परदेशातून फसवणुकीतून मिळालेला पैसा भारतात आणण्याचे विविध मार्ग उघड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील मुमराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्म हाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर चालवित असल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा कॉल सेंटरद्वारे परदेशातील नागरिकांना फोन करून आर्थिक फसवणूक केली जात होती. पोलिसांनी रविवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता छापा टाकून संबंधित ठिकाणावर सात जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, अटक केलेल्या सात जणांना सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितले की, कॉल सेंटरद्वारे अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना ‘ॲमेझॉन कस्टमर केअर’ असल्याचे…
Author: Sharad Bhalerao
सोहळ्यात पाद्यपूजन, अभिषेक, नामसंकीर्तन, महाआरतीसह प्रसाद वाटपाचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील कुसुंबा येथील सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे स्वामी समर्थ शाळेजवळील सद्गुरू पादुका व कल्पवृक्ष शिवमंदिर, गट नं. ३८६, पुरुषोत्तम पाटील नगरात स.स. दत्ता आप्पा महाराज यांचा १७ वा पुण्यतिथी सोहळा आश्विन शुद्ध अष्टमी, मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. सोहळ्यासाठी सकाळपासून भाविकांची लक्षणीय उपस्थिती राहील. नवरात्री उत्सवानिमित्त कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सोहळ्यानिमित्त सकाळी ९.ते ९.३० वाजता पाद्यपूजन, अभिषेक, दासबोध ग्रंथ पूजन व वाचन, ९.३० ते १०.३० वाजता सत्संग, सकाळी १०.३० ते ११.३० वाजता सुनील जाखेटे आणि इस्कॉन परिवाराच्यावतीने नामसंकीर्तन त्यानंतर ११.३०…
सर्पमित्रासह वन्यजीव तज्ज्ञांची मदत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सुप्रीम कॉलनीतील शिवाजी शितोळे यांच्या घरात दुर्मिळ आणि निमविषारी वर्गात येणारा भारतीय अंडीखाऊ साप आढळला होता. त्यानंतर घरच्या लोकांनी तातडीने सर्पमित्र अशोक खामकर यांना फोन करून मदतीची मागणी केली. त्यानंतर त्यांनी वेळ न गमावता घटनास्थळी जाऊन सापाला सुरक्षितपणे पकडून घरातील लोकांना भयमुक्त केले. वन अधिकारी अजय रायसिंगे, वनपाल उमेश कोळी, सर्पमित्र प्रदीप शेळके, राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे सांगण्यात आले. सर्पमित्रांच्या मते, हा साप निमविषारी असून मानवासाठी हानिकारक नाही. तरीही दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.
दहावी, बारावी, पदवी, पदविकांसह अन्य परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंतांना सन्मानित करून मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दहावी, बारावी, पदवी, पदविका आणि अन्य परीक्षेत उत्तीर्ण ४५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवारी, २८ रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी सुरेश चौधरी होते. सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजू मामा भोळे तसेच व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव नारायण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभात विद्यार्थ्यांना ऑफिस बॅगसह प्रशस्तीपत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची सेवा करणे, अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आणि सदैव शिस्तीने जीवन घालविण्याविषयी आ.…
धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव विमानतळावर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ असा शासन आदेश लागु करावा, अशी मागणी केली. तसेच उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तातडीने भेट घ्यावी आणि अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्ती करावी, अशी धनगर समाजाची ठाम मागणी असल्याचे बोलूनही दाखविले. मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करुन लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे जालना येथील उपोषणस्थळाकडे लक्ष वेधले. जिथे दीपक बोराडे यांनी १२ दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. अद्यापपर्यंत कोणताही मंत्री त्यांना भेटीसाठी गेलेला नसल्याने समाजात संताप आणि आक्रोश निर्माण झाला असल्याचे निदर्शनास…
जळगावातील बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्यात प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : योग्य जोडीदाराची निवड करताना व्यक्तीने कुटुंब, समाज आणि देशहिताचा विचार करावा. गौतम बुद्धांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अनुसरावेत. तरुण-तरुणींना आपले संसारिक जीवन सांभाळतानाच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ राजेश झाल्टे यांनी केले. ते बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. सुरुवातीला सुभाष सपकाळे, मुकेश जाधव यांनी बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशीलाने केली. मेळाव्यास राज्यभरातून बौद्ध वधू-वर उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक संजय इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागुल, ॲड.पंकज मेढे, दिलीप सपकाळे, रवींद्र इंगळे, भारती रंधे, मनीषा सुरवाडे, उमेश…
सुरक्षेच्या बळकट भिंती ठरताहेत निष्फळ…? सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा कारागृहासारख्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच दोन कैद्यांनी तिसऱ्या कैद्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्राप्त माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (वय २०) हा कैदी शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास बॅरेक क्रमांक १३ जवळ उभा होता. त्यावेळी शिक्षा भोगत असलेले कुणाल गोपाल चौधरी आणि अजय मोरे या कैद्यांनी विनाकारण ठाकरेला शिवीगाळ केली. पुढे त्याला बॅरेकमध्येच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर जखमी सोहम ठाकरेने थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत हल्लेखोरांविरोधात तक्रार…
आसोद्यातील सार्वजनिक विद्यालयात आयोजित व्याख्यानात प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाचा ‘मंत्र’ असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रद्धा चांडक यांनी केले. जळगाव तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात लिनेन क्लबच्यावतीने आयोजित “कॅन्सर रोगनिदान” विषयावरील व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लिनेन क्लबच्या अध्यक्षा रेश्मा बेहरानी, विजू बाफना, रेखा वर्मा आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कॅन्सरचा आजार शरीराच्या कोणत्याही अवयवाला होऊ शकतो.तंबाखू, गुटखासारख्या व्यसनांमुळे मुख व आतड्यांचा कॅन्सर वाढतो. तसेच विद्यार्थ्यांना…
प्रासंगिक लेख…! भारतीय सांस्कृतिक-धार्मिक जीवनात विविध सण, उत्सव आणि राष्ट्रीय स्मरणदिन यांचा एक मुक्त प्रवाह आहे. अनेकदा हे दिवस स्वतंत्रपणे येतात. पण यंदा २०२५ एक अत्यंत दुर्मिळ योग जुळवून घेऊन आला आहे. दसरा (विजयादशमी) आणि महात्मा गांधी जयंती हे दोन्ही दिवस यंदा गुरुवारी, २ ऑक्टोबर जुळून आले आहेत. हा योग एका साधारण कल्पनेपेक्षा अधिक आहे. कारण तो दृष्टिपथ बदलतो. धर्म, राष्ट्रवाद, सत्याग्रह, कल्याण आणि सामाजिक आदर्श यांच्या संगमाचा दिवा दिपतो. प्रस्तुत लेखातून वाचकांना माहिती व्हावी, यासाठी एकत्रिताचा सामाजिक, धार्मिक, प्रतीकात्मक आणि राजकीय परिमाणावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा २ ऑक्टोबर २०२५ हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या…
मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती आकडेवारीसह सादर करुन जिल्हाधिकाऱ्यांची मागणी साईमत/जळगाव/ विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती आकडेवारीसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यासह नुकसान भरपाईसाठी ११५ कोटींची मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस धुळे येथे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मुंबईने विमानाने जळगाव विमानतळावर शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी आले होते.त्यावेळी श्री. प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे नमूद करून ५१८ गावे बाधित असल्याचे म्हटले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या एक लाख ५२१ असल्याचे अहवालात नमूद केले आहे. मनुष्यहानीत पाच व्यक्तींचा मृत्यू…