Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पुण्यातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया राठोड ह्या लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांची नियुक्ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात केली आहे. त्यांच्या अनुभवाचा निश्‍चितच रूग्णांना फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. दररोज सकाळी ९ ते ५ या वेळेत त्या रूग्णालयात स्त्रीरोग विभागात उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे. डॉ. प्रिया राठोड या मूळच्या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. त्यांनी शासकीय महाविद्यालयातून एबीबीएस पूर्ण केल्यावर बी.जे. मेडीकल कॉलेज,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी स्वत:ला वाचविण्यासाठी आजच तंबाखू न खाण्याचा संकल्प करू या असे आवाहन जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक नितीन विसपुते यांनी केले. जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क आणि जैन फूडपार्क यासह सर्व आस्थापनांमध्ये ३१ मे हा जागतिक धुम्रपान निषेध व तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांशी ते सुसंवाद साधतांना बोलत होते. बांभोरी येथील जैन प्लास्टिक पार्कच्या डेमो हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे यांनी करून नितीन विसपुते यांचा परिचय करून दिला. प्लास्टिक पार्क येथील सिक्युरिटी ऑफिसर श्री. मॅथ्यू यांनी गुटखा खाल्याचे दुष्परिणाम…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील वाहतूक नियंत्रक संजय भाऊलाल कुमावत हे आपली सेवा पूर्ण करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल विश्‍वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे पवन माळी, रवि झाल्टे, मोहन सुरवाडे, जीवन राठोड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच त्यांचा अनेकांनी गौरव करुन त्यांच्या सेवेचे कौतुक केले आहे.

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते पॉलिटेक्निकमधील अद्ययावत संगणकीय साधन सामुग्री, पुरेशा क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग आदी बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.)च्यावतीने कोलते महाविद्यालयात २०२४-२५ च्या प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासाठी २९ मे पासून ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही अतिरिक्त कागदपत्राची आवश्‍यकता नसून विद्यार्थ्यांनी येत्या २५ जून पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी माहिती कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी दिली. प्राचार्य डॉ. खर्चे म्हणाले की, भारतीय नागरिकत्व असलेला विद्यार्थी, महाराष्ट्र…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इंडियन डेंटल असोसिएशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या सभागृहात तंबाखु विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी तंबाखु जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ.आशिष महाजन यांनी तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन चित्रफीत दाखविली. तंबाखु जन्य पदार्थांच्या सेवनाने नाक, कान, घसा, तोंडाचा व फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे तंबाखु किंवा…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नोकरी करीत असतांना सामाजिक भान आणि जाणीव ठेवत चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने येत्या पावसाळ्यात ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्षसंवर्धनाचा’ अंतर्गत सिडबॉलच्या माध्यमातून औषधी आणि उपयुक्त झाडांची बी निसर्गात टाकण्याच्या उपक्रमासाठी एक लक्ष सिडबॉल तयार केले जात आहेत. त्यासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंतासह कर्मचारी पुढे सरसावले आहे. साप्ताहिक श्रमदान शिबिरातून सीडबॉल्स आणि रोप पिशव्या तयार करण्यात येत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील अनेक औषधी व उपयुक्त वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात नष्ट होत असलेले वैभव वाचविण्याच्या दृष्टीने तसेच तापमानात होणारी वाढ़, वातावरणातील बदल त्यामुळे निसर्गचक्र बदलत आहे. उष्माघात सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मतदार संघातील बोदवड तालुका अवर्षण प्रवण क्षेत्र व दुष्काळी भाग असल्याने शहरातील नागरिकांना गेल्या स्वातंत्र्येत्तर काळापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमची नष्ट व्हावी, यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांचा शासन दरबारी युद्धपातळीवर पाठपुरावा सुरू आहे. आता या योजनेला गती मिळाली असून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आ.चंद्रकांत पाटील, नाशिकचे मुख्य अभियंता भुजबळ, अधीक्षक अभियंता नरवाडे, मुख्याधिकारी गजानन तायडे, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सईद बागवान तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली. आगामी २५ ते ३० वर्ष लक्षात घेता…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी तालुक्यात गाव व शहरी भागात मान्सूनपूर्वी नाल्यांची सफाई करावी, जीर्ण इमारत असल्यास त्यांना नोटीस द्यावी, रस्त्याने महामार्गाने पडाऊ वृक्ष काढून घेण्याच्या सूचना तहसीलदार बंडू कापसे यांनी आयोजित मान्सून पूर्व आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. रावेर तहसिलला २९ मे रोजी मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार होते. बैठकीत मान्सूनपूर्व नियोजन व तयारी करण्यासंदर्भात उपस्थित संबंधित अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, मुख्यधिकारी स्वालिहा मालगावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एम.पी.चौधरी, सह पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ, सह पोलीस निरीक्षक निंभोरा हरिदास बोचरे, भावेश चौधरी, अजय जाधव, स्वप्निल पाटील, अमोल वाघ,…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील बॉयलरमधून निघणारे तापमान व प्रदूषणामुळे वरणगाव शहराचे सर्वाधिक ४७ . ३ डिग्री से.तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वरणगावकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच दीपनगर प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात वरणगाव व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना वरणगाव पर्यावरण व मानवी जीवन संरक्षण समितीच्यावतीने निवेदन दिले. निवेदनात वरणगाव शहरात पूर्वीपेक्षा यावर्षी दीपनगरमधून निघणाऱ्या बॉयलरच्या उष्णतेमुळे व प्रदूषणामुळे तापमानाची जिल्ह्यात सर्वाधिक नोंद झालेली आहे. त्यामुळे वरणगाव शहरात राहणारे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहे. भविष्यात ६६० या नवीन वीज प्रकल्पामुळे तापमानात…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील शेती कामाला वेग आला आहे. तसेच पेरणी जवळ येत आहे. शहरात बियाणे, रासायनिक खते वेळेवर शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांची वेळेवर पेरणी होईल. शहरात आतापासूनच शासनाने खबरदारी म्हणून सर्व कृषी विक्रेते यांच्यावर नियंत्रण ठेवावे. प्रत्येक दुकानावर प्रत्येक बियाण्यांचे भावफलक असावे, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, रासायनिक खते वेळेवर मिळावी. तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जही तत्काळ मिळावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार महेंद्र वाणी यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना बियाणे वेळेवर पुरवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दगडु शेळके, मधुकर पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोरे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील,…

Read More