Author: Sharad Bhalerao

साईमत, पुणे : विशेष प्रतिनिधी राज्याच्या कृषी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार रावसाहेब भागडे यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तपदावरून डॉ. प्रवीण गेडाम यांची ३१ मे रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस कृषी आयुक्तपदाची जागा रिक्त ठेवली गेली. आयुक्तांची बदली करुन ऐन खरिपात कृषी विभाग वाऱ्यावर सोडण्यात आल्याची टीका होत होती. शेवटी या पदाचा तात्पुरता कार्यभार श्री. भागडे यांच्याकडे देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे कोणाला द्यावीत याचे अधिकार कृषी खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांच्याकडे होते. त्यानुसार आदेश होऊन अवर सचिव अ.नि.साखरकर यांनी भागडे यांच्या नावाचा आदेश सोमवारी (ता. ३) सायंकाळी जारी केला. यापूर्वी तत्कालीन कृषी…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडाच्यावतीने महाविद्यालयाच्या उद्यानात वडोदा कुऱ्हा वनविभागाचे वनरक्षक सुधाकर कोळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. पिंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा कुऱ्हा पॅटर्न उपस्थितांसमोर मांडला. मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुऱ्हा महाविद्यालयामार्फत इको ब्रिक्सची मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या विटांचा वापर करून विविध उपयोगी फर्निचर बनविण्याचे कार्य केले जाणार आहे. यासाठी घरातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर इको ब्रिक्स (प्लास्टिकच्या विटा) बनविण्यासाठी केला जात आहे. आम्ही परिसरातील शाळांना इको ब्रिक्स चॅलेंज या उपक्रमात सहभागी करून घेतले. सर्वप्रथम परिसरातील सहा शाळांना आम्ही भेटी दिल्या व तेथील विद्यार्थ्यांना इको ब्रिक्सचे…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील बुऱ्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीत तात्काळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, यासाठी मुक्ताईनगर शिवसेनेच्यावतीने मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांना निवेदन देण्यात आले. मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील बुऱ्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमी बांधकामासाठी आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून नगर विकास विभागातून निधीची तरतूद होऊन काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अद्यापही नगरपंचायत विभागाकडून याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने त्याठिकाणी साहित्य चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. तेथे बसविण्यात आलेले मार्बल भामट्या चोरांकडून चोरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, असे निवेदन शिवसैनिकांनी दिले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामी तात्काळ दाखले द्या शैक्षणिक सत्र २०२४-२५ करीता विद्यार्थ्यांना लागणारे सर्व…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरात एकाच समाजात असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दुचाकीच्या धडकेचा बहाणा करत चार जणावर पाच जणांच्या टोळक्यातील एकाने सपासप वार केल्याने एकाचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून पसार झालेल्या पाचपैकी दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे. दोघांना भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दुचाकी धडकेचा बहाणा केला असल्याची शहरात चर्चा सुरू आहे. सविस्तर असे की, आकीबअली कमरअली (वय १९, रा. गौसीया नगर) हा मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नगर परिषद समोरून…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : प्रतिनिधी जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाघुर पुलानजीक जीवघेणा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जळगाव -छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत नवीन पुलाचे काम सुरू आहे. सध्या एकाच पुलावरून लहान – मोठी हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. बसस्थानक ते पुला दरम्यानच्या भागाचे काँक्रिटीकरण करणे बाकी असल्याने कच्च्या मार्गावर वारंवार खड्डे पडतात. याच १०० मीटरच्या परिघात बालकवयित्री ज्ञानेश्‍वरी भामेरे सह ३ निरपराध नागरिकांचे नाहक बळी गेलेले आहे. अद्यापही पुलानजीकचा भाग कठड्यांअभावी ‘मौत का कुआ’ बनलेला आहे. नॅशनल हायवे ॲथॉरिटीचे दुर्लक्ष राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील साई इंग्लिश अकॅडमी तसेच सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर, वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन सोहळा साजरा करण्यात आला.सोहळ्यास अमळनेरचे सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या टीमची उपस्थिती लाभली. यावेळी वनपाल आय.टी.चव्हाण, वनपाल पी.जे.सोनवणे, वैशाली साळी, वनरक्षक सीमा शिंदे, सुप्रिया देवरे उपस्थित होते. पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या जगभरात जाणवत आहेत. त्यासंदर्भात जनमानसात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व आपल्याला समजले, वृक्ष हेच ऑक्सिजन-प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत आहेत. म्हणूनच जास्तीत जास्त वृक्ष लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजे, असे आय.टी.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील स्टेशनरोड परिसरात स्वाती देशमुख या रिक्षाने प्रवास करीत असतांना प्रवाशी रिक्षात गर्दी करुन त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने ओढुन, जबरी चोरी करुन घेऊन जाणाऱ्या तीन महिला आरोपीतांना गस्तीवरील पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना महिला पोलीस अंमलदार व महिला पंचासमक्ष ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल चार हजार रुपये रोख, पंचवीस हजाराचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार), सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शन आणि सुचनेप्रमाणे चाळीसगाव शहर पो.स्टे.ला फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. याकामी सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदार संघातून रक्षाताई खडसे ह्या तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल बस स्थानक परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा जल्लोष केला.रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षाताई खडसे यांनी हॅट्रिक केली आहे. तसेच जळगाव मतदार संघातून स्मिता वाघ निवडून आल्याने दोन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, आर. बी. पाटील, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्‍वर पाटील, शेंदुर्णी जिनिंगचे माजी चेअरमन श्‍याम सावळे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, सरपंच अब्बू तडवी, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, संदीप बेढे, ललित लोढा, योगेश भडांगे, राजू जेंटलमन, सचिन कुमावत यांच्यासह कार्यकर्ते…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी, ४ जून रोजी दुपारी एकावर चाकुचे सपासप वार केल्याने त्याला ‘यमसदनी’ धाडले आहे. याच घटनेत इतर तीन जण जखमी झाले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे . सविस्तर असे की, वरणगाव शहरातील गौसिया नगर (सिनेमा रोड) आणि उमर कॉलनी भागातील दोन गटामध्ये पाच-सहा महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर त्याचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले होते. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या वादाची…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर येथील बस स्थानकात पहिल्याच पावसात बस स्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पहूर बसस्थानक छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील एक मोठे बस स्थानक आहे. येथे नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने पहूर येथून शिक्षणासाठी ये-जा करतात. सकाळी ४ वाजेपासून रात्री उशीरापर्यंत येथून हजारो प्रवाशांचा येथे राबता असतो. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पहूरला मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसात बसस्थानकात डबकी साचल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे. लोकवर्गणीतून उभारलेल्या बसस्थानकाला वाली कोण? ट्रक अपघातात…

Read More