Author: Sharad Bhalerao

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर पहुर – कसबे येथील लेलेनगर भागातील रहिवासी प्रकाश शंकर बारी ( फुसे, वय ६०) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या करुन आयुष्य संपविल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे पत्नी बाजारात तर मुलगा कपाशीची गाडी भरायला गेलेला असताना घरात कोणीही नसल्याचे पाहून प्रकाश बारी यांनी घराचा दरवाजा अडकवून दोरीने गळपास घेतला. मुलगा राहुल कपाशीची गाडी भरून घरी आल्यावर दरवाजा उघडताच त्याने वडिलांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत पाहताच एकच हंबरडा फोडला. शेजारील रहीवाश्‍यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात…

Read More

साईमत, जळगाव :  विवेक ठाकरे येत्या ७ जूनला मृग नक्षत्राचा मुहूर्त आहे,खरीपाच्या पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत अन्‌‍‍ बी-बियाण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरु असतांना कृषि विभागाला सचिव आणि नुकतेच बदलीने रिक्त झालेले आयुक्तच नसल्याने ऐन हंगामात शेतकरी वाऱ्यावर आहे. राज्य कृषि आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांची ३१ मे रोजी नाशिकला बदली झाल्याने आज त्यांचा पदभार कुणाकडे तरी प्रभारी म्हणून सोपवण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे राज्याचा कृषि विभाग प्रभारीराजच्या गर्तेत अडकला आहे. राज्याच्या कृषि मंत्री कार्यालयातून राबविण्यात आलेल्या बेकायदा निविदा प्रक्रियेला विरोध केल्याने लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी कृषि कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची सहकार…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी, ४ जून रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी, २ जून रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. निवडुन येण्याचा जल्लोष साजरा करतांना कोणाला त्रास होणार नाही, त्याची काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद शहरात उमटणार नाही. त्यामुळे कुठलेही गालबोट लागणार नाही. सोशल मीडियावर पोस्ट टाकतांना कोणाच्या भावना दुखावणार नाही, अशी पोस्ट टाकू नये, त्याची काळजी घ्यावी. यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, माजी उपनगराध्यक्ष कलिम…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था निर्मिती आणि नागरिक शिष्टाचार व कर्तव्याचे पालन यातून आपणा सर्वांना पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी केले. चिखली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत ‘संघ शिक्षा वर्ग (सामान्य)’च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. १ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारोहाला मंचावर प. पू. परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज, वर्गाचे सर्वाधिकारी राजेश लोया, तालुका संघचालक शरद भाला उपस्थित होते. श्रीधरराव गाडगे पुढे म्हणाले, कुटुंबातील संस्कारक्षम वातावरणाला तडे जात आहे.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव बसस्थानकात आलेल्या दोन प्रवाशांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना १ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. या गुन्ह्यातील चोरट्याला अवघ्या ४ तासात जिल्हापेठ पोलिसांनी बसस्थानक आवारातून मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) याला अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जळगाव शहरातील विठ्ठलपेठ येथील राहणारे सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानक येथे ते बसमधून उतरल्यावर त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष लक्ष्मण…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी किंवा प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्‍यक असते. पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकेतील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांना विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी इंडियन पेटंट, डिझाईन पेटंट, कॉपीराइट्स तसेच इतर देशातील पेटंट हे बहाल केले आहे. यामुळेच इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) मध्ये महाविद्यालयाला ‘स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाची संशोधनामध्ये निरंतर प्रगती व्हावी, यासाठी प्राध्यापक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतो. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नामांकित पब्लिकेशनच्यामार्फत विविध पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांना मिळालेले पेटंट्स यंत्र विभागात डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) १ डिवाइस फॉर लेझर…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर गोगडी प्रकल्पातून होणाऱ्या अवैध पाणी उपशामुळे गावावर पाणीटंचाईचे संकट आले आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. हे संकट निवारण्यासाठी दोन विहिरींच्या अधिग्रहणासह टँकरच्या मागणीचा एकमुखी ठराव पहूरपेठ, सांगवी, खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर करून टंचाई शाखेकडे पाठविला आहे. जामनेर तालुक्यात आजमितीला १० गावे टंचाईग्रस्त आहे. १९ गावांच्या विहिरी अधिग्रहित केल्याची माहिती टंचाई शाखेने दिली. गेल्या पाच वर्षांपासून मोतीआई धरणातून पहूरला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे गोगडी प्रकल्पावर पहूरची मदार आहे. पहूर पेठ अंतर्गत खंडेराव नगर आणि ख्वाजानगर भागात पिंपळगाव कमानी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गोगडी प्रकल्पाने तळ गाठल्याने पाणीटंचाईचे उभे राहिलेले…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी प्रथम बस नगर ते पुणे चालविली गेली. त्यावेळी फक्त आठ आणे भाडे होते. आज बघता बघता दररोज विविध बसेसच्या माध्यमातून ५५ लाखापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. एसटी बसवर अनेक संकटे, आर्थिक समस्या, कधी आनंदी, कधी दुखी प्रवास करत ती जीवन वाहिनी बनली आहे. त्यामुळे अनेकांची ती आपलीशी झाली आहे. अंध, अपंग, वयोवृद्ध महिला, शालेय विद्यार्थिनी यांची हक्काची बस झाली आहे. स्पर्धेच्या युगातही चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांमुळे ‘लालपरीने’ विश्‍वासार्हता जपली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी केले. येथील बस स्थानकात शनिवारी, १ जून रोजी एसटी बसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार करणे गरजेचे आहे. नोकरीच्या पॅकेज सोबत आपले पालक अर्थात आई-वडील आनंदाने, समाधानाने सोबत असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वक्ते गनी मेमन यांनी केले. मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ‘माय फ्युचर, माय रिस्पॉन्सिबिलिटी’ विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष सरिता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी उपस्थित होते. व्याख्यानात मेमन यांनी विद्यार्थ्यांना पदवी सोबत अनुभव महत्त्वाचा आहे. वेगळे काही कराल तर तुमची ओळख निर्माण होईल. जीवन सुंदर आहे, त्यात चढ-उतार, यश- अपयश येणार आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही. त्यामुळे आत्महत्या घडताना आपण पाहतो. त्यासाठी प्रत्येकाजवळ ‘बी…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी आगामी होणारी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (पक्ष शरद पवार) पार्टीतर्फे पक्षादेश झाल्यास लढविणार असल्याची घोषणा तालुक्यातील मूळचे कोदोली गावाचे रहिवासी ह.मु.जामनेर स्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान जुने कार्यकर्ते व्ही. पी. पाटील यांनी शनिवारी, १ जून रोजी जामनेर शहरातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनेक दिग्गज नेते इच्छुक असले तरी मी पक्षाकडे जुना कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागणार आहे. जामनेर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाच ही जागा सुटावी, म्हणून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मला उमेदवारी न मिळाल्यास मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.…

Read More