Author: Sharad Bhalerao

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेसह एरंडोल रोटरी क्लबतर्फे मदतीचा हात साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे म्हसावद नाक्याजवळील कुंभारवाडा आणि फकीरवाडा परिसरातील अनेक परिवाराला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. घरात पाणी शिरल्यामुळे वस्तूंचे, घरगुती साहित्याचे तसेच व्यवसायिक साधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा भीषण परिस्थितीत जळगाव येथील ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ आणि ‘रोटरी क्लब एरंडोल’ यांनी पुढाकार घेत संवेदनशील मदतीचा हात पुढे केला. ह्या संस्थांच्या माध्यमातून शनिवारी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी पूरग्रस्त नागरिकांना धान्य, डाळ, तेल, ब्लँकेट आदी जीवनावश्यक वस्तूंचे किटचे घरपोच वाटप केले. यासोबतच संस्थेच्या सदस्यांनी पूरग्रस्तांना मानसिक आधार देत धीर दिला. शासकीय मदत पोहोचण्याआधीच सामाजिक…

Read More

कोजागिरीची रात्र संवाद अन्‌ आपलेपणाचा सण निसर्ग आणि मानवी मनाचा संगम म्हणजे शरद ऋतूतील ‘कोजागिरी पौर्णिमा’. कोजागिरीच्या आकाशात रुपेरी चांदणे उधळले असते. रात्री वारा थंडगार आणि मनात एक वेगळीच प्रसन्नता दाटली असते. ही रात्र केवळ चंद्र पाहण्याची नाही तर ही रात्र आहे मनशांती शोधण्याची… आपलेपणा अनुभवण्याची…कृतज्ञतेची. नवरात्रीच्या ‘फेस्टीव्हल’ नंतर आता सोमवारी, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र साजरी होणार आहे. त्यावर आधारित दै. ‘साईमत’च्या वाचकांच्या ज्ञानात भर पडावी, ह्या हेतूने प्रस्तुत लेखातून केलेला प्रयत्न… कोजागिरी पौर्णिमेचा उगम ‘को जागर्ति?’ म्हणजे “कोण जागे आहे…?” या प्रश्नात दडलेला आहे. कथेनुसार, कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीमाता भूमीवर अवतरुन पाहते की, कोण जागी आहे आणि…

Read More

निमखेडी रेल्वे पुलाजवळील घटना ; अग्निशमन दलाचा प्रयत्न व्यर्थ ; आईचा आक्रोश हृदयद्रावक साईमत/जळगाव/पाळधी, ता.धरणगाव/वार्ताहर :   दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला तरुण पाय घसरून वाहून गेल्याची धक्कादायक घटना शहरातील निमखेडी शिवारातील रेल्वे पुलाजवळ तसेच बांभोरीच्या दिशेने असलेल्या गिरणा नदीत शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतरही तरुण मिळून आला नाही. त्यामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या तरुणाचे हिमेश संतोष पाटील (वय १९, रा. मयुरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर, जळगाव) असे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, हिमेश हा आपल्या आई-बहिणीसह राहत होता. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता आई-बहिणीसोबत मूर्ती विसर्जनासाठी तो निमखेडी रेल्वे…

Read More

फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीने उपस्थितांचे वेधले लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नवरात्रीची सांगता होताच गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात रावणदहन उत्सव समितीतर्फे पारंपरिक रितीने रावणदहन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी फटाक्यांच्या रोषणाईने परिसर दुमदुमला तर मान्यवरांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन, नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्यासह पोलीस अधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रावणाचे दहन होताच उपस्थित नागरिकांनी जल्लोष केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणदहन सोहळ्याचे आयोजन समितीतर्फे भव्य स्वरूपात केले होते. सायंकाळी झालेल्या फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सोबतच शहरात दसरा उत्साहात साजरा झाला. 

Read More

पारंपरिक उत्सव साजरा करत नागरिकांनी मानले देवतेचे आभार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  नवरात्रीचा उत्सव संपताच गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून देवीची विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. शहरातील नागरिक, घरगुती मंडळ तसेच सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग दाखवला.सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी देवीच्या भव्य मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पाडले. यावेळी मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस, उत्सव समितीच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विसर्जन सोहळ्यावेळी लोकांनी जल्लोष केला. फटाक्यांच्या प्रकाशात मूर्तींचे विसर्जन झाल्याने परिसर अधिक उजळला. नागरिकांनी पारंपरिक उत्सव साजरा करत देवतेचे आभार मानले. यावेळी उपस्थित मंडळांचे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन विसर्जन सोहळा यशस्वी…

Read More

दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्याप्रतीच्या कृतज्ञतेसाठी ‘अश्वपूजन’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  हिंदू धर्मातील ‘भूतदया’ ही शिकवण किंवा विचाराने प्रेरित होऊन घोड्यांबद्दलची करुणा आणि कृतज्ञता समाजात रुजवावी, अशा हेतूने अश्वपूजनाचा प्रारंभ ‘विजयादशमी’च्या दिनी गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी केला. घोडा हा प्राणी मानवी मैत्रीचे प्रतिक तर आहेच शिवाय शक्ती आणि प्रेमाचा संदेशही त्यात आहे. अशा विचारानेच अश्वपूजनाचा सोहळा साजरा केला. आमच्या विचारांची, उपक्रमाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करून आम्हाला उपकृत केले, अशी भावना दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी व्यक्त केली. पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंट, शिंदे नगर, आरएल कॉलनीजवळ (गुजरात पेट्रोल पंपासमोरील रस्ता) येथे जळगावमधील बऱ्हाटे कुटुंबियांच्या ‘चंपा’, ‘मंगली’, ‘काली’ ह्या घोड्या आणि घोड्याचे पिल्लू ‘रामा’ यांना…

Read More

सातपुडा ऑटोमोबाईल्सचे सुपरवायझर राजेश दुसाने यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी अजिंठा चौफुली लगतच्या सातपुडा ऑटोमोबाईल्समध्ये दुचाकीची खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची तब्बल ४० हजार रुपयांची पिशवी हरवली होती. ती शोधूनही न सापडल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. मात्र, ती रक्कम शोरूममधील कार्यरत सुपरवायझर राजेश दुसाने यांना शोरुमच्या प्रवेशद्वाराबाहेर सापडली. त्यांनी मनात कुठलाही मोह न बाळगता लागलीच मालकांच्या खात्रीने ती पिशवी ग्राहकाला परत केली. हरवलेली रक्कम सुरक्षित मिळाल्याने ग्राहकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दुसाने यांच्या प्रामाणिकपणाचे शोरूमसह सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आजच्या धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचा आदर्श त्यांनी घडवून आणला आहे.…

Read More

कार्यक्रमाद्वारे महिलांच्या सामर्थ्याचा मान्यवरांकडून गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पंडित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एन.एस.ॲडव्हायझरी आणि मू.जे.महाविद्यालय इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त उपक्रमात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमात जळगाव शहरातील कला, सामाजिक, शैक्षणिक, विधी, वैद्यकीय, उद्योजक क्षेत्रातील २५ महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाद्वारे महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश पोहचला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंडित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डाॅ. मंदार पंडित, जवान फाउंडेशनचे ईश्वर मोरे, एन.एस.ॲडव्हायझरीचे संचालक निखिल गडकर, ॲड. हेमंत भंगाळे, अमित माळी, शिल्पा फर्निचरचे संचालक प्रीतमकुमार मुणोत, मनोज सुरवाडे आदी उपस्थित होते. यावेळी अमेय कुलकर्णी, बुद्धभूषण…

Read More

बँकेतील नोकर भरतीबाबतही महत्त्वाची चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीपेठमधील इमारत (दगडी बँक) विक्रीस बँकेच्या काही संचालकांनी विरोध दर्शविला आहे. बँकेतील नोकर भरतीबाबतही महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाची सभा जळगाव येथे बँकेच्या सभागृहात बुधवारी, १ ऑक्टोंबर रोजी झाली. संचालक मंडळाच्या सभेत विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक २१ हा बँकेच्या जळगावमधील नवी पेठेतील जीर्ण झालेल्या वास्तू विक्री संबंधात होता. तथापि, इमारत जागेची गव्हर्मेंट रजिस्टर व्हॅल्यूवरकडून आलेल्या व्हॅल्युएशन रिपोर्टबाबत समाधान न झाल्याने काही संचालकांनी मूळ विषयाला विरोध दर्शविला. यापूर्वी बँकेचे संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी कालच याविषयी आपला विरोध…

Read More

जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने कार्यवाही साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्हा परिषद जळगावचे कामकाज हे वेगवान, पारदर्शक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे सातत्याने सुरळीत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या ४ हजार २४९ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सप्टेंबर २०२५ च्या सेवानिवृत्ती वेतनाची ११ कोटी ५ लाख ९९७ रुपयांची रक्कम दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता थेट बँक खात्यावर जमा केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा दसरा खऱ्या अर्थाने आनंदाचा व गोड ठरला आहे. सीईओ मिनल करनवाल यांनीच दसऱ्याच्या आधीच निवृत्ती वेतन जमा होईल, यासाठी अर्थ विभागास…

Read More