Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस बियाणे सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने कापूस बियाण्याची टंचाई भासताना दिसत आहे. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठविला आहे. प्रांताधिकाऱ्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या विषयाला वाचा फोडली. पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम लागवडीच्या तयारीला लागले आहे. आपल्या शेतीची मशागत करून लागवडीसाठी त्यांना कापूस पिकांच्या बियाण्याची टंचाई भासत असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काळातही दुष्काळ सदृश्‍य तालुक्याच्या नावाने…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यात अस्मानी चक्रीवादळामुळे अनेकांना चक्रीवादळाचा सामना करावा लागला तर यामध्ये भीमनगर येथील रहिवासी रवींद्र निकम हे महादेवाच्या मंदिरात पावसामुळे बसले असता मंदिरावरील घुमट डोक्यात पडून मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाले तर झाडे उन्मळून पडले आहे. तसेच समर्पण लोन येथील लग्नप्रसंगी काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांच्या अंगावर भिंत कोसळल्याने एक महिलेचा हात तुटला तर तीन महिला जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तसेच समर्थ लॉनवरील तीन सेट उडाले आहे. भीमनगर येथील मोलमजुरी करणाऱ्या रवींद्र विश्राम निकम (वय ५५) हे महादेवाच्या मंदिरात चक्रीवादळ आणि पावसामुळे आसरा घेण्यासाठी मंदिरात बसले होते. तेव्हा…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवारी, ३१ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत असल्याची माहिती श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली. श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर हा परंपरेने सुरु असलेला पालखी सोहळा श्री संत मुक्ताबाई यांच्या ७२७ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी ३१ मे रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवीत आहे. श्री पांडुरंगराय पादुकांची सकाळी ६ वाजता विधीवत पुजा झाल्यानंतर मंदिर समितीच्यावतीने मानकऱ्यांचा सन्मान होईल. हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवेल.…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरात न.प. हद्दीत डॉ.गिरीश पाटील यांच्या घरापासून ते बोदवड रोडपर्यंत लाखो रुपयांचे गटारीचे काम हे अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन सुरू आहे. पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून आर्थिक हितसंबंधापोटी संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा शहरात असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. अंदाजपत्रकानुसार गटारीचे खोदकाम केल्यानंतर पिचिंग केल्यानंतरच त्यावर स्टील टाकून काँक्रिटीकरण करणे बंधनकारक होते. परंतु संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत डायरेक्ट काड्या मातीवरच काँक्रीट टाकलेले आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक तत्त्वानुसार काळी माती दबून निकृष्ट काँक्रीटमध्ये तळे जाऊन काँक्रीटमधून पाणी जमिनीत पाझरून संपूर्ण गटारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी शहरात रस्ते, गटारी, साफसफाई, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट यासह अत्यावश्‍यक नागरी सुविधांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे समस्या सोडविण्याऐवजी संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे नागरिकांना उत्तरे देत आहे. शहरातील सर्वच समस्यांचे विषय घेऊन संतप्त सर्वसामान्य जनता व आजी-माजी नगरसेवकांनी थेट पालिकेवर धडक देत प्रमुख द्वाराजवळ तीन तास ठिय्या मांडला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. इतकेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून पालिका प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनानंतर प्रशासनाने तीन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. विद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे सूत्र प्रशासकांकडे आहे. त्यातच जवळपास वर्ष पूर्ण होईल. मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर फैजपूर पालिकेला…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळ्यातील सोनी नगर, प्रल्हादनगर भागांमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. वेळोवेळी मागणी करूनही यावर मनपा दुर्लक्ष करीत असल्याने २७ रोजी मनसेचे पदाधिकारी, नागरिकांनी महानगरपालिकेवर धडक देवून आयुक्त पल्लवी भागवत यांना समस्यांविषयी निवेदन दिले. येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्या, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला. निवेदनात प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. प्रल्हाद नगरमध्ये अद्यापपर्यंत अमृत योजनेची पाईपलाईन नसुन पाईपलाईन टाकुन मिळावी, सोनी नगरातील विद्युत खांबावर पथदिव्यांसाठी फेजतार टाकुन मिळावे, नवीन विद्युत खांबावर पथदिवे लावून मिळावे, मनपाकडे साहित्य उपलब्ध असुनही पथदिवे लावण्यास टाळाटाळ का केले जाते. सावखेडा रोड ते सोनी नगर रात्री…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर (रा.जामधरी, ता.नांदगाव) यांच्या मालकीच्या मेंढ्या वाघळी शिवारात चारण्यासाठी आल्या होत्या. उष्माघातामुळे २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मेंढपाळाचे अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पोपट भोळे, मल्हार सेनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणेश जाने यांनी भेट दिली. शासनाकडून मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील विश्‍वासराव पवार ट्रस्ट नगरदेवळा संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली, पाचोरा शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या ७२ पैकी ७१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींपैकी २१ मुली गुणवत्ता यादीत, ३५ मुली प्रथम श्रेणीत, १३ मुली द्वितीय श्रेणीत तर दोन विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. पाचोरा येथील माध्यमिक कन्या विद्यालयातून गुणवत्ता क्रमांकानुसार प्रथम पाच आलेल्या विद्यार्थिनींमध्ये रोशनी अंगद पाटील (८८.८०), प्रेरणा सुनील वाबळे ( ८४.४०), हुमेरा जहुर खाटीक (८४), धनश्री बन्सीलाल पवार (८२.८०), धनश्री संजय वाडेकर (८२.२०), तनुजा कैलास दराडे (८२.२०) यांचा समावेश आहे.…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थिनी दिव्या गजानन पाटील हिने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम येत कॉपीमुक्त वातावरणात शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल ९७.६१ टक्के लागला असून उर्दू विभागाचा ९८.११ टक्के लागलेला आहे. टेक्निकल विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. दहावी बोर्ड परीक्षेला शाळेतून ३७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळणारे ३५ विद्यार्थी तर विशेष प्राविण्यासह १७६ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत १२३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विद्यालयातून प्रथम दिव्या गजानन पाटील ९७.४०, द्वितीय प्रथम गुरुदास पाटील ९६.६०, तृतीय रेहान हारुण तेली ९५.८०, चतुर्थ जीवन खुशाल…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबापाणी गावाजवळील रामदेववाडी येथे वादळात रविवारी, २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास एक आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून चार जण जागीच ठार झाले. मयतात पती-पत्नी, मुलगा, मुलगीचा समावेश आहे. घटनास्थळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ रात्रीच भेट दिली. यानंतर चारही मयताचे शव शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वादळी पावसात रात्री झालेल्या दुर्घटनेत मात्र त्या परिवारातील आठ वर्षाचा बालक सुदैवाने बचावला आहे. सातपुड्याच्या किनारपट्टीसह तसेच रावेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी, २६ मे रोजी सायंकाळी जोरदार वादळी वारा पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्याने…

Read More