राष्ट्रपिता म.फुले अन् सत्यशोधक समाज संघाची विचारसरणी साजरी साईमत/जामनेर/प्रतिनिधी : राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत सत्यशोधक समाज संघाची स्थापना केली. अशा ऐतिहासिक घटनेच्या औचित्य साधून संघाचा १५२ वा वर्धापन दिन जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा ऐतिहासिक शाक्त पंथीय राज्याभिषेक आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाशी जोडला गेला. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीस अभिवादन करून फोटोला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव रमेश वराडे यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव…
Author: Sharad Bhalerao
नूतन कार्यकारिणीची घोषणा लवकरच, महिला सबलीकरणासाठी ‘आम्ही सिद्ध लेखिका’ कार्यक्रम” साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.शांताराम पाटील होते. सभेचे उद्घाटन संस्थापक-अध्यक्ष अमृतयात्री डी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सभेला उपाध्यक्ष विनोद जाधव, माजी खजिनदार सुखदेव महाजन, व्ही.डी. पाटील यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. सभेत सचिव जितेंद्र गोरे, गोरख सूर्यवंशी यांनी संस्थेच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे जमा खर्च आणि २०२५-२६ चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तसेच २०२५ ते २०३० अशा पाच वर्षांसाठी २१ जणांची कार्यकारिणी नियुक्त केली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक विजय…
फसवणुकीसह शारीरिक शोषण ; शहर पोलिसात पो.कॉ.सह परिवाराविरोधात गुन्हा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ‘फेसबुक’च्या माध्यमातून ओळख झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन कोलकाता येथील महिलेवर अनेक वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या परिवारातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जळगाव पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन सपकाळे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१७ पासून त्याच्याशी तिचा संपर्क होता. अविवाहित असल्याचे सांगत त्याने मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवले. अशा आश्वासनावर विश्वास ठेवून…
‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार नवा अध्याय ; लघुदाब ग्राहकांना मोठा फायदा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्ल्यूपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही. अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर व कार्यान्वित होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी…
भगवान सेनेच्या पाठपुराव्याला यश, सेवानिवृत्त चालकासह वाहकांचा सत्कार साईमत/जामनेर/प्रतिनिधी : श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र भगवानगड मार्गावर नवीन बस सेवा सुरू केली आहे. यासाठी ‘भगवान सेने’च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जामनेर येथे बस आल्यावर माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करुन श्रीफळ प्रदान केले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक तायडे यांनी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त महारू नाईक यांचा तर मुक्ताईनगर डेपोचे चालक दराडे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर न.पा.चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे यांनी वाहक घुगे यांचा सत्कार केला. ही गाडी मुक्ताईनगरहुन नियमित ७:३० ला निघणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी भगवान…
आसोदा विद्यालयातील व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आपल्या जीवनात सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे शालेय जीवन. शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन करण्याची क्षमता हीच ‘जीवनाची’ खरी वाट असते, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय वर्गशिक्षक एस. के. राणे-राजपूत यांनी करून दिला. प्रास्ताविक विद्यार्थिनी सिद्धीका पाटील हिने सादर केले. भूपाळी देवयानी माळी तिच्या मैत्रिणींनी, ईशस्तवन तनुश्री सोनवणे तिच्या मैत्रिणींनी तसेच स्वागतगीत तेजस्विनी पाटील, सहकाऱ्यांनी सादर केले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, शुभांगिनी महाजन…
‘पीआरपी’चे धरणे आंदोलन, प्रशासनाला आंदोलनकर्त्यांची चेतावणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव रेल्वे स्टेशनला ‘खान्देशकन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव देणे तसेच मुंबई दादर येथील रेल्वे स्टेशनला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभुमी स्टेशन’ असे नाव देण्याच्या मागणीसाठी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत जळगाव रेल्वे स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पीपल्स रिपब्लिकन पार्टीने धरणे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाध्यक्ष राजुभाई मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सुरूवातीला महामानवाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मध्य रेल्वेच्या काही स्टेशनवर गाड्यांची येण्या-जाण्याची घोषणा करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सन्मानाने पूर्ण उल्लेखाने सांगणे, उदा. “छत्रपती शिवाजी महाराज…
छोट्या मुलीसह मातेची आत्महत्या; भादली रेल्वे पुलाजवळील हृदयद्रावक घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील नशिराबाद येथील एका विवाहितेने कौटुंबिक वादातून आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. त्यामुळे कौटुंबिक वादाने दोन ‘जीव’ गेल्याचा सूर जनसामान्यांमधून उमटत आहे. २२ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या अशा घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, ही धक्कादायक घटना तालुक्यातील भादली रेल्वे पुलाजवळ घडली. मृतांमध्ये मनीषा चंद्रकांत कावळे (वय २८) आणि त्यांची मुलगी गौरी चंद्रकांत कावळे (वय ६) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. याप्रकरणी नशिराबाद…
मनसेतर्फे पाच दिवसांचा अल्टिमेटम, तहसिलदारांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू आणि मुरुमाचा उपसा आणि वाहतूक तात्काळ थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शीतल राजपूत यांची भेट घेऊन निवेदन दिले. येत्या पाच दिवसाचा अल्टीमेटम देऊन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या जळगाव तालुक्यात गौण खनिजांचा, विशेषतः वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी यांसारख्या गावांमध्ये गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे. त्यामुळे नदीपात्रांची खोली वाढत आहे. हे पर्यावरणासाठी गंभीर धोका…
३५ हजार ग्राहकांची छतावरून वीजनिर्मिती ; १०० मेगावॅट क्षमतेचा टप्पा पार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत जळगाव परिमंडलाने राज्यात आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. परिमंडलातील तब्बल ३५ हजार ग्राहकांनी घरांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे १२८.१९ मेगावॅट क्षमतेसह नागपूरनंतर शंभरीचा टप्पा पार करणारे जळगाव परिमंडल राज्यातील दुसरेच परिमंडल ठरले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत जळगाव परिमंडलाने अभूतपूर्व झेप घेतली आहे. परिमंडलातील तब्बल ३५ हजार ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा उद्देश म्हणजे दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या…