पाण्याचा प्रश्न मिटला ; शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाण्याची सोय साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या मोठ्या, मध्यम व लघु १७ जलस्रोत प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांनी ‘शंभरी’ गाठली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी व रब्बी हंगामाच्या सिंचनाचा प्रश्न मिटल्याचे समाधान जिल्हावासीयांमध्ये आहे. जिल्ह्यातील जलसाठा ८४.७५ टक्के इतका आहे. गिरणा धरणासह अनेक प्रमुख प्रकल्पांनी ‘शंभरी’ पूर्ण केली आहे. यंदा मान्सून सुरुवातीच्या अडीच महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी होता. ज्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, १५ ऑगस्टनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे मोठे व मध्यम प्रकल्प झपाट्याने भरले. विशेष म्हणजे गिरणा, अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नवती, हिवरा,…
Author: Sharad Bhalerao
जळगाव एलसीबी शाखेची कारवाई ; दोघे गजाआड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेने इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्या प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) आणि रणजित चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपतीनगर, जळगाव) यांच्यावर धडक कारवाई केली. कारवाईत १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाला २१ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजार पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकण्यात आला. यावेळी दोघांना ऑनलाईन सट्टा खेळविताना रंगेहात पकडले गेले. दोघांकडून रोख रक्कम आणि सट्ट्याचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी भुसावळ बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद…
विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य, उच्च ध्येय गाठण्याविषयी मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागात योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण तसेच गुणवंतांचा गुणगौरव सोहळा योग हॉलमध्ये नुकताच पार पडला. सोहळ्यास कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. किशोर एफ. पवार, आंतरविद्याशाखीय अभ्यासप्रशाळेच्या प्रमुख डॉ. मनीषा इंदाणी, योगशास्त्र विभागाचे प्रमुख इंजि.राजेश पाटील उपस्थित होते. सोहळ्यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी अमर हटकर क्रीडा विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच एकनाथ नन्नवरे यांचा योगशास्त्र विभाग टीचिंग असो. नियुक्ती झाल्याबद्दल कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात योग थेरेपीचे सहायक प्राध्यापक डॉ. लीना चौधरी यांनी ओंकार…
प्रकाशनाला अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एमआयडीसीतील स्थित आदित्य लॉनमध्ये येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जळगाव जिल्हा महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे दहावा ऋणानुबंध वधु-वर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी अर्जासह ऑनलाईन प्रणाली, कार्यक्रमाच्या पत्रिकेचे महिला शक्तीच्या हस्ते प्रकाशन उत्साहात पार पडले. प्रकाशन सोहळा संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने सुरू झाला. याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून अहिर सुवर्णकार महिला मंडळ, जळगावच्या सर्व पदाधिकारी महिला भगिनी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते परिचय अर्ज व निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वधु-वरांसाठी ऑनलाईन माहिती प्रणालीची लिंकही सर्व उपस्थित…
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. शैलजा करोडे ; विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये साहित्याची आवड वाढविण्याचा उद्देश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये बालपणापासून साहित्याची आवड निर्माण करणे तसेच साहित्य चळवळ वृद्धिंगत करणे, ह्या उद्देशाने समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे ‘दुसरे अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन’ तीन दिवसीय संमेलन येत्या २२, २३ व २४ नोव्हेंबर, २०२५ रोजी पार पडणार आहे. साहित्य संमेलनाचे पहिले आयोजन यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या आभासी संमेलनासाठी विद्यार्थ्यांसह साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उत्सुकतेत वाढ झाली आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षांपासून सामाजिक कार्याबरोबरच वाचन संस्कृती वाढीसाठी विविध नवोपक्रम राबवत आहे. साहित्य संमेलनात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नामवंत साहित्यिकांचा सहभाग राहणार आहे. इच्छुकांना १५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री डॉ. शैलजा करोडे, मुंबई, उद्घाटक कवियत्री निशा डांगे/नायगावकर,…
अपर्णा येवलकर प्रथम, जळगावच्या किर्ती पाटील द्वितीय, श्रावणी खातळे तृतीय साईमत/नाशिक/प्रतिनिधी : तालुक्यातील ओझर येथे बीएसएफ बहुउद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने “पुस्तकांचे हॉटेल” या ठिकाणी आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. संमेलनात इगतपुरी (धामणगाव) येथील कविवर्य ॲडव्होकेट महेंद्र बर्वे यांच्यासह राज्यभरातील ४३ कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी नंदू सानप होते. काव्य संमेलनात विजेत्यांमध्ये अपर्णा येवलकर (येवला) प्रथम, किर्ती अरुण पाटील (जळगाव) द्वितीय तर श्रावणी खातळे (नाशिक) तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव नागरे, डॉ. अश्विनीताई बोरसे, नितीन डांगळे तसेच अभिनेत्री केतकी गावंडे, सचिन अहिरे यांची विशेष उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी मुख्य आयोजक म्हणून भूषण सरदार, वैशाली सोनवणे, अश्विनी सांगळे…
मेहरुणमध्ये दोन आरोपी जाळ्यात ; सुरतचा वाँटेड आरोपीही पकडला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मेहरुण परिसरात मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत स्फटीक मेथ एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थासह दोन मोबाईल फोन जप्त केले आहे. मालाची किंमत सुमारे ८२ हजार रुपये आहे. दरम्यान, ही कारवाई शनिवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, शहरातील मेहरुण येथील जे.के. पार्क स्विमिंग पुलाजवळ एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती पो.हवा. अक्रम शेख यांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा…
दिगंबर जैन समाजातर्फे गुणवंतांसह उपवासधारकांचा सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जीवनात विद्यार्थ्यांनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, चिंतामुक्त जीवन जगावे, प्रेम प्रकरणांपासून दूर राहावे तसेच १० ते १२ तास अभ्यास करावा. पाठीवर कौतुकाची थाप मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करावे. शिवाय आई-वडिलांची लाज राखा, त्यांच्यामुळेच तुमचे आजचे भविष्य उज्ज्वल आहे. यासोबतच विद्यार्थी, पालक आणि समाज यांचे योग्य संस्कार राखण्याचे महत्त्व अधोरेखित करत मुनिश्री आस्तिक्य सागर महाराज यांनी दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पर्युषण उपवासधारकांना उपदेश दिला. दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित सत्कार समारंभात ७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि १६ पर्युषण उपवासधारकांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम प.…
स्त्रीशक्तीच्या हस्ते प्रकाशन ; समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे येत्या १८ जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या दहाव्या ऋणानुबंध वधु-वर व पालक परिचय मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जुने एम्प्लॉयमेंट ऑफिससमोरील अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेत सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता अर्ज वितरण, ऑनलाईन प्रणालीसह कार्यक्रम पत्रिकेचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुवर्णकार समाजातील स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधी भगिनींच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सोहळ्याला अहिर सुवर्णकार महिला मंडळ, मेळावा सहयोगी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशा उपक्रमाद्वारे समाजातील युवक-युवतींसाठी विवाहयोग्य परिचयाची एक भक्कम आणि…
पोलीस लाईन परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन पोलीस लाईन परिसरात “सेवा पंधरवाडा” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हरित उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला. उपक्रमाला आ.सुरेश भोळे (राजूमामा), जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडल अध्यक्षा दीपमाला काळे, “सेवा पंधरवाडा” महानगर संयोजक विजय वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अॅड. शुचिता हाडा, भारती सोनवणे, रेखा वर्मा, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, मनोज काळे, अशोक राठी, नंदिनी दर्जी, दीप्ती चिरमाडे, चेतन तिवारी, सतीश पाटील, सचिन बाविस्कर, श्याम करमचंदानी, गुरबक्ष जाधवाणी, संदीप पाटील, संजय अडकमोल, ऋषिकेश शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपणासोबत उपस्थित मान्यवरांनी…