साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अयोध्येत पंधराशे वर्षांपूर्वी मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. हे अवशेष हा देश हिंदुराष्ट्र असल्याचा पुरावा होता. ज्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू धर्म जागविण्याचे काम केले. तेच काम आज अयोध्यातील राम मंदिराची उभारणी करून नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ‘जय जय श्रीरामाचा’ जयघोष गुंजणार आहे. हा युवकांचा देश येत्या काळात हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे सडेतोड प्रतिपादन देशातील आघाडीच्या प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले. खा.उन्मेश पाटील आणि संपदा पाटील आयोजित उमंग व्याख्यानमालेच्या दहाव्या वर्षाचे प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अंधशाळेच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त…
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील स्व.धृपदाबाई यादव सरोदे शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे कृतज्ञता दिन म्हणून गरजू दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील कार्यरत उपक्रमशील शिक्षक विलास अरुण निकम यांना लोहारा गावाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुलाल बोरसे, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित व्हा.चेअरमन भीमराव शेळके, कृषीभूषण विश्वासराव शेळके, लोहारा हायस्कुलचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, ए.ए.पटेल, महेंद्र शेळके, कृष्णराव शेळके, दीपक पवार, चंद्रकांत पाटील, कैलास यादव सरोदे, सुभाष यादव सरोदे गावातील प्रतिष्ठित मंडळी, पत्रकार यांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला. त्यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास करणे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील ई.पी.एस.-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि राष्ट्रीय सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त कामगारांच्या मागण्यांसाठी समिती प्रमुख ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखी आणि ज्येष्ठ कामगार नेते (समिती कार्याध्यक्ष) जे. एन. बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयावर महामोर्चा धडकला. सेवानिवृत्त कामगारांना दरमहा किमान ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्त्यासह लागू करा, वृध्द पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन द्या व त्यासाठी भरावी लागणारी रक्कम मिळणाऱ्या पेन्शन वाढीच्या एरीयर्समधून समायोजन करण्यात यावी, वंचित झालेल्या सर्वांना किमान ५ हजार रुपये पेन्शन द्या…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी नाशिक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होण्याचे भाग्य लाभल्याचे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत विजय पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात घेतलेल्या पक्षपाती निर्णयाच्या विरोधात चाळीसगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुका व शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारत आक्रमक शिवसैनिकांनी आंदोलन करुन नार्वेकरांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात शिवसेना उपजिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख कविता साळवे, शिवसेना माजी विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख महेंद्र जयस्वाल, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, उपशहर प्रमुख जगदीश महाजन, तालुका संघटक सुनील गायकवाड,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते ‘नवभारत के शिल्पकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये नुकतेच सन्मानित करण्यात आले. नाशिक विभागात अमळनेर नगरपालिकेला प्रथम आणि मुख्याधिकाऱ्यांना पुरस्कार असा दुहेरी सन्मान मिळाला आहे. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पदभार घेतल्यापासून दरवर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अमळनेर नगरपालिकेला उत्तम गुणानुक्रम मिळत आहे. सुरळीत पाणी पुरवठा, सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिल कमी करणे, रस्त्यांची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची वाढीव बिले कमी केली होती. नवोपक्रम आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून अत्यावश्यक विकासकामे त्यांनी केली. कर्मचाऱ्यांना शिस्त, उत्तम प्रशासकीय कारभार…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथील अनुलोम संस्था आणि आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंचधातूची प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते देऊन झाला. यावेळी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, अनुलोम संस्थेचे तुषार महाजन, खेमचंद्र धांडे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, लेफ्टनंट डॉ. आर. आर. राजपूत, संदीप भारंबे उपस्थित होते. याप्रसंगी फैजपूर, न्हावी, अंजाळे, करंजी, यावल, बोरावल, सांगवी, हिंगोणा, आमोदा येथील ९० राम भक्तांना पंचधातूची प्रभु श्रीरामाची मूर्ती देण्यात आली. जात, समाज, श्रीमंती, गरिबी हे भेदभाव मिटून हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र यावे. श्रीरामांना आपण हेच देऊ शकतो. प्रभू रामचंद्रांना आवडणारे कार्य करीत रहा,…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवरांसह प्रा. कर्णसिंग पाटील यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजनासह माल्यार्पण केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या काही स्वयंसेवकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले विचार…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली आहे. आता शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना जमिनीवर पाडून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. वाळूमाफियांनी पथकावर दगडफेकही केली. याप्रकरणी कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह १०-१२ अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्यापासून अवघ्या १७ किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्वंभर शिरसाठ,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई तसेच अमळनेरातील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुक्मिणीताई कला, वाणिज्य महिला महाविद्यालय येथे विजय पाटील, अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत संशोधन पेपर व संशोधक प्राध्यापकांनी आवडीने नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपले वैचारिक, बौद्धिक, समीक्षात्मक विचार लेखांमधून नमूद केले. कार्यशाळेचे उद्घाटन अमळनेर शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरडाणा कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीणसिंग गिरासे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व संशोधन पत्र सादर करणाऱ्या प्राध्यापक, प्राध्यापिका यांना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी चंद्राई फाउंडेशन, धुळे यांचे सर्वेसर्वा…