साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर पहुर-एकुलती मार्गावरील लेले नगरात जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ साईडपट्टी सुव्यवस्थित नसल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. यासंदर्भात दै.‘साईमत’ मध्ये ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने भराव टाकून साईडपट्टी दुरुस्त केली. मात्र, आता सूचना फलक कधी लागणार? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे याकडेही जनतेचे लक्ष लागून आहे. पहूरपासून एकुलतीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. हाच मार्ग पुढे लोहारा गावाकडे जातो. या मार्गावर जिल्हा परिषद उर्दू शाळेनजीक साईडपट्टी सुव्यवस्थित नव्हती. एकीकडून विजेचा खांब तर दुसरीकडून शाळा असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. साईडपट्टी भरली गेली नसल्याने अपघाताची शक्यता…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर वाघूर पुलाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. अशातच पहुरला राष्ट्रीय महामार्गावरील झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे शनी महाराज मंदिराजवळील चौकात ‘भुलभुलय्या’ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती उपायोजना करून महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे काम अधिक गतीने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांकडून होत आहे. छत्रपती संभाजी नगरकडून तसेच शेंदुर्णीकडून बस स्थानकाकडे येणारी वाहने अतिशय वेगात येतात. पूल परिसरात काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन योग्यप्रकारे लावणे आवश्यक आहे . शनी महाराज मंदिराकडे खाली उतरणारा…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेला सहभागी करून वृक्ष दत्तक अभियानातून समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा मिळणार आहे. वसुंधरेला हरित अच्छादनातून ग्लोबल वॉर्मिंगच्या महाभयंकर आव्हानातून संपूर्ण मानव जातीच्या बचावाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार रावेर तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणजेच रावेरचे दिवाणी न्या.क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग प्रवीण प्रभूलाल यादव यांनी केले. हिरवांकुर फाउंडेशन, नाशिकच्या विद्यार्थी दशेतून हरितसंस्कार याद्वारा ‘हर घर किसान’ संकल्पनेचा यशस्वीपणे शुभारंभ करण्यात आला. देशातील लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी मुख्य आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेला सोबत घेऊन येत्या १५ ऑगस्टपासून वृक्षदत्तक अभियान साकारण्याचा मानस हिरवांकुर फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष निलयबाबु शाह यांनी व्यक्त केला. हिरवांकुर टीमचे सदस्य धनाजी नाना महाविद्यालयाचे…
साईमत, यावल : प्रतिनिधी रावेर लोकसभा कार्यक्षेत्रात २६ मे रोजी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये सातपुडा जंगलाच्या पायथ्याशी तथा यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या आंबापाणी या अतिदुर्गम आदिवासी भागातील गावाजवळील थोरपाणी आदिवासी पाड्यावर घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे बुधवारी, २९ रोजी भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह घटनास्थळी खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन स्थानिकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घटनेत पावरा कुटुंबातील ८ वर्षाचा मुलगा बचावला आहे. त्याची भेट घेत सांत्वन करून धीर दिला. तसेच पाड्यावर झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी संवाद साधला. घटनेत…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना विशेष मदत मिळावी, शहर पोलीस स्टेशनच्या मुख्य इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा. तसेच विश्रामगृह बीओटी तत्त्वावर निर्मितीस मंजुरात द्यावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आ.राजेश एकडे यांनी २९ मे रोजी बुलढाणा येथे केल्या आहे. मलकापूर मतदार संघात २६ मे २०२४ रोजी मलकापूर व नांदुरा शहरांसह तालुक्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी केली आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे. घरावरील टिनपत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू वादळामध्ये उडून गेल्या…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील उचंदे येथील भीमस्टार फाउंडेशन संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे बौद्ध धर्माचा सामूहिक विवाह सोहळा २७ मे रोजी सरस्वती इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात पुरनाड शिवारात घेऊन त्यात ४९ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ झाले. अध्यक्षस्थानी आ.चंद्रकांत पाटील होते. प्रमुख उद्घाटक डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे, सेवानिवृत्त बँक मॅनेजर एन.जी.शेजोळे, डॉ. प्रवीण पाचपांडे, युवराज पाटील होते. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. पूज्य भंत्ते सारीपुत्य यांनी त्रिशरण, पंचशील, परित्राण पाठ, जय मंगल अष्टगाथा घेण्यात आले. प्रतिज्ञा देऊन विवाहांचे सोपस्कार पार पाडले. भीमस्टार…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमित शुध्द पाणी पुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेना-उबाठा पक्षाने बुधवारी, २९ मे रोजी धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. धरणगाव शहरात सध्या अतिशय तीव्र पाणीटंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या अनुषंगाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका गाठली. येथे मुख्याधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडून रोष व्यक्त केला आहे. याप्रसंगी पक्षाच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या नावे एक निवेदन लागू केले आहे. शहरातील जैन गल्ली येथे नवीन पाईप बसवून पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यात थेट व्हाईट हाऊसपासून ते जैन गल्लीपर्यंत आणि परिसरात ज्यांनी नळ घेतलेले आहेत. त्यांना…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर नैसर्गिक संकटांशी संघर्ष करत शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असताना लोंढ्री शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्या अज्ञात चोरट्यांंनी चोरून नेल्या. याबाबत लोंढ्री येथील प्रकाश रामचंद्र गव्हाळे, विलास रामचंद्र गव्हाळे, अशोक माधवराव पांढरे यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. शेतीमालाला असलेला कवडीमोल भाव, उत्पन्नात झालेली प्रचंड घट यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी अशा चोऱ्यांमुळे हतबल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात म्हटले आहे की, आमची शेती मोतीआई मंदिराजवळ असून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात जमा केलेले ठिबक लंपास केल्याचे…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत सत्कार केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेच्या अभिनव उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला. मोनाली योगेश बनकर हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या ठरावाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाची तिला संधी मिळाली आहे. तसेच राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडू जागृती रवींद्र चौधरी हिने खेळासोबतच शालेय अभ्यासातत प्राविण्य मिळवत शाळेतून ८७. ६०…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर शेत शिवारात विजेचा लपंडाव होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा नियमित सुरू व्हावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी वीज अभियंत्यांचे कार्यालय गाठून निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी अभियंता सुरेश चौधरी यांनी लवकरच नाचणखेडा फिडर दोन भागात सुरू करणार असून शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मे महिन्यात उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे तापमान ४० ते ४७ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याने शेतातील पीके सुकत चालली आहेत. त्यातच विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना वेळेत देता येत नसल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. शेत शिवारातील वीजपुरवठा नियमित सुरू व्हावा, या मागणीसाठी सहाय्यक अभियंता…