्मान व प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन व आचरणाने संविधानाचे संवर्धन होईल. आम्ही भारताचे लोक म्हणून ही जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे प्रतिपादन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले. तालुक्यातील तळेगाव, कृष्णनगर, हातगाव ग्रा.पं, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव येथे ७४ वा संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यात कोरोना काळातील केलेल्या कार्याची दखल घेऊन पो.कॉ. वसिम रहेमान मलिक यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध ठिकाणातून, जिल्ह्यासह गावातील घरोघरी जाऊन त्यांचे सर्वेक्षण करून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा गौरव व सन्मान करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेकडून पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येऊन पुरस्कार देण्यात आला. त्यात महाराष्ट्र पोलीस प्रशासनात सेवा बजावत असताना पो.कॉ. वसिम रहेमान मलिक यांनी कोरोना काळात पोलीस डिपार्टमेंटमधील पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाल्यास वसिम मलिक यांनी तात्काळ मदत…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर भडगाव तालुक्यात रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी मुसळधार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सावदे, गुढे, घुसर्डी या गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेती व फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा असमानी संकटामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे ओला झालेला कापूस आता शेतकऱ्याला कवडी मोल भावाला विकावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठे संकटात सापडले आहे. शासनाने महसुल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Read More