साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत’ मोहीम राबविली जात आहे. मोहिमेत जिल्ह्यातील ५२ गावे समाविष्ट केली आहेत. त्यात मुक्ताईनगरमधील वायला आणि माळेगाव अशा दोन ग्रामपंचायतींची निवड केली आहे. ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून माळेगाव येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व ग्रामस्थांची एक सभा घेण्यात आली आहे. सभेत आरोग्य विस्तार अधिकारी शिवदास राठोड यांनी मोहिमेचा अजेंडा समजून नागरिकांना सांगितला. क्षयरोग विभागाचे तालुका पर्यवेक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी क्षयरोग आजाराची लक्षणे, उपचार पद्धती व नागरिकांच्या क्षयरोग प्रसार रोखता यावा, यासाठीच्या नैतिक जबाबदारी व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. ही मोहीम राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनानुसार डॉ.विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा पत्रकार हरिभाऊ राऊत यांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणि शिक्षण परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी खासदार तथा राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, पोलीस उपाधीक्षक एल.एन.कानडे (नाशिक), सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप पाटील यांच्या हस्ते पहूर येथील क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सहपरिवार व सहकारी यांच्यासह सन्मानित…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी आयुष्यात खूप अडचणी येतील. संकटे येतील. त्यांना पाहून थांबू नका. पुन्हा कामाला लागा. संकटे पुन्हा पुन्हा येत असतील तर वेळेवर मार्ग बदलावा लागला तरी चालेल पण चालत रहा. सतत आपली अध्ययन करण्याची भूक सुरु ठेवा. थांबू नका, असे प्रतिपादन श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे यांनी केले. येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलीत अहिल्यादेवी कन्या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा ज्ञानज्योत आदान-प्रदान व शुभेच्छा प्रधान कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी कादंबरी चौधरी, ललिता चौधरी, अक्षता देवडा, जयश्री सोनार यांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. तसेच शाळेतील…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी शहरातील सर्वात जुनी आणि पहिली कॉलनी असलेले विद्यानगरात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कॉलनीत हाकेच्या अंतरावर नगरपालिका, प्रांत कार्यालय, डीवायएसपी कार्यालय आहे. याकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचा संताप होत आहे. स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच नगरपालिका ‘केराची टोपली’ दाखवत असल्याने नागरिकांचा संताप होत आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टरला समस्या सांगूनही काम होत नसल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अलीकडे सर्व प्रकारचे कर भरण्यासाठी नागरिकांना सक्त ताकीद दिली जाते. विद्यानगरमधील रहिवाशांची शंभर टक्के कर वसुली आहे. तरीही नागरिकांच्या प्राथमिक पायाभूत सोयी सुविधांकडेच दुर्लक्ष केले जाते. विद्यानगरमधील…
साईमत, रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील उद्योगपती श्रीराम पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत बुधवारी, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. श्रीराम पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व व त्यांची कार्यशैली यावर प्रभावित होऊन त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्रीराम दयाराम पाटील (चेअरमन श्रीराम उद्योग समूह), शितल रमेश पाटील (मा. नगराध्यक्ष नगरपरिषद, रावेर), अब्दुल मुत्तलीफ (मा. उपनगराध्यक्ष नगरपरिषद, रावेर), सचिन अशोक मोरे (उपसरपंच, बोरावल, ता. यावल),…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे माजी आमदार वामनराव चटप, युवा आघाडी विदर्भ प्रमुख मुकेश मासुरकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुरेशराव वानखेडे, पश्चिम विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष श्याम अवथळे, तेजराव मुंढे, प्रा.राम बारोटे, एकनाथ थुट्टे, देवीदास कणखर, समाधान कणखर, रमेशसिंह चव्हाण, नामदेवराव जाधव, रणजित डोसे, दामोदर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खान्देश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर रणथम चिखली येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी महामार्ग जवळपास एक तास रोखुन धरला होता. यामुळे महामार्गावरील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती. केंद्र सरकारने लवकरात लवकर विदर्भाचे स्वतंत्र राज्य…
साईमत, यावल : प्रतिनिधी यावलसह रावेर तालुक्यात राजकीय प्रभावामुळे पिवळी माती वाहतूक करताना ती पिवळी माती जादूने गाळ होत असल्याचे चर्चिले जात आहे. पिवळ्या मातीची वाहतूक करणारी वाहने यावल पोलीस, यावल तहसील कार्यालयाच्या समोरून बिनधास्तपणे सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे यावल तालुक्यात गाळ वाहतूकच्या नावाखाली उंच टेकड्याचे सपाटी करण करून पिवळ्या मातीचा बेकायदा गोरख धंदा सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर गौण खनिजाची लूट आणि शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम सुरु असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. यावलसह रावेर तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी उद्योग व्यवसायासाठी आणि बिनशेती जागांवर जेसीबी मशिनरीच्या सह्याने उंच टेकड्याचे सपाटीकरण करून त्या ठिकाणची पिवळी माती व्यावसायिक वापरासाठी वापरली…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुक्यातील पाळधी खु.भागातील शनीनगरात मध्यरात्रीच्या सुमारास मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. याप्रकरणी नागरिकांनी दोघा चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. धरणगाव तालुक्यातील पाळधी खु.भागातील शनीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास शेख असलम शेख रहीम यांची मोटार सायकल (क्र. एमएच १९ डीसी ९७०६) दोन चोरटे चोरून नेत होते. मात्र, त्याचवेळी काही जणांना काहीतरी आवाज आल्याने त्यांनी दोघांचा पाठलाग केला. त्यांना पाळधी पोलीस चौकी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून मोटार सायकलही ताब्यात घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी अशरफ मोहम्मद हनीफ, शेख सद्दाम शेख शरीफ (दोन्ही…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीवर प्रताप महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून दरवर्षी एका प्राध्यापकाची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात येते. परंतु यावर्षी निवडणुकीसाठी एकमत न झाल्याने उपप्राचार्य प्रा. पराग पाटील आणि प्रा.डॉ. विजय तुंटे यांच्यात चुरशीची लढत झाली. चुरशीच्या लढाईत प्रा.पराग पाटील यांचा विजय झाला. निवड जाहीर झाल्यानंतर त्यांना निवडीचे पत्र महाविद्यालयाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.एच.निकुंभ यांनी दिले. निवडणुकीसाठी स्थानिक निवड समितीचे सदस्य उपप्राचार्य प्रा.डॉ.जे.बी. पटवर्धन, प्रा.डॉ.नलिनी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.यु.जी.मोरे, डी.बी. कांबळे, जे.एन.पाटील यांनी काम पाहिले. निवडणुकीच्या कामी राकेश निळे, भटू चौधरी, विजय ठाकरे,…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची बैठक मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी यावल वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान मेघे होते. बैठकीत अनेकांसह महिलांनीही पक्षात प्रवेश केला. बैठकीत मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील होत्या. यावेळी बैठकीचे प्रमुख विषय त्यांनी मांडले. त्यात जि.प., पं.स.गट, गणात बैठकीचे आयोजन करणे, बुथ कमिटी व सर्कल आढावा तसेच पक्ष बांधणी, नवीन शहर कार्यकारिणी व ग्रामीण शाखा बांधणे, गाव तिथे शाखा, घर तेथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करणे, वंचित बहुजन आघाडीच्या पक्षात ओबीसी व मुस्लिम…