Author: Sharad Bhalerao

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात क्रांतीसूर्य संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर होत्या. यावेळी हिवरसिंग राठोड, चरणसिंग राठोड या पालकांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मयुरी राठोड, नंदिनी राठोड, प्रियंका राठोड या विद्यार्थिनींनी बंजारा गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. याप्रसंगी दुर्गा राठोड, जागृती चव्हाण, राणी राठोड यांनी मनोगतातून क्रांतीसूर्य सेवालाल महाराज यांच्या कार्याची माहिती विशद केली. माधुरी बारी यांनी शिक्षक मनोगतातून सेवालाल महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शिक्षक,…

Read More

साईमत, रायपूर, ता. जळगाव : वार्ताहर येथील कै. घनश्‍याम जयराम राजपूत बहुउद्देशीय संस्था संचलित मयुरेश्‍वर इंग्लिश मीडियम स्कुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. त्यात चिमुकल्यांनी विद्यार्थ्यांनी रामायण महाकाव्य, महानाटिका, अध्यात्मिक पौराणिक पवित्र महाकाव्य रामायण बाल महानाटिकाद्वारे कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुमित जोशी जामनेर, सचिन देशमुख, चाळीसगाव, संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र परदेशी, सचिव जयसिंग परदेशी, रायपुरच्या सरपंच रंजना सपकाळे, कुसुंबाचे सरपंच यमुना ठाकरे पोलीस पाटील रामसिंग परदेशी, उपसरपंच वसंत धनगर तसेच प्रवीण परदेशी (ग्रा.पं.सदस्य, माजी प्र.सरपंच तथा शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख), उषा परदेशी (ग्रा.पं. सदस्या, माजी उपसरपंच) पुष्पा परदेशी (ग्रा.पं.…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर येथील आर. टी. लेले हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीसिंह सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर भाषणे दिली. इयत्ता अकरावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत आणि बोलीभाषेत गीत गायन केले. तसेच काही विद्यार्थिनींनी पारंपरिक नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडून घडविले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, सेवालाल महाराज यांची शिकवण आजही समाजाला मार्गदर्शक आणि दिशादर्शक असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच एम. एस. आगारे, व्ही.व्ही.बोरसे, आर.टी.देशमुख…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत २०२२-२३ राज्यस्तरीय कार्यशाळा ‘श्री अन्न निरंतर’ नाशिक येथे मधुरम लॉनमध्ये नुकतीच घेण्यात आली. त्यात जामनेर येथील तालुका कृषी अधिकारी डॉ.अभिमन्यू चोपडे आणि पोकरा योजनेचे समूह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे यांनी तालुकास्तरावर सेल्फी पार्इंन्ट, प्रभात फेरी, मिलेट दौड, पाककला स्पर्धा, आंतरराष्ट्रीय योगा दिवस, कार्यशाळा, शिबिर, प्रशिक्षण, प्रदर्शन यांचे उत्कृष्ट नियोजन करुन यशस्वी पार पाडले. याबद्दल दोघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेत जामनेरचे डॉ.अभिमन्यू चोपडे आणि पोकरा योजनेचे रुपेश बिऱ्हाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोहन वाघ (विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक), संभाजी ठाकूर ( विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक), सुनील वानखेडे…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत अनिल धनराज सरोदे आणि दगडू गेंदू पाटील यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तूंची तथा संसाराची राखरांगोळी झाली होती. घटनेची यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ दखल घेऊन दोन्ही कुटुंबियांना महाराष्ट्र शासन आणि जळगाव जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने आपदग्रस्तांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन योजनेअंतर्गत मदतीचा हात पुढे केला आहे. तालुक्यातील डोंगरकठोरा येथे गेल्या १० फेब्रुवारी रोजी येथील अनिल धनराज सरोदे आणि दगडू गेंदू पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. तसेच त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. त्यात जीवनावश्‍यक वस्तू व रोख रक्कम असे सहा लाखांच्यावर दोघांचे नुकसान झाले होते.…

Read More

साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर येथील स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत अनेक सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांनी केवळ पोकळ घोषणा करून गावासाठी काहीतरी करत आहोत, या गावासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे आहे, असे दाखवित होते. त्यांनी अनेकदा गावासाठी लागणारी रुग्णवाहिका कागदावरच दाखवली होती. मात्र, साकेगावचे प्रभारी सरपंच सागर सोनवाल, साकेगावच्या प्रभारी ग्रामविकास अधिकारी कांचन बादशहा यांच्या माध्यमातून अखेर साकेगावला रुग्णवाहिका मिळाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच गुरुवारी सकाळी प्रथमच रुग्णवाहिका घेण्यासाठी येथील शोरूमला साकेगावचे प्रभारी सरपंच सागर सोनवाल, ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी कांचन बादशाह, ग्रामपंचायत सदस्य पती गजानन पवार यांच्यासह अन्य रुग्णवाहिकेची चावी घेतांना उपस्थित होते. येथील स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत अनेक मोठ्या घोषणा…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित केला आहे. त्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहे. याचनिमित्त बोदवड शहरांमध्ये उजणी रस्त्यावरील जिजाऊ बाल उद्यानमधील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरात तसेच गावागावात मुख्य चौकात स्वराज्य पताका, झेंडे, बॅनर लावून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाचा एक भाग म्हणून स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मोहिमेत तालुकाध्यक्ष निवृत्ती ढोले, कार्याध्यक्ष संतोषसिंग राणा, संजय काकडे…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी यावल नगरपरिषदेच्या मालकीचे साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ आदी महत्त्वाची यंत्रणा चालविणे आणि देखभाल करण्यासाठी ठेकेदारीच्या माध्यमातून मजुरांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियेत संबंधित ठेकेदार, यावल नगरपालिका मुख्याधिकारी आपल्या सोयीनुसार मजुरांना बिले देऊन कारभार करीत असल्याने ही अति महत्त्वाची आरोग्य विषयक कामे करून घेताना नियुक्त मजुरांची पात्रता, बौद्धिक क्षमता खड्ड्यात घालून यावल नगरपरिषद आर्थिक उलाढाल करीत आहे. त्यामुळे यावल शहरातील इतर पात्र ठेकेदार आणि मजूर वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता पाणीपुरवठा यंत्रणातील मजूर पुरवठा (काम तत्त्वावर) करण्याबाबत यावल नगर परिषदेच्या मालकीचे साठवण तलाव चालविणे व देखभाल करणे आदी…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गायत्री शक्तीपीठ येथे वसंत पंचमीनिमित्त नुपूर कथ्थक डान्स ॲकॅडमीच्यावतीने ‘वसंतोत्सव’ शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी केले होते. सायंकाळी गायत्री मंत्र पठाणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला सरस्वती वंदना माहिता सुरी, शांभवी निनावे, नुपूर भालेराव, भार्गवी उंबरकर यांनी सादर करून वातावरण निर्मिती झाली. कार्यक्रमात ‘राग बहार’मध्ये ‘आई रे आई ऋतु बसंत छाई’ यावर संजीवनी लाहोटी, सुनीता दरगड, मोक्षदा तळेले, अंजली ठाकूर यांनी नृत्य सादर केले. ‘बन्सीवालेने घेर लई’ गाण्यावर मानसी टेकवानी, पाही लद्धा, भूमिका भोसले, शार्वी लाहोटी, धनश्री भुरे, तेजस्वी पाटील यांनी सादरीकरण केले. यानंतर गायत्री वंदना गार्गी पुसतकर, यज्ञा पाटील, मानसी पवार, तनिष्का पाटील…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात बुधवारी, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना. सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील आणि संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद…

Read More