Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचा बारावी कला विभागाचा निकाल ९८ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत विद्यार्थिनींच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात यश मिळविल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे कौतुक होत आहे. निकालात साक्षी सचिन देशमुख ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. विश्‍वासराव पवार ट्रस्ट नगरदेवळा संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथील कला शाखेतून ८३ विद्यार्थिनी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ८१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण विद्यार्थिनींमधून तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ता प्राप्तांक प्राप्त केले आहे. ४३ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी तर ३५ विद्यार्थिनींना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे. पाचोरा कन्या विद्यालयातील प्रथम पाच…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे २०२४ हे वर्ष सार्थ त्रिशती वर्ष आहे. त्याच प्रसंगाचे औचित्य साधून २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर विश्‍वातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे, या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, संमेलनाचे नियंत्रक रवींद्र पाटील, पाचोरा इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे, यावल यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनानिमित्त शिवरायांच्या स्वराज्य विषयीचा दृष्टीकोन म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठा,…

Read More

साईमत, पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील सबगव्हाण टोलनाका गुन्हा प्रकरणाचा कमी कालावधीत उलगडा करुन आरोपींना तात्काळ अटक करणाऱ्या पारोळा पोलीस निरीक्षकांसह पथकास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग सहावरील सबगव्हाण टोलनाका हा सुरू होण्यापूर्वीच ११ मार्चच्या मध्यरात्री चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड जाळपोळ करून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले होते. याप्रकरणी फिर्यादीनुसार पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपींनी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले होते. त्या अनुषंगाने पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार सुनील हटकर,दीपक अहिरे,आशिष गायकवाड यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील संत सखाराम महाराज संस्थानतर्फे १९ रोजी वैशाख शुद्ध एकादशीला रात्री ८ वाजता रथ उत्सव अतिशय उत्साहात हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हा रथोत्सव रात्रभर चालतो. दुसऱ्या दिवशी रथ हा मूळ जागी परत येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवांना मिळाल्याने पुन्हा सामाजिक एकात्मतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक रथ उत्सवातून दिसून आले. त्यामुळे सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडून संत सखाराम महाराजांचा गजर करत भक्तांनी दर्शन घेतले. जयदेव, सखा हरी देव यांनी विधिवत रथाची पूजा केली. रथात लालजीची मूर्ती विराजमान केल्या. रथावर बसण्याचा मान ब्रह्मे व वैद्य पुजारी यांना मिळाला. भेर व तुतारीच्या निनादात संस्थानातील मंदिराजवळून रथाची सुरुवात…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर पहूर पेठ, पहूर कसबेसह सांगवी या तीन गावांची तहान भागविणाऱ्या गोगडी धरणाने तळ गाठलेला असताना ‘आ’ वासून उभे राहिलेले पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईच्या मागणीची दखल घेत सोमवारी, २० मे रोजी दुपारी १२ वाजता लघु पाटबंधारे उपविभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी गोगडी प्रकल्प गाठत पाहणी केली. यावेळी वीज पंपांद्वारे अवैधरित्या हजारो लिटर पाण्याचा उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांंनी पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः आपले वीज पंप काढून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, ग्रामपंचायत…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील रहिवासी तथा शिवसेनेचे जुने कार्यकर्ते उबाठा गटाचे उपशहर प्रमुख रवींद्र जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याबद्दल त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, शहर प्रमुख विलास महाजन, मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, हेमंत चौधरी, कमलेश बोरसे, समाधान पाटील, सचिन पवार, एकनाथ महाजन, सागर पाटील आदी उपस्थित होते.

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर मंदिरांचे गाव म्हणून ओळख होवू पाहणाऱ्या पहूर गावात लोकसहभागातून भगवान नागेश्‍वर महादेवाचे मंदिर उभारले जात आहे. श्रीक्षेत्र हनुमान मंदिरातर्फे आगामी वर्षात रौप्य महोत्सवी किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागेश्‍वर महादेव मंदिराच्या उभारणीत अधिकाधिक भाविकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन श्री क्षेत्र हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय बनकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर चौथे, सचिव विशाल चव्हाण, विश्‍वस्त दीपक जाधव यांच्यासह विश्‍वस्त मंडळाने केले आहे. यासाठी लेलेनगर येथील तरूण मित्रमंडळ व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. लेलेनगरात १९८५ मध्ये दादासाहेब कॅप्टन डॉ. एम. आर. लेले यांच्या सहकार्याने शिवभक्त रंगनाथ महाराज, स्व.नामदेव घोंगडे, स्व.नामदेव उबाळे, स्व.अनंत सोनार गुरुजी, स्व.सखाराम घोंगडे,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील सराफ बाजार येथील भवानी माता मंदिराजवळील सौरभ ज्वेलर्स नावाच्या दुकानात सोमवारी, २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यामुळे सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे ४० तोळेेसोने असा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी, २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता तीन दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अज्ञात सहा जण दुकानाच्या मागच्या…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील ३३ वर्षीय युवक मोटरसायकलने बोदवडकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना सोमवारी, २० मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. नितेश भालचंद्र हिवराळे (वय ३३, रा. वडगाव डिघी, ता. नांदुरा, ह.मु. गोकुळधाम, मलकापूर) असे मयत युवकाचे नाव आहे. सविस्तर असे की, नितेश हिवराळे हा क्रेन मशीनचे कॉन्टॅक्ट बेसवर रेल्वेचे काम करीत आहे. त्याच्याकडे असलेली हिरो होंडा शाइन क्र. एमएच २८एवाय ७५८३ गाडीने कोलाडी बोदवड येथे सुरू असलेल्या कामावरती येणे-जाणे करीत होता. २० मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवानंद वानखेडे (रा. शिरसोडी, ता.नांदुरा) यांनी फोनद्वारे माहिती दिली की, १९ मे रोजी रात्री अंदाजे…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक भूपेंद्र पोळ यांनी चोपड्यासारख्या भागात पिकलबॉल खेळ प्रथमतः आणला. त्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. पिकलबॉल खेळाचा विद्यापीठ खेळांमध्ये तसेच ऑलिंपिक खेळांमध्ये समावेश व्हावा. या खेळातून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकविता येते, ही महत्त्वाची गोष्ट खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी खेळातील यशस्वी खेळाडू यांना नॅट फाउंडेशन, मुंबई आणि सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्यातर्फे प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात नॅट फाउंडेशन, मुंबई व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिकलबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या…

Read More