Author: Sharad Bhalerao

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील नगरपरिषद हद्दीतील बगीचा देखभाल दुरुस्ती करण्याबाबत जी निविदा काढण्यात आली. त्यात दर महिन्याला अंदाजे २० हजार रुपये बिल ठेकेदाराला प्राप्तीसाठी एकाच गट नंबरमधील बगीचा दोन वेगवेगळ्या नावाने निविदा काढण्याचा घाट, कुटिल डावपेच यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता यांनी रचल्याचे समोर आले आहे. १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक सर्वसाधारण निविदेमधील अ.क्र.१५ आणि अ.क्र.१७ चे प्रत्यक्ष वाचन केले असता यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्र.३३ व्यासमंदिर येथील बगीच्या देखभाल दुरुस्ती करणे व अ.क्र.१७ चे अवलोकन केले असता यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्र.३३ महादेव मंदिर येथील बगीचा देखभाल दुरुस्ती करणे असा स्पष्ट उल्लेख आहे. गट…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गेल्या १२ डिसेंबर २०२३ रोजी सक्षम पुराव्यासहित तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर गेल्या १० जानेवारी २०२४ रोजी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले होते. मात्र, शासनाने त्याची काही दखल घेतली नाही. म्हणून शेतकऱ्यांनी २०२१ मध्ये अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे ३३ टक्क्याच्यावर नुकसान झाले होते. त्या संदर्भ तारखेला सक्षम पुराव्यानिशी लेखी निवेदन दिले आहे. परंतु साधारण २७ महिन्याचा दीर्घ कालावधी उलटला तरीही शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. म्हणून दु:खी होऊन सर्व शेतकरी कार्यालयासमोर १८ जानेवारी २०२४ पासून ते १९ जानेवारी २०२४ पर्यंत शासकीय कामाच्या दिवशी सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी चार…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावद्वारे राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील माध्यमिक विद्यालयात नुकताच सांस्कृतिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संगीत, गायन, नृत्य तसेच पथनाट्याच्या माध्यमातून आपले कलाप्रकार प्रदर्शित करून सांस्कृतिक दिवस कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभाग घेतला. सुरुवातीला युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीते, पोवाडे, जनजागृतीसाठी पथनाट्य व मनमोहक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला गणेशपूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटोळे, पर्यवेक्षक लखन पाटील, अरुण अहिरे उपस्थित होते. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र, जळगावचे जिल्हा युवा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील प्रताप हायस्कुलमध्ये गेल्या १६ जानेवारीपासून पाच दिवशीय तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले जात आहे. प्रशिक्षणाचा समारोप शनिवारी, २० रोजी होणार आहे. हा प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा आहे. तालुकास्तरीय प्रशिक्षणाला जवळपास २०६ शिक्षक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणात मुलांना एकतर्फी शिकविण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होईल, क्षमता विकसित होतील, आपल्या समोरील आव्हाने स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील, स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, यासाठी शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाची रचना केलेली आहे. यामध्ये व्हिडिओ पाहून त्यावर चिंतन व आपले विचार स्वाध्यायाच्या स्वरूपात लिहिणे हा प्रशिक्षणाचा आत्मा आहे. प्रशिक्षणाला तालुका गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील हे…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील शेतकरी संघाची निवडणूक लागलेली आहे. त्यात पंधरा जागांसाठी ६३ उमेदवारांनी अर्ज भरले आहे. येत्या २४ जानेवारी रोजी माघारीसाठी अंतिम मुदत असून सर्व पक्षांनी अर्र्ज भरले आहे. निवडणुकीसाठी पाचोरा तालुक्याचे आ.किशोर पाटील आणि माजी आ.दिलीप वाघ यांनी युती केली आहे. त्यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांनी नऊ उमेदवार उभे केले आहे. आ.किशोर पाटील यांचे सहा उमेदवार आहे. तसेच वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांनीही पंधरा जागेसाठी अर्ज भरले आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या. त्यानंतर दिलीप वाघ आणि आ. किशोर पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी माझे वडील प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळीत सक्रीय होते. ते गेल्यानंतरच्या अत्यंत कठीण काळात याच परिवाराने मला पाठबळ दिले, जगण्याची उमेद प्रदान केली, असे भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले. त्या प.पू. ब्रह्माबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. सामनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात ब्रह्मा बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यानंतर केंद्राच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांनी आपले कुटुंब आणि प्रजापिता…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली. स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राजेश पांडे (सदस्य : राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी ना.अनिल पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) होते. यावेळी खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्षा माधुरी पाटील, विश्‍वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, सीए नीरज अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य विनोद पाटील, चिटणीस तथा प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ, डॉ.कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, डॉ.व्ही.बी. मांटे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.पराग…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील येवती येथील तब्बल १४ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या लाखो रुपये किमतीच्या केबल चोरीला गेल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. येवती येथील विनोद दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली की, ते गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या कूपनलिकेतील केबल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वतःच्या शेतामधील इतर कूपनलिकांच्या केबलचा शोध घेतला असता त्या सुद्धा चोरीला गेल्याचे दिसले. नंतर त्यांनी इतर शेतकऱ्यांची माहिती घेतली. त्यात परिसरातील १३ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची केबलची चोरी गेल्याचे समोर आले. या आधी तीन महिन्यांपूर्वी शिंदे यांच्या शेतातून केबल…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रम १८ जानेवारी २०२४ पासून महाविद्यालयात सुरू झाले. त्या अंतर्गत प्रथम सत्रात गुलशन कुमार ब्रांच मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, भुसावळ यांनी बँक व्यवहारासंबंधी युवतींमध्ये जनजागृती केली. त्यामध्ये विविध खाती आरटीजीएस एनईएफटी युपीआय यासंबंधीची विस्तृत माहिती दिली. तसेच हॅकर्स कशा पद्धतीने खातेधारकांची फसवणूक करतात व ती रोखण्यासाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात शैक्षिक आगाज व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी कृषी संदर्भातील विविध योजनांची माहिती दिली.…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी मातृतीर्थ सिंदखेड राजाची सुकन्या कविता विनायकराव जाधव-पाठारे यांना अलीकडेच फॉरएव्हर स्टार इंडिया (एफएसआयए) ‘मिसेस इंडिया महाराष्ट्र २०२३’ ची विजेती म्हणून गौरविण्यात आले. एफएसआयए ही भारतातील सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ही स्पर्धा ग्रँड फिनाले जयपूरच्या मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित केली होती. कविता ह्या मूळची सिंदखेड राजा, जि.बुलडाणा येथील रहिवासी आहे. त्या सध्या मुंबईत वास्तव्याला आहे. त्या भारतीय कपास निगमचे महाव्यवस्थापक विनायक गोपाळ जाधव यांच्या कन्या आहेत. तसेच बुलडाणा जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष तथा पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या भगिनी आहे. कविता यांनी हे प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावले आहे. त्या भारतातील एका आघाडीच्या फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये सहयोगी…

Read More