Author: Sharad Bhalerao

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी एक गरजू रुग्ण सलग चार दिवसांपासून पैसे नसल्याने दवाखान्यात फिरत आहे. कोणी मदत करत नसल्याने ओम शांती सेवा समितीने मदतीचा हात देऊन रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करीत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्या रुग्णाला ओम शांती सेवा समितीच्या अंतर्गत सलग तीन दिवसापासून तीन बॉटल्या रक्त तसेच रुग्णाला पूर्णपणे १६ हजार ८०० रुपये सर्व सेवा मोफत औषधी मेडिकल व सर्व प्रकारच्या मोफत सेवा देण्यात आल्या आहेत. रुग्णाला मलकापुरातील कोणत्याही दवाखान्यात व कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णाला घेतले नाही. कारण त्या रुग्णाकडे पूर्वीचे पैसे नसल्यामुळे तो परिवार दारोदारी चार दिवसांपासून भटकत होता. निवडणूक काळात खरोखर अशा रुग्णांचा वाली कोण? लोकप्रतिनिधी झोपलेत का?…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत वाटप करण्यात आले नाही येत्या आठ दिवसात प्रशासनाने दुष्काळी अनुदान वाटप न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सेना राज्य सरकार व महसूल प्रशानाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा रयत सेनेच्यावतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी, ६ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील इतर गावांना दुष्काळी अनुदान महसूल प्रशासन व शासनाच्यावतीने वाटप केले आहे. मात्र, आजपर्यंत चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप केले नाही. अनेकवेळा तहसीलदार व तलाठी यांना शेतकरी भेटूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. यावर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतात पिके…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी कन्नड घाटात सध्या अवजड वाहनांना बंदी असल्याने घाटातून लहान वाहने, चारचाकी व दुचाकी वाहने सुरु आहे. घाटात ट्रॅफिक कमी झाल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला आहे. चाळीसगाव कन्नड घाटाच्या किनाऱ्यावर लावलेले लोखंडी पत्र्याचे बॅरेकेट्स मटेरियल चोरीस जात आहे. याकडे नॅशनल हायवे विभागासह पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. आता २५ टक्के आधीच बॅरेकेट्स चोरी झाल्याचे समजते.आता जे बॅरेकेट्स उरले आहे ते पण चोरीस जाण्याची शक्यता आहे. कारण हे पत्री बॅरेकेट्स रस्त्याच्या किनाऱ्यावरून उतरवून खाली ठेवल्याचे दिसत आहेत. हे बॅरेकेट्स चोरीस जाण्याची शक्यता दिसते. याकडे महामार्ग नॅशनल हायवे पोलिसांनी व नॅशनल हायवे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. या आधीचे बॅरेकेट्स…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे येथील सु.अ. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या ८० ते ९० झाडांना उन्हाच्या झळा बसून पाण्याअभावी ते वाळून नष्ट झाले असते. मात्र, गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी स्वतःच्या विहिरीवरून टँकरद्वारे झाडांना पाणी देत ‘जीवदान’ दिले आहे. याबाबत गावात त्यांचे कौतुक होत आहे. अमळनेर तालुक्यातील पिंपळे गावाला यावर्षी पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने पाठविलेल्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अशा परिस्थितीत गावात असलेल्या कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयात ‘आमची शाळा आमचा अभियान’ उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक अशोक देसले यांनी शाळेच्या आवारात ८०…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गिरडगाव येथे गावठाणमधील डीपी क्र.७ वर शॉर्टसर्किट झाल्यामुळे रविवारी, ५ मे रोजी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक पाटील यांनी तात्काळ यावल पोलिसांशी संपर्क साधून यावल नगरपालिकेचा अग्निशामक बंब बोलावून आग आटोक्यात आणली. यावेळी यावल पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मराठे, पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी यांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करुन शर्तीचे प्रयत्न केले. अग्निशमन बंब घटनास्थळी वेळेवर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी एमएसईबीचा स्टॉप तात्काळ दाखल झाला. त्यांनी वीज प्रवाह…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथे एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उपस्थित दिव्यांगांना मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाला एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेनेही मतदान जनजागृतीसाठी हातभार लावला आहे. याबद्दल त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आम्हीही स्वतः लोकशाहीचा घटक आहोत. मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिव विजय जाधव यांनी उपस्थित सर्वांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत, सदस्य विकास शिवदे, बाळू जाधव, अनिल चौधरी, विठ्ठल…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी देशभरात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाचोरा शहरात बहुरूपी बाहुल्यांच्या सोबत बाजारपेठेत लोकशाही टिकविण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी मतदान करा, अशा पद्धतीने मतदानाची जनजागृती पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून पत्रकार राहुल महाजन यांनी केली आहे. पत्रकार म्हणून शासनाला नेहमी सहकार्य करणे व निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाला मदत करणे हे आपले कर्तव्य तसेच नैतिक जबाबदारी आहे. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे. शहरात अनेक सुशिक्षित तरुण वर्ग विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असतात. आपण समाजामध्ये वावरत असतांना समाजाला काहीतरी देणे लागतो. मग आपले विचार, बुद्धी, ज्ञान तसेच कला जे समाजाला देता येईल ते आपण समाजाला दिले पाहिजे. अश्‍या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी बदलापूर-ठाण्यातील प्रेरणा फाउंडेशनतर्फे समृद्धी शिक्षक फाउंडेशचे संस्थापक-अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना शैक्षणिक, साहित्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कल्याण येथे आचार्य प्र.के. अत्रे नाट्यमंदिरात संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा दिप्ती गावकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘माणुसकी रत्न’ पुरस्कार २०२४ देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव वैभव कुलकर्णी, उपखजिनदार दिव्या गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर ठाणे आणि प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका-अध्यक्षा व प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका दिप्ती गावकर यांचा ‘आकांत’ नाटकाचा नाट्य प्रयोग शनिवारी, ४ मे रोजी आचार्य प्र. के.अत्रे नाट्यमंदिर, कल्याण येथे आयोजित केला…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनुपस्थित मतदारांना गृहभेटीद्वारे मतदानाचा अनोखा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वृद्ध व दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा अलौकिक आनंदासह उत्साह संचारला आहे. चाळीसगाव मतदार संघात ७१ वृद्ध तर १४ दिव्यांग अशा ८५ मतदारांच्या घरी पोहोचले. त्यापैकी ६३ वृद्ध व १३ दिव्यांग अशा ७६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ८५ पैकी सात मतदार वैद्यकीय उपचारासाठी बाहेरगावी गेले होते. दोन मतदार मतदानापूर्वीच देवाघरी गेल्याचे आढळून आले. चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावरील दिव्यांग मतदार अजिंक्य रवींद्र पाटील यांचे घरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः उपस्थित होते. प्रमोद हिले, सहाय्यक निवडणूक…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ हे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांची एक सामायिक संघटना आहे. संघटनेद्वारे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची विविध मागण्यांच्या अनुषंगाने ३ मे २०२४ रोजी भेट घेण्यात आली. त्यात २९ एप्रिल २०२४ च्या शासन निर्णयाच्या संदर्भात व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांच्या अनुषंगाने दोन निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या. शासन परिपत्रक १ डिसेंबर २०२२ च्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या रीट पिटीशनवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार २९ एप्रिल २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे शासनाने विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदावरून अनुदानित पदावर बदल्यांचा प्रस्ताव मान्य केलेला आहे. परंतु यासंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षण…

Read More