Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद नागरिक सहकारी पतसंस्थेला नुकतेच पंचवीस वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल रौप्य महोत्सव वर्ष म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. त्यात रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा समावेश होता. पतसंस्थेच्या पंचविसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त पतसंस्थेतर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केल्यानंतर भव्य रक्तदान व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक निबंधक विशाल ठाकूर होते. उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे ‘उत्सव आनंदाचा’ स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरे करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, युवा उद्योजक अभिषेक पाटील यांच्यासह मान्यवरांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यासाठी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील होते. सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन होऊन रुक्मिणीताई आणि नवलभाऊ यांच्या प्रतिमेचेही पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्ज्वलन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मुंबई पोलीस शुभम अनिल आगोणे ह्याच्या मृत्यूनंतर त्याच्या केवळ आठवणी आता स्मरणात राहिल्या आहेत. अशातच दैनिक ‘साईमत’ने स्मरणातील त्याच्या एका आठवणीला उजाळा दिला आहे. ही आठवण ताजी असतांनाच त्याची अचानक झालेली ‘एक्झिट’ सर्वांना चटका लावणारी ठरली आहे. गेल्या नोव्हेंबर २०२३ मध्ये चाळीसगाव येथील दैनिक ‘साईमत’ विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. ह्या कार्यक्रमात शुभम आगोणे हा त्यांच्या मित्रांसोबत दैनिक ‘साईमत’चे मुख्य संपादक प्रमोद बऱ्हाटे, कार्यकारी संपादक त्र्यंबक कापडे, विभागीय कार्यालय प्रमुख मुराद पटेल आणि शहर प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासह सर्व टीमला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. प्रेमळ आणि शांत स्वभावाचा शुभम चाळीसगावकरांचा लाडका होता. त्याला मोठ्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील क्रिकेटच्या वादातून झालेल्या मुंबई पोलीस शुभम अनिल आगोणे याच्या निर्घृण हत्येप्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. इतर फरार असलेले आरोपी यांना तात्काळ अटक करून शिक्षा द्यावी, यासाठी समाजबांधव एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत्या सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता आक्रोश मोर्चा करुन रास्ता रोको करणार आहे. मोर्चात विविध मागण्यांचा समावेश असणार आहे. समाजबांधवांनी केलेल्या मागण्यांमध्ये फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, आरोपीची केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील जामनेर रस्त्यावरील श्री गजानन महाराज देवस्थानची पालखी ‘गण गण गणात बोते’च्या गजरात मंगळवारी, १६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे दाखल झाली. पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांचा क्षीण क्षणार्धात दूर झाल्याचे दिसून येत होते. तसेच महाराजांच्या जपामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही देवस्थानची पालखी १२ रोजी सकाळी भुसावळहून शेगावकडे उत्साहात मार्गस्थ झाली होती. सायंकाळी मुक्ताईनगर येथे मुक्काम करत १३ ला मलकापूर, १४ ला नांदुरा तर १५ रोजी अन्नकुटी येथे मुक्कामी होती. दरम्यान, भाविकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढत, पुष्पवर्षाव आणि पणत्या लावून पालखीचे स्वागत केले. तसेच भोजन, चहा, नाश्‍त्याची सोय केली होती. १६ रोजी सकाळी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी रस्ते, गटार, वॉटर आणि मीटर अशा विकास कामांसोबतच शासनाच्या योजना, सोयी सवलती जनतेला मिळवून देणे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करणे माझे काम आहे. त्यासाठी मी व माझे कार्यालय कटिबद्ध आहे. त्यामुळे विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले. चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे गावातील २ कोटी ६५ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. गावाच्या विकासासाठी अजून २५ लाखांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी मांदुर्णे, सायगाव, अलवाडी, भवाळी गावातील १६१ हून अधिक आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटपही करण्यात…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदा कॉलनी, श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर यांच्यासह परिसरातील अबालवृद्ध महिला मंडळींसाठी सालाबादप्रमाणे खास मकर संक्रांतनिमित्त माजी नगरसेवक विक्रांत पाटील आणि समाजसेविका स्वप्ना पाटील यांनी ‘माझा प्रभाग पतंग महोत्सव’ आयोजित केला होता. त्यात सर्वांना मोफत पतंग देवून सर्वांनी जोशपूर्ण उत्साहात पतंग उडवून डी. जे. च्या तालावर डान्स नाचत आनंद घेतला.  पतंग महोत्सवाचे फुगे व पतंग हवेत सोडून माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी पाटील, बाजार समितीच्या माजी प्रशासक तिलोत्तमा पाटील, उद्योगपती लीना पाटील, रंजना महाजन, कविता मराठे, शितल सोनार, वैशाली कुलकर्णी, नलिनी बारी, प्रतिभा…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेला हरताळ फासणाऱ्या राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना उबाठाच्या मलकापूर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या फोटोला काळे फासले. त्यांच्या तोंडावर जोडे मारुन काळे झेंडे दाखवत तोंडावर काळी पट्टी बांधून जाहीर निषेध व्यक्त केला. विधानभवनात झालेल्या अंतिम सुनावणीत पात्रतेच्या लढाईमध्ये हेतू पुरस्कर सुप्रीम कोर्टाने निरीक्षणे नोंदवून अपात्रतेच्या निकालासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली होती. त्यास हरताळ फासून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विश्‍वासघात करून यांच्या पाठीत खंजिर खुपसला. लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवून खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करणाऱ्या, नार्वेकर यांचा तहसील चौकात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून व तोंडावर…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील रेल्वे स्टेशनवर गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी जीपीएस मित्र परिवाराने रेल्वेच्या ऑन ड्युटी ऑफिसरला निवेदन दिले आहे. यावेळी जीपीएस मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रेल्वे स्टेशनवर भेट देण्यासाठी रेल्वेचे डीआरएम निरज वर्मा येणार होते. नेमकी त्याचीच संधी साधून येथील जीपीएस मित्र परिवाराने त्यांना खान्देश एक्स्प्रेस, सुरत भुसावळ फास्ट पॅसेंजर, अमरावती-सुरत या गाड्यांना येथे थांबा मिळावा, या मागणीसाठी निवेदन देण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते न आल्याने हे निवेदन येथील ऑन ड्युटी ऑफिसर रामप्रसाद भौमिक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पाळधी हे रेल्वे स्टेशन पश्‍चिम रेल्वेचे सुरतपासून शेवटचे तर भुसावळपासून पहिले स्टेशन…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते २१ जानेवारी दरम्यान मंदिर स्वछता अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी मंगळवारी, १६ जानेवारी रोजी भुसावळ येथील श्री अष्टभुजा देवी मंदिरापासून स्वच्छता व सुशोभीकरणास प्रारंभ केला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम चंद्राच्या अयोध्याधाम येथे येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी विराजमान सोहळा व मंदिर उद्घाटनाचे भव्य आयोजन केले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर व परिसर स्वछता अभियान करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी मंदिर स्वच्छता अभियानास मंगळवारपासून प्रारंभ केला. सकाळी भुसावळ…

Read More