साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी दिगर येथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटमुळे बाजूच्या बंद घराला आग लागली. घरात कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग लवकर आटोक्यात आल्यामुळे सुप्रीम कंपनी व सुरक्षा फायर टीमचे नेरी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. घटनेची माहिती उपसरपंच प्रकाश बोरसे यांना मिळताच त्यांनी तात्काळ गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीच्या श्री.जेहुरकर यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी तात्काळ आपल्या फायर टीमला घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना केल्या. त्यावर सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या मार्गदर्शनखाली सुरक्षा अधिकारी परमेश्वर पाटील स्वतः त्यांची फायर टीम घेऊन व पाण्याचे टँकर घेऊन आग विझविण्यासाठी धावून आले. त्यांच्या मदत कार्यामुळे आग आटोक्यात आली. आग विझविण्यात टीमला अथक…
Author: Sharad Bhalerao
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावदा-पाल महामार्गावर चिनावल येथील दुचाकी स्वार आणि होंडा कंपनीच्या कारचा अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी, ३० एप्रिल रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास कोचूरजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी पोलीस दाखल झाले होते. यावेळी अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. अपघातात चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे (वय २७) आणि अनिल चुडामण मेढे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस (क्र.एम.एच १९ एबी ११०१) आणि होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी.आर.व्ही. (क्र.एमएच १९ डीएम ०३५१) या गाडीचा जबरदस्त अपघात झाला. अपघातात कार चालक…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष व समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्थेचे दशकपूर्ती वर्षानिमित्त सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मवीरांना प्रतिष्ठानतर्फे ‘समाज चिंतामणी राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात समाजसेवा, साहित्य, प्रशासन, कृषी, पर्यावरण, शिक्षण, कला, क्रीडा, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मवीरांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. नामांकनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ठेवलेले नाही. सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी आपले प्रस्ताव येत्या ३० मे पर्यंत केवळ पोस्टानेच पाठविण्याचे आवाहन संस्थेचे…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग हे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कामकाज करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर माता बाल संगोपन केंद्र व प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी तालुक्यातील गरोदर माता, स्तनदा माता, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील ३२७ मतदान केंद्रावर ३९६ अंगणवाडी सेविका, २७१ आशा स्वयंसेविका तसेच १२६ आरोग्य…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी ‘आपले शहर – स्वच्छ शहर’ अभियानातंर्गत शहरात ठेकेदारांमार्फत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र, हे स्वच्छता अभियान केवळ नावालाच राबविले जात असल्याचे नगर परिषद कार्यालयाजवळच साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ‘दिव्याखालीच अंधार’ असे म्हणण्याची वेळ शहर वासीयांवर आली आहे. तसेच ठेकेदारामार्फत दिवसाकाठी किमान आठ ते दहा टन कचरा संकलित केला जात असल्याच्या वल्गना केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानातंर्गत ‘आपले शहर-स्वच्छ शहर’ असा नारा देत साई सिध्दी बायोटेक प्रा.लि. या कंपनीमार्फत दैनंदिन स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यासाठी दहा वाहने व मजुरामार्फत शहराच्या विविध भागातून संकलित…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथील ओसाड पडीक, मुरमाड, बंजर जवळपास २५ हेक्टर क्षेत्रावर २०२१ पासून माथ्याकडील पाणलोट उपचाराबरोबरच टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येऊन टेकड्यांच्या परिसराला ‘निसर्गटेकडी’ प्रकल्प नाव संबोधन करण्यात आले. परिसरातील झाडांना आग ओकत असलेल्या सुर्यामुळे कडक उन्हात पाणी देणे गरजेचे आहे. त्याबरोबर आळे तयार करणे, सफाई करणे, सहज जलबोध अभियानाच्या तांत्रिक मार्गदर्शनाने जलसंधारणाचे माथ्याकडील उपचार तयार करणे, यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी, १ मे रोजी पहाटे सहा वाजता महाश्रमदानाचे आयोजन केले आहे. अशा आगळ्यावेगळ्या अविस्मरणीय सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमाचा भाग होण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सेवा सहयोग ग्रामोदय, भुजल अभियान, जलमित्र परिवार, लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान अंतर्गत जलसंधारण, पर्यावरण रक्षण, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने पातोंडा येथे नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, बांध बंदीस्ती, शेतशिवार रस्ते करणे, पाणलोट उपचाराबरोबरच मृदसंधारण कामे करण्यासंदर्भात बैठक नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भुजल अभियानाच्या सुचित्रा पाटील, सोमनाथ माळी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जलसंधारण कामांबद्दल तसेच संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी सरपंच काशिनाथ शिरसाठ, दीपक पाटील, नितीन महाजन, सुकदेव पाटील, अनिल रोकडे, ज्ञानेश्वर झगडे, दीपक सरदार, आनंद पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र जानराव, दिलीप चौधरी, सुनील चौधरी, विकास पाटील, शंकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अशोक…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेरून आलेले केरळचे पोलीस आणि चाळीसगाव शहर पोस्ट यांनी रूट मार्च केला. ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते ११.३० या कालावधीत चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन केले होते. रूट मार्चमध्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी, ३४ अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दल, केरळ यांचे दोन अधिकारी, ५० सहकारी उपस्थित होते. रूट मार्चमध्ये घाट रोड, चौधरी वाडा प्रभात गल्ली, नागद रोड, रांजणगाव दरवाजा, सराफ बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, भडगाव रोड, गणेश रोड हा परिसर समाविष्ट करण्यात केला होता.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची यवतमाळ येथे विटंबना केली आहे. असे भ्याड आणि नीच कृत्य करणाऱ्या समाज कंटकांचा समता सैनिक दलातर्फे निषेध व्यक्त करुन आंदोलन करण्यात आले.पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज द्रोहींना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत समता सैनिक दलातर्फे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तहसीलला नुकतेच निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सचिव नितीन मरसाळे, जिल्हा संपर्क प्रमुख भाईदास गोलाईत, तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू अहिरे, तालुका संपर्क प्रमुख नाना घोडेस्वार, तालुका प्रसिद्धी प्रमुख बाबा पगारे, संघटक शिवाजी शिंदे, तालुका सचिव सचिन गांगुर्डे, सहसचिव विशाल पगारे, संघटक रतन अहिरे, संघटक रवींद्र…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येत्या १३ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गुरुवारी, दोन मे पर्यंत चोपडा विधानसभा मतदारसंघातील तीन लाख २२ हजार २२८ मतदारांना घरबसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून ३१९ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना मुदतीत मतदार चिठ्ठी वाटप पूर्ण करण्याचे सुचित केले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व साहित्याचे वाटप साहित्य नोडल अधिकारी रवींद्र माळी यांनी केले.…