साईमत, मलकापूर : प्रतिनिधी वैद्यकीय व्यवसायात अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉ. राहुल चोपडे यांच्याविरुद्ध ३० मार्च २०२४ रोजी मुलाच्या चुकीचा उपचार केल्याने कायमचे आलेले अपंगत्व यासंदर्भात मेडिकल अपराध व मेडिकल बेजबाबदारपणा अशा आशयाच्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार येथील पूनम भारंबे यांनी दिली होती. मात्र, तीन महिने उलटूनही मलकापूर पोलिसांनी कुठलीही एफआयआर नोंदवली नसल्याने अखेर २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पीडित मातेने शिवसैनिकांनासह पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदारांना हार, फुले घालून आरती ओवाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम भारंबे यांचा १६ वर्षीय मुलगा दुर्गेश भारंबे त्याच्या डाव्या पायातील टोंगळ्याच्या वाटीचे फॅक्चर उपचार अनुषंगाने मांडीपासून तळपायापर्यंत पक्के प्लास्टर केले.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील प्रभाग १ मधील बंगाली फाईल, ज्ञानेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, रामवाडी, केशव नगर व तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. वीज महावितरणच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा कधीही उद्रेक होणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी महावितरण कंपनीला दिला आहे. ४५ प्लस तापमानामुळे प्रचंड उकाडा त्यात ज्या दिवशी नळांना पाणी सोडले जाते त्याच दिवशी व त्याच वेळात वीज गुल होणे असे प्रकार महिन्याभरापासून होत आहे. २१ मे रोजी जवळपास दिवसभर वीज गुल झाल्याने या भागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कंपनीसह माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या घरावर मोर्चा नेऊन प्रचंड संताप…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिशकालीन पाझर तलावातून बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेची कामे नियमबाह्य पद्धतीने रात्रंदिवस २४ तास गौण खनिज उत्खनन सुरू आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे सर्रास उल्लंघन परवानाधारकांकडून होत असल्याच्या निषेधार्थ तलाव क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल बोदडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे. तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिश कालीन पाझर तलावातून बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे कामे गौण खनिज उत्खनन हे फक्त धरणांच्या कामासाठी देण्यात आलेले आहे. वाहनधारकांकडून इतरत्र गौण खनिज विक्री होत आहे. खनकाम सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करण्याचे आदेश असूनही गौण खनिज उत्खनन रात्रभर सुरूच आहे.…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर. टी.लेले. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल ८९. १८ टक्के लागला आहे. त्यात साक्षी रामेश्वर पाटील हिने ६९. ५० टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आर.टी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. साक्षी रामेश्वर पाटील हिने ६९. ५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्या संचालक ॲड. एस. आर. पाटील यांच्या स्नूषा आहेत. विवाहानंतर त्या आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आरती ज्ञानेश्वर सोनवणे हिने ६८. ८३ टक्के गुण मिळवून…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथे सामाजिक वनिकरण विभाग, ग्रामपंचायत व लोकसहभागातून सामाजिक कार्यकर्ते, जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून निसर्गटेकडी परिसरातील पडीक व ओसाड, मुरमाड २५ हेक्टर क्षेत्रावर २०२१ पासून टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे. मागीलवर्षी वरुणराजा रुसल्यामुळे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे. अशा भीषण परिस्थितीत लावलेले झाडे कशी वाचवायची हा प्रश्न पडला होता. ऐन पावसाळ्यात झाडांना पाणी देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. अशातच सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यापासून झाडांना पाणी देण्यास सुरवात करण्यात आली. नाईकनगर येथील किशोर नामदेव चव्हाण, विलास गोकुळ चव्हाण…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर खरीप हंगामात शेतकऱ्यांना सहज कपाशी बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी पहूर येथील कृषी निविष्ठा असोसिएशनने बैठक घेतली. या दरम्यान चढ्या भावाचे बियाणे खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह धरू नये, असे बैठकीतून आव्हान केले आहे. तसेच जामनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. पहूर येथील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती तथा कृषी केंद्र संघटना प्रदीप लोढा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात कृषीनिविष्ठा विक्रेत्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी, याचबरोबर संबंधित घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ निविष्ठा धारकांना कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने चढ्या दराने बियाणे खरेदीसाठी वेठीस धरले जात…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील डॉ.सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सेजल चंद्रशेखर अत्तरदे हिने नुकत्याच बारावीच्या परीक्षेत ८३.८३ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. ती नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनीलभाऊ महाजन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झालेला आहे. त्यात नूतन मराठाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.२३ टक्के लागलेला आहे. त्यात कला विभाग ९३.६६, वाणिज्य विभाग ९५.५४, विज्ञान विभाग ९८.१७, किमान कौशल्य विभाग ९६.२३ असा निकाल लागला आहे. निकालातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कला विभागात प्रथम अनुष्का राजेश काळे ६९.१७, द्वितीय एकता मनोज चांगरे ६९, तृतीय काजल कैलास पवार ६७.३३, वाणिज्य विभागात प्रथम तन्वी उमाकांत चौधरी ७७.३३, द्वितीय तिलक नरेंद्र वाध ७० टक्के, तृतीय गौरव प्रमोद शिंदे ६९, विज्ञान विभागात प्रथम विश्वेश विलास पाटील ८८.५०, द्वितीय मिलिंद सदाशिव पाटील ८८.१७, तृतीय अपूर्वा संजय बाविस्कर ८७.८३ अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी गुजरात राज्यातील अहमदाबाद कर्णावती जिल्ह्यात तीर्थधाम प्रेरणापीठ प्रेरणा, ता. दसकोई येथे समस्त सतपंथी अनुयायींचे आराध्य दैवत श्री निष्कलंक नारायण भगवान मंदिर व श्री हंसतेजजी महाराज यांची अखंड ज्योत प्रज्वलित आहे. हे ठिकाण भारतभरमध्ये असलेल्या सतपंथी व हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तीर्थधाम प्रेरणापीठ प्रेरणा येथे अचानक मंदिराची मागील भिंत व पत्रे तोडून हजारो धर्मांध समाजकंटकांनी मंदिरात घुसून हल्ला केला. समाजकंटकांनी येथील हिंदू देवतांच्या मुर्त्या व मंदिराचे तोडफोड करून उपस्थित हिंदू बांधवांवर जीवघेणा हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर दगड व विटांचा मारा मंदिर परिसरावर व तेथील हिंदू कुटुंबांवर करण्यात आला. सर्व प्रकार धार्मिक तेढ निर्माण कणारा व निंदनीय…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी खान्देशी गीत मनोहर आंधळे लिखित ‘चला… चला… मतदान करू चला…’ गायिले होते. ते चर्चेत राहिले. याबद्दल नुकताच त्यांचा जळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित सोहळ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. धनराळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्यासोबत मतदान जनजागृतीसाठी सायकल फेरीचे आयोजन करून ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला. यानंतर ‘चला… चला… मतदान करू चला…’ गीत सादर केले होते. ते राज्यभर पोहोचले. दरम्यान, या गीतावर लग्नाच्या अनेक ठिकाणी वरातीतही वऱ्हाडी मंडळींनी ठेका धरला. सोशल मीडियाच्या माध्यमामुळे गाणे सर्वत्र पोहोचले. गेल्या २०…