Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंतर्गत उपकेंद्रात तसेच शहरी भागात राष्ट्रीय डेंग्यू दिवस ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा’ या घोषवाक्याला आधार मानून विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन १६ मे रोजी विविध आरोग्यपर उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैदेही पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्वच वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने चाळीसगाव तालुक्यातील सर्वच प्रा.आ.केंद्र आणि अंतर्गत गावात तसेच…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा टप्पा नुकताच पार पडला. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भर उन्हात घरोघर जाऊन मतदान स्लिप वाटपाचे काम त्यांनी केले. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांना मदत करत होते. प्रशासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्याबद्दल इतर जिल्ह्यात आठशे रुपये निवडणूक भत्ता मतदानाच्या दिवशीच त्यांना देण्यात आला. परंतु जळगाव शहरातील बीएलओ यांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे शहरातील सर्व बीएलओ नाराज आहे. त्यामुळे त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी स्वीकारले. बीएलओंना येत्या पंधरा दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरात सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग लावल्याने धरणगाव शहराचे व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत आहे. ठिकठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्जचे पेव फुटल्याचे दिसत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त होर्डिंग्ज आणि पोस्टर्स राजकीय पक्षांची आणि दुकानदारांच्या जाहिरातीचे आहेत. शहरातील बऱ्याच दुकादारांकडून दुकानासमोर मोठमोठे फलक लावलेले दिसून येतात. मात्र, नगर परिषदेकडून यावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा सरकारी महसूल बुडत आहे. शहरात विविध ठिकाणी भलेमोठे होर्डिंग, बॅनर लावलेले आहेत, यापैकी धरणगाव बस स्थानकाच्या आवारात फाटलेल्या अवस्थेत होर्डींग, तसेच धरणगाव-चोपडा-अमळनेर-जळगाव महामार्गालगत व्हाईट हाऊस समोरील खासगी इमारतीवर भलेमोठे अवाढव्य बॅनर फाटक्या अवस्थेत गळून पडलेले आहे आणि सद्या वादळ वाऱ्याचे…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी धानोरा येथील शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मोजणीसाठी दुसऱ्यांदा मोजणी फी भरूनही त्याच्या शेताची मोजणी होत नसल्याने व हेतू पुरस्कारपणे मोजणी अधिकारी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे गुरुवारी, १६ मे रोजी नांदुरा पंचायत समितीच्या उपसभापती योगिता गावंडे आणि पत्रकार संदीप गावंडे यांनी शेतकरी यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपअधीक्षक हेमंत किन्हिकर अनुपस्थित होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताची मोजणीचे काम मार्गी लागावे, याकरीता भूमी अभिलेख कार्यालय नांदुराचे उपअधीक्षक हेमंत किन्हिकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे याने दुसऱ्यांदा मोजणी फी भरल्यानंतर त्यांना आतापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडून तब्बल चार वेळा मोजणी नोटीस…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदिर संस्थानचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था, तालुका कृषी कार्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचे उद्घाटन गुरुवारी, १६ मे रोजी जैन हिल्स येथे कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. मंगळ ग्रह मंदिर संस्थानच्यावतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन.…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मानवी जीवन दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. काही आपत्ती टाळता येत नाहीत. त्यांना धैर्याने तोंड द्यावे लागते. पण अनेक आपत्ती आपल्या क्षुल्लक चुकांमुळे आपण ओढवून घेतो. त्या आपण विज्ञानाच्या आधारे टाळू शकतो. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एल.पी.जी. गॅस सुरक्षा अभियानानिमित्त येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नुकतेच घरगुती एल.पी.जी. गॅसचे धोके व उपाययोजना विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजन दास ग्रुप ऑफ कंपनी, सूर्या एलपीजी गॅस सुरक्षा विभाग, रावेर यांच्यावतीने केले होते. कंपनीच्यावतीने शुभम लाड, रवी खांजोडे, असिस्टंट मॅनेजर, सूर्या एलपीजी गॅस व दास ग्रुप ऑफ कंपनी आणी विठ्ठल पाटील…

Read More

साईमत, पहुर, ता.जामनेर ः वार्ताहर जागतिक डेंग्यू दिनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद अंतर्गत सर्व उपकेंद्राअंतर्गत असणाऱ्या गावामध्ये गुरुवारी, १६ मे रोजी जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावत, डॉ.थोरात, हिवताप पर्यवेक्षक प्रवीण दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू मलेरिया विषयक हस्त पत्रिका, भित्तीपत्रक पत्रिका, आरोग्याचे संदेश भिंतीवर लिहिण्यात आले. तसेच ध्वनी प्रक्षेपणाद्वारे जनजागृती केली. सार्वजनिक ठिकाणी डेंग्यूविषयी माहिती पत्रके वाटण्यात आली. कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. सहसा हा डास व्हायरस असलेल्या एखाद्या व्यक्तीस चावतात, जे डास चावण्याद्वारे इतर लोकांमध्ये हस्तांतरित होऊ…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा ः वार्ताहर येथे श्री भगवान नरसिंह महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम किर्तन व श्रीमद्‌ भागवत कथा सप्ताहाला वैशाख १५ मे ला तर २२ मे रोजी सांगता होणार आहे. सप्ताहाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. त्यामुळे भाविक भक्त श्रीमद्भागवत कथेचा लाभ घेत आहेत. श्रीमद्‌ भागवत कथाकार ह.भ.प. धनश्रीताई ठाकरे (कोळगाव, भोकरदन) यांच्या मधुर वाणीतून धर्म, संस्कृतीवर मार्गदर्शन करणार आहे. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्रीमद्‌ भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८:३० ते १०:३० हरी किर्तन होईल. रात्री होणाऱ्या किर्तनात १५ मे ला ह.भ.प. संदीप महाराज…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरात एम.एम.कॉलेजच्या चौकापासून तर वरखेडी नाक्यावरपर्यंत हायवेवर दोन्ही बाजूने बेकायदेशीरपणे अतिक्रमण वाढविण्यात आलेले आहे. या अतिक्रमणामुळे वाहनांची रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग केली जाते. पार्किंग केलेल्या वाहनांमुळे दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहे. पाचोरा-जारगाव चौफुलीवर बुधवारी, १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एका मण्यार समाजातील गिरड येथील माहेरवाशिण ही पाचोरा शहरातील नूरनी नगर भागातील नातेवाईकाला भेटण्यासाठी आली होती. यावेळी महिलेला जारगाव चौफुलीवर एका बेकायदेशीर पार्किंगमुळे महिलेचा मृत्यू झाला. घटनास्थळी पाचोरा पोलिसांनी तात्काळ वाहनासह चालकास ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे. पाचोरा शहरात अवैध वाहतुकीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. अशा वाहतुकीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अवैध वाहतुकीमुळे…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव ः वार्ताहर निवडणुकीच्या कामावर गैरहजर असलेल्या ३० कर्मचाऱ्यांवर कामात कुचराई केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जळगाव ग्रामीणचे निवडणूक नायब तहसीलदार दिगंबर भिकन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जळगाव ग्रामीणचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बांभोरी शिवारातील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात १२ मे रोजी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य घेण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर कर्मचारी आणि अधिकारी साहित्य घेऊन रवाना झाले होते. मात्र, त्यापैकी काही जण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर हजर नव्हते. नियुक्त केलेल्या ठिकाणी १२ रोजी कर्मचारी गैरहजर होते. यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव ग्रामीणचे…

Read More