साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून डॉ.बाबासाहेब यांनी उच्च शिक्षण घेत सामाजिक कार्य केले. त्यांचे कार्य जगाला प्रेरणा देणारे असल्याचे मत ज्येष्ठ विधीज्ञ डी.एन.बोराडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. वकील संघाच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनेक सदस्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ॲड.साहेबराव पाटील, ॲड.एस.टी.खैरनार, ॲड.राहुल जाधव, ॲड.आकाश पोळ यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अधीक्षक गोविंद पवार, ॲड.डी.डी.दसेगावकर, यांनी गीतातून आदरांजली वाहिली. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, जाकीर सय्यद, एच. करंदीकर, ए.बी.मोरे, डी.एस. निकम यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड.कविता जाधव यांनी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी आणि भविष्यातील धोके कळावे, यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रोटरी क्लबतर्फे गर्भाशयासह स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिरात २०० पेक्षा जास्त महिलांची विनामूल्य तपासणी केली. तपासणीअंती ज्या महिलांना केवळ औषधोपचाराची आवश्यकता आहे, त्यांना रोटरी क्लब चोपडाच्यावतीने मोफत औषधी पुरविण्यात आली. उपक्रमासाठी रोटरी मिडटाऊन, अमरावती क्लबच्यावतीने तयार केलेली मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरणार असून त्या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांधीलकी निर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३-२४, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३, नमो ११ कलमी कार्यक्रम अंतर्गत शहर स्वच्छता अभियानातील प्रीमिअर लीगला नागरिकांसह कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४चे शनिवारी, ९ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजन केले आहे. शहरात नगरपरिषदेतर्फे आरोग्य स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यात नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया, समस्या समजून घेत नगरपरिषदेकडून विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी नगरपालिकामार्फत करण्यात…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी स्थानिक पद्मश्री वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदावर कार्यरत कर्मचारी स्व. शरद पवार यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात निधन झाले होते. कॉलेजच्या स्टाफ वेल्फेअर असोसिएशन कमिटीच्यामार्फत लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे चेअरमन डी. एन. पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, खजिनदार सुधीर पाचपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी सुलभा पवार यांना सुपूर्द करण्यात आला. त्या महाविद्यालयातच कार्यरत आहेत. मयत शरद पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा सैनिकी कॉलेजमध्ये शिकत असून एनडीए परीक्षेची तयारी करत आहे. मुलगी बीडीएसला उच्चशिक्षण घेत आहे.…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांचा वाढदिवस ६ डिसेंबर ते १३ डिसेंबर यादरम्यान विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये विविध सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत श्री महामंडलेश्वर बालयोगीजी महाराज यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यात ६ ते ११ डिसेंबर दरम्यान १६ संघाचा सहभाग असणाऱ्या पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ११ डिसेंबर रोजी प्लॅस्टिकमुक्त परिसर अभियान राबविण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा व सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी आगामी हिवाळी अधिवेशनात व्हाईस ऑफ मीडियाच्या नुकत्याच झालेल्या बारामती अधिवेशनात संमत केलेल्या १४ ठरावांवर निर्णय घेण्यासंदर्भात बुधवारी, ६ डिसेंबर रोजी बोदवड तालुका व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप वैष्णव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. हिवाळी अधिवेशनात सर्व विषयांवर शासनाने लवकर दखल घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन आ.चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. निवेदन देतांना व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप वैष्णव, सचिव अमोल आमोदकर, उपाध्यक्ष निवृत्ती ढोले, सुहास बारी, रवींद्र मराठे आदी उपस्थित होते. यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी भाईसाब मीडियाचे तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील सालबर्डी शिवारात एका तलाठ्याने अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला शनिवारी, २ डिसेंबर रोजी पकडले होते. त्यानंतर हे वाहन मुक्ताईनगर तहसील कार्यालयात जमा केले होते. ट्रकमधील वाळू नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर सादर केलेल्या अहवालावरुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ‘त्या’ ट्रक मालकाला महसूल प्रशासन ४५ हजाराची नोटीस बजावणार आहे. सविस्तर असे की, तालुक्यात सालबर्डी शिवारात गेल्या ६ दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करताना एक वाहन तलाठ्याने पकडून तहसील कार्यालय आवारात जमा केले होतेे. परंतु त्या वाहनातील वाळू तलाठी यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे वाहनातील वाळू महसूलच्या करामतीमुळे आणि जादुने गायब झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती. याविषयी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा बाल संरक्षण समिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये नुकतीच गठीत करण्यात आली. निवड समितीत मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांचा सदस्यपदी समावेश आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ४४ व ४५ तसेच नियम २०१८ मधील २५ नुसार प्रतिपालकत्व, २६ नुसार प्रायोजकत्व व अनुरक्षण योजनेबाबत तरतूद केली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व तसेच अनुरक्षणगृह संस्थेतर सेवांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुणे आयुक्त यांच्या निर्देशानुसार नुकतीच समिती गठीत करण्यात आली. समितीत अध्यक्ष, सचिव आणि ५ सदस्यांचा समावेश आहे. समितीत सदस्यपदी निवड झालेले फिरोज शेख यांनी मौलाना…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी माजी शिक्षण मंत्री शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या ५ डिसेंबर रोजी ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी, ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी शिक्षण मंडळ आवारातील श्रीमती अनुसयाबाई साळुंखे सभागृहात होणार आहे. रक्तदान शिबिर महात्मा गांधी शिक्षण मंडळ व रक्त केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १०० रक्तदाते रक्तदान करणार आहेत. महात्मा गांधी शिक्षण मंडळ, कस्तुरबा महिला समाज शिक्षण मंडळ, आदिवासी सेवा मंडळ अंतर्गत इच्छुक शिक्षकांनी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहसचिव डॉ.श्री डी. ए.सूर्यवंशी यांनी केले आहे.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत वेतन आणि उर्वरित राहिलेल्या सर्व रकमा एकरकमी व लवकर मिळाव्यात, उपोषण करूनही तोंडाला पाने पुसली म्हणून आता कुणावर विश्वास ठेवायचा? यावर सर्व कामगारांनी एक मताने असे ठरविले की, रविवारी, ३ डिसेंबरपासून साखर कारखान्याचा काटा बंद आंदोलन सुरू करणार आहेत. अशा आशयाचे निवेदन कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, बारामती ॲग्रो, चोसाकाचे अध्यक्ष यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्व कामगारांनी थकीत वेतन व अंतिम एकूण रक्कम मिळावी, यासाठी आमरण उपोषण केले. दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले. त्यावेळी रकमा दिवाळीला मिळतील असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, आमची…