Author: Sharad Bhalerao

आयुक्तांच्या हस्ते ‘आनंद नगरी’ कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   महानगरपालिका आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गंत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात १ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान जागतिक बेघर दिन सप्ताह विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचे मार्गदर्शन मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, शहराध्ययन व्यवस्थापक गायत्री पाटील तसेच मंडळाचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी केले. सप्ताहात दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. २ ऑक्टोबरला गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती विशेष कार्यक्रमाने साजरी…

Read More

मेहरूण परिसरातील घटना ; जखमी भावावर जळगावात उपचार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “बहिणीला काही होऊ नये” अशा भावनेने क्षणाचाही विचार न करता आपल्या चुलत बहिणीचा जीव वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या अजय सोनवणे ह्या तरुणाने आपल्या दोन्ही हातांचा त्याग केला आहे. जळगाव शहरातील मेहरूण परिसरात घडलेली हृदयद्रावक घटना ऐकून परिसरातील नागरिक भावूक झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, गेल्या २१ सप्टेंबर रोजी अजय सोनवणे आपल्या कुटुंबासोबत घरात होता. त्याची केवळ सात वर्षांची चुलत बहीण घराच्या छतावर गोधडी सुकविण्यासाठी गेली होती. गोधडी टाकताना तिचा हातावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विजेच्या तारांजवळ गेला. ही बाब लक्षात येताच अजयने क्षणाचाही विलंब न करता तिचा जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याने लोखंडी…

Read More

शासन निकष न लावता तातडीने मदत जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकु देणार नसल्याचा इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक, पशुधन आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने अशा गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत केवळ निकष लावून मदत देण्याचे नाटक सुरू केले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तीव्र दखल घेत संपूर्ण जळगाव जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकु देणार नाही, असा तीव्र इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास भेट देऊन “संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त…

Read More

व्यासपीठावर विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी सरळ परिचय, पालकांसाठी सुलभ संधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाच्यावतीने समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी तृतीय आंतर राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे होणार आहे. मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ना.संजय सावकारे, खा.श्रीमती स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित राहतील. यावेळी विवाहेच्छुक उपवर-वधू, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचे रंगीत छायाचित्रांसह सविस्तर परिचयपत्र पाठविण्याची अंतिम मुदत बुधवारी, २० ऑक्टोबर आहे. मेळाव्यासाठी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये (कंसात मो.क्र.) प्रदेश सदस्य संजय वानखेडे (८६२५९६५२४१), राज्य संघटक डॉ. संजय…

Read More

२५ सहकाऱ्यांसमवेत ४०० सभासदांच्या उपस्थितीत ठराव मंजूर साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या जामनेर शाखेचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नारायण (पं.ना.) पाटील यांनी आजारपणासह वयामुळे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संस्थेची दोन कोटींची वास्तू असून शिलकी रक्कम आहे. गेल्या ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या त्रैमासिक सभेत मावळते अध्यक्ष पं.ना.पाटील यांनी वीस वर्षांपासून कार्यरत अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तो सभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी प्रल्हाद भोजू (प्र.भो.) चौधरी यांचे अध्यक्षपदासाठी नाव घोषित करून ठराव मंजूर करून घेतला. ५ ऑक्टोबर रोजीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पुणे म.पे.असोसिएशनच्या नाशिक विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा उपाध्यक्ष सदाशिव नारायण सोनवणे यांची सभाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या २५ सहकाऱ्यांसमवेत…

Read More

लिटरसी, न्यूमरसीसह गणित, विज्ञान, संगणक विषयांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील प्रेमनगरातील ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ कालावधीत ॲक्टिव्हिटी प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर उत्साहपूर्वक आणि आत्मविश्वासाने शैक्षणिक सादरीकरण केले. इयत्ता नर्सरी ते के.जी. वन गटातील विद्यार्थ्यांनी लिटरसी व न्यूमरसी विषयांवर सादरीकरण केले तर इयत्ता पहिली ते आठवीच्या गटातील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि संगणक विषयांवर प्रेझेंटेशन सादर केले. अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून मिळवलेल्या ज्ञान आणि कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन पालकांसमोर केले. पालकांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे उत्तम कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच…

Read More

माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले आहे. ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली आहे. त्यांच्या जागी शासन आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण…

Read More

प्रभाग ४ मधील माजी नगरसेवक कैलास सोनवणेंची एकमेव हरकत मान्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी अंतीम प्रभाग रचना जाहीर झाली. शहराच्या १९ प्रभागातून ७५ नगरसेवक निवडून येतील. त्यात चार नगरसेवक निवडून देणारे प्रभाग १८ आणि तीन सदस्य निवडून देणारा केवळ एक प्रभाग आहे. सर्व प्रभाग रचनेची अधिकृत अधिसूचना गुरुवारी जाहीर केली आहे. मनपाच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा गेल्या ३ सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता. त्यावर हरकती व सूचना ३ ते १५ सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या. ७० हरकती आल्या होत्या. १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान या हरकतींवर सुनावणी होवून सविस्तर अहवाल विभागीय कार्यालय व निवडणूक विभागाला…

Read More

सिंधी बांधवांसह देशभरातील भाविकांचा दुहेरी आनंद अन्‌ उत्साह साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  गेल्या ४८ वर्षांपासून सुरू असलेला संत बाबा हरदासराम साहेबांचा ‘वर्सी महोत्सव’ अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे आजपासून जळगावातील सिंधी कॉलनीत साजरा होत आहे. त्याचसोबत त्यांचे गुरु संत कंवरराम साहेब यांचा ६८ वा वर्सी महोत्सव आणि संत बाबा हरदासराम यांचे शिष्य यांचा १७ वा वर्सी महोत्सवही याच काळात साजरा होत आहे. महोत्सवासाठी सिंधी कॉलनी सेवा मंडळ येथे भव्य मंडप उभारणी केली आहे. संपूर्ण परिसरात ट्रस्टच्यावतीने आकर्षक विद्युत रोशनाई केली आहे. चार मजली नवीन इमारत तयार झाली आहे. त्यात ५७ रूम आणि ४ मोठे सभागृह आहेत. अशी सहा मजली इमारत तयार झाली…

Read More

विविध कार्यक्रमात महाविद्यालयांच्या संघांनी नोंदविला सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जल्लोषात उद्घाटन झाल्यानंतर दुपारच्या सत्रात जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा परिसर संगीतमय वातावरणाने गजबजला होता. रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात नकलाकार सादर करीत असताना प्रत्येक स्पर्धक आपल्या बाजूने कला सादर करताना दिसत होता. राजकीय नेते, चित्रपट अभिनेता, पक्षी, विविध कार्टून, पुष्पा चित्रपटातील नायक, संगीत वाद्य, नामवंत गायकांचे आवाज, विमान उड्डाण तसेच अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, निळू फुले, इंदोरीकर महाराज आदींची नक्कल हुबेहुब सादर करीत असताना…

Read More