Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीचे उद्घाटन महमंडळाच्या अध्यक्षा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी येत्या १ फेब्रुवारी रोजी कलानंद बालमेळावा आयोजित केला आहे. बालमेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी प्रताप तत्वज्ञान केंद्रात नुकतीच कार्यशाळा पार पडली. बाल मेळाव्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्या मुला-मुलींसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित केला आहे. बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगावचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बालमेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थिनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. बाल स्वागताध्यक्षपद डी.आर.कन्या हायस्कुल, अमळनेरची विद्यार्थिनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रायपूर येथे सोमवारी, २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम, माता सिता, भैया लक्ष्मण, राम भक्त हनुमान यांची एकत्रित मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना हनुमान टेकडी येथे करण्यात येत आहे. त्यानिमित्त मोठ्या थाटात श्रीराम मूर्ती व श्री धाम अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलश यात्रा (मिरवणूक) २० जानेवारी रोजी मोठ्या थाटात काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, पुरुष, आबालवृद्ध सहभागी झाले होते. मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी रविवारी, २१ जानेवारी रोजी हनुमान टेकडी येथे श्रीराम लिहिलेल्या वह्यासह पाया भरणी करून ओटा तयार करण्यात आला. त्यासाठी सीताराम परदेशी, प्रवीण परदेशी, वसंत धनगर, राहुल परदेशी, लोकेश परदेशी, अक्षय राजपूत, राजेंद्र परदेशी, करण…

Read More

साईमत, पारोळा : प्रतिनिधी पारोळ्याजवळ गॅस सिलिंडरच्या टँकरचा अपघात झाल्याची घटना शनिवारी, २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझविण्यात आली होती. आगीत कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने गॅस सिलेंडरने भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी, २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा येथील तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन पथक आणि रुग्णवाहिका…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी अयोध्या येथे सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यावल शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात विविध मंदिरांमध्ये आणि ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. तसेच भगव्या पताका, झेंडे मोठ्या उत्साहाने लावली जात आहेत. तालुक्यातील विरावली येथे संपूर्ण गाव ‘भगवेमय’ झाले. संपूर्ण परिसरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. विरावली येथे राममंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त विरावली येथे मंदिरासह गावात सजावट करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सभापती कृऊबास यावल मुन्ना पाटील, उपसरपंच ईश्‍वर पाटील, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, समाधान पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, भागवत पाटील, कैलास पाटील, विरावलीकर महिला…

Read More

साईमत, मलकापूर: प्रतिनिधी बजाज फायनान्सवरून लोन देतो, असे सांगून वेळोवेळी ६ लाख ४८ हजार २७४ रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखांच्या साहित्याचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. याघटनेवरुन कुणीही ऑनलाईन माध्यमातून कोणत्याही भुलथापांना बळी पडु नये, असे आवाहन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना केले आहे. सविस्तर असे की, नमुद गुन्ह्यातील फिर्यादी निवृत्ती महादेव रोकडे (वय ४०, रा. काटी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांना नमूद आरोपी बसंतकुमार राधाकांत साहु (वय ३०, रा. ग्राम कचरु, ता. हिंजली, जि. गंजाम, राज्य ओडीसा, ह.मु अमन नगर चाळ कुर्ला, प.) याने बजाज फायनान्स कंपनीद्वारे लोण मिळवुन देतो,…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील बुधवार पेठ येथे शुक्रवारी, १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पताका लावण्याच्या शुल्लक कारणावरून दगडफेक झाली. याठिकाणी काही कार्यकर्ते चौक सुशोभिकरणाचे काम करीत असतांना याठिकाणी पताका लावण्याचे शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे परिस्थिती तणावग्रस्त निर्माण झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविले. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असून निंभोरा, फैजपूर, सावदा, वरणगाव येथील पोलिसांना पाचारण केले आहे. मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपोनि विनोद खांडबहाले, निंभोऱ्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ आदी…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी अयोध्या येथे येत्या सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह, राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात ९० टक्के ठिकठिकाणी भगव्या झेंड्यांनी, पताक्यांनी सजावट केली आहे. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सजावटीचे काम सुरू आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात नशिराबाद टोल नाक्याजवळ एकही आणि परिसरात एकही भगवा झेंडा किंवा पताका लावलेला आढळून आला नाही. त्यामुळे टोल नाका कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) विभागाला तथा अधिकाऱ्यांना ‘भगव्या झेंड्याची’ ॲलर्जी आहे का..? त्याचा खुलासा जळगाव जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनी करायला पाहिजे, असे सर्व स्तरातून चर्चिले जात आहे. अयोध्या येथे सोमवारी, २२ जानेवारीला…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. प्रमुख मागण्यांचे निवेदन बोदवड येथील तहसिलदारांना देण्यात आले. आंदोलनात शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये सर्व शेती मालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी झाला आहे. म्हणून सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. तसेच शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीतील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, पिक विमा होणारे शेतकऱ्यांचे बंद…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये बाह्यस्त्रोत कामगारांचे ठेकेदारासह अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मागील चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील दोन आमदार व खासदार प्रयत्नशील आहेत. तसा शब्दही लोकप्रतिनिधींकडून कंत्राटी तंत्रज्ञांना वेळोवेळी देण्यात आलेला आहे. मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी तंत्रज्ञांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलने करावे लागत आहेत. कंत्राटी तंत्रज्ञांच्या उपोषणानंतर संभाजीनगर येथील ठेकेदाराने त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. परंतु मागील काही वर्षांपासून कार्यरत काही कंत्राटी तंत्रज्ञांना कामावरून कमी केले. संताप जनक म्हणजे म्हणजे कंत्राटी कामगारांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन थकीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराने ठेका बंद…

Read More