साईमत, जळगाव : प्रतिनिधी गेल्या ३२ वर्षापासून साप्ताहिक, सायंदैनिक आणि सध्या नियमित दैनिक असा दमदार आणि विश्वासार्ह प्रवास करून वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या साईमत समूहाच्या कार्यकारी संपादक पदावर ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल हे रुजू झाले आहेत. सोबतच साईमत समूहात वाणिज्य संपादक म्हणून विवेक ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साईमत मीडिया प्रा.लि. कंपनीचे संचालक व संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी दोघांना सूत्रे बहाल करत समूहात स्वागत केले. यावेळी साईमतचे व्यवस्थापक सुनील अहिरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे, उपसंपादक राकेश कोल्हे, शरद भालेराव, जाहिरात विभागाचे विजय महाजन, वितरण प्रमुख शशिकांत राजवैद्य आदी सहकारी उपस्थित होते. सुरेश उज्जैनवाल व्यासंगी अन् अनुभवी पत्रकार गेल्या ३० वर्षापासून…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत १ मे ते ३१ मे च्या दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने विमा कराराच्या निकषानुसार जिल्ह्यातील सर्व ८६ महसूल मंडळामधील विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी हा वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसह व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे त्याचा आर्थिक कणा पूर्णता मोडला गेलेला आहे. बहुतांश पीडित केळी उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ चा पिक विमा अजूनही मिळालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात ५८ हजार ७३३ हेक्टरवर ५६ हजार ३६१…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे (एमएसपी) वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशिल शिक्षक तथा समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कविवर्य अनंत राऊत, एमएसपीचे अध्यक्ष दीपम जामे यांच्या हस्ते नुकताच नाशिक येथे राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या.तथा नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्प तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष संगीतराव पाटील यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी न्या.संगीतराव पाटील, मिना पाटील, अशोक पाटील, अनिता पाटील, तेजस पाटील, सुनील पाटील, सुरेखा पाटील, उषाताई पाटील, लताबाई सूर्यवंशी, सुवर्णा सूर्यवंशी, सर्वश सूर्यवंशी, समृध्दी सूर्यवंशी उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील लोकांची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रयत सेनेच्यावतीने शिवाजी घाट येथे गुरुवारी, ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेशाध्यक्ष खुशाल पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, माजी नगरसेवक दीपक पाटील, शहराध्यक्ष छोटू अहिरे, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर सहसंघटक दीपक देशमुख, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक शिवाजी गवळी, प्रकाश गवळी, सुनील पवार, अजय…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरातील मोंढाळा रस्त्यावरील असणाऱ्या ऑइल मिलमध्ये सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत चाकूचा धाक दाखवून जबरी दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली असून पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आशिष जगदीश बाजोरिया (वय ४८, रा. हिंद ऑइल मिल, देशमुखवाडी, पाचोरा) यांनी २३ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली होती. त्यानुसार २३ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोंढाळा रस्त्यावरील बाजोरिया ऑइल रिफायनरी ऑइल मिलमध्ये दरोडा पडला होता. सुरक्षारक्षक प्रभाकर रामदास पाटील (वय ६१, रा. सारोळा, ता. पाचोरा) यांना अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. नगर परिषदेच्या प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेवरील वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे सोयीस्करपणे उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शहरात पाण्याची परिस्थिती बिकट होत असल्याने १५ दिवसानंतर होणारा पाणी पुरवठा किमान आठ दिवसाने केव्हा होईल? त्याची प्रतिक्षा शहरवासीयांना लागली आहे. शहराला तापी नदी पात्रातून पाण्याची उचल करून जलशुद्धी केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, होणारा १५ दिवसानंतर अवेळी होत असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. नदी पात्रात मुबलक साठा असूनही वरणगाव वासीयांना का वेठीस धरले जात आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी रावेर न्यायालयाच्या कक्षेत साकारल्या जाणाऱ्या अनोख्या संकल्पनेचे अनुकरण प्रत्येकाने करावे. त्यामुळे जागतिक पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल. यासोबत न्यायालय परिसर सुंदर, सुशोभित व हरीत व्हावा, या हेतूने नाशिकमधील ‘हिरवांकुर’ फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकार होत असलेले ‘हर घर किसान’ व ‘वृक्ष दत्तक’ अभियानात सक्रियपणे सहभाग घेऊ. तसेच ‘हिरवांकुर’च्या साथीने न्यायालयाचा परिसर हरित अन् सुंदर करू, असा मनोदय रावेर तालुका न्यायालयातील मुख्य न्यायाधीश प्रवीण यादव यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित प्रतीकात्मक वृक्षारोपणाच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाझर चंदू बिऱ्हाडे, सीनियर क्लर्क दिनकर इंगळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष बी.डी.निळे, सचिव के.डी.पाटील, सर्व विधीज्ञ, सेवक वृंद व हिरवांकुर टीमचे…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथे वीज महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत आ.चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांसह मतदार संघातील शेतकऱ्यांना घेऊन मुक्ताईनगर येथील वीज महावितरणचे विभागीय कार्यालय येथे गुरुवारी, ६ जून रोजी दुपारी १२ वाजता जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर निवेदन देण्यात आले. तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा थेट इशाराही दिला आहे. यावेळी मुक्ताईनगर वीज महावितरण विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता विवेक स्वामी, मुक्ताईनगर उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर ढोले यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी सद्यस्थितीत अस्मानी संकटांनी त्रस्त झालेला आहे. त्यातच प्रचंड उन्हाचा तडाखा बसत असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील जनताही हवालदील झालेली आहे. अशा परिस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील वीज महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे विजेचे तार खंडित…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सेवा सहयोग फाउंडेशन ही पुणे, मुंबई येथील संस्था आहे. संस्थेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाची सुरुवात सहा वर्षापूर्वी करण्यात आली. ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत पाणी विषयाला धरून सर्वप्रथम कामाला सुरुवात झाली. मूळ उद्देश शिक्षण होता. मुलांचे सतत शाळेत गैरहजर असण्याचे मुख्य कारण होत पालकांचे स्थलांतर. हे स्थलांतर रोजगारासाठी होत होत रोजगार उपलब्ध करुन द्यायचा असेल तर त्याचे मुख्य साधन शेती होती. शेती करायची असेल तर पाण्याची गरज होती. मुळात खान्देश हा कोरडवाहू भाग किंवा दुष्काळी पट्टा आणि म्हणून जर मुलांना शाळेत आणायचे असेल तर पालकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले पाहिजे.…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर दिवसेंदिवस वाढणारे तापमान, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे मानवी जीवणावर होणारे दुष्परिणाम हा जनतेसाठी नवीन विषय राहिलेला नाही. पर्यावरण वाचवायचे असेल तर प्रत्येकाने किमान दोन झाडे जगविली पाहिजेत. झाडे जगविण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. कारण आत्ताच तापमान ४५ च्या पुढे गेले आहे. त्यामुळे उष्माघाताने कित्येक प्राण्यांना व पक्षांना जीव गमवावा लागला आहे. येत्या पाच वर्षात ते ५०च्या आसपास पोहचेल. तेव्हा मात्र आहेत ती झाडेही जळून जातील, मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होईल, पाण्याचे स्त्रोत आटून जातील. अशा परिस्थितीत नवीन झाडे लावणेही शक्य होणार नाही. म्हणून येणाऱ्या पावसाळ्यात किमान आपल्या भावी पिढीसाठी तरी वृक्ष लागवड…