साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील नगरपालिका मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळा क्र.१ महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था शाखा सावदाकरिता पालिकाकडून अधिकृतरित्या भाडेतत्त्वावर संस्थेने घेतला होता. परंतु गाळा पालिका मालकीचा असल्याची संपूर्ण माहिती असूनही गाळा स्वत:च्या नावावर लावण्यासाठी विक्की विजयकुमार आहुजा (रा.जळगाव) यांनी गैरमार्गाने १०० रुपयांच्या दोन स्टॅम्पवर परस्पर तयार केलेली बनावट ताबा पावती व प्रतिज्ञापत्रावर माझी खोटी सही असल्याबाबतचे एक पत्र जून २०१८ मध्ये पतसंस्थेचे अवसायक अशोक डी.बागल यांनी सावदा पालिकेत दिले होते. या पत्रावर (श्री.आहुजा वसुली विभाग याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी) अशी स्पष्ट लेखी टिप्पणी त्यावेळी असलेले मुख्याधिकारी सौरभ द. जोशी यांनी दिलेली दिसत…
Author: Sharad Bhalerao
साईमत, यावल : प्रतिनिधी अति तापमानाच्या निकषात यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश करण्याबाबत यावल रावेर तालुक्याचे भावी नेतृत्व तथा उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी, १२ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. रावेर विधानसभा मतदार संघातील भावी उमेदवार तथा शेतकरी आणि आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय शिरीष चौधरी (खिरोदा) यांच्यासह लीलाधर विश्वनाथ चौधरी (भालोद), सती हरिश्चंद्र पाटील (बोरावल खु.), ज्ञानेश्वर श्रीधर बऱ्हाटे (पाडळसे), केतन दिगंबर किरंगे (फैजपूर), भूषण घनश्याम भोळे (हिंगोणा) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यावल व रावेर तालुक्यात केळी मुख्य पिक आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, चक्रीवादळ,…
विवेक ठाकरे साईमत, जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून प्रबळ दावेदार म्हणून निवडणूकीपूर्वी त्यावेळी चर्चेत आलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हे उमेदवारी न मिळाल्याची सल मनात ठेवत ऐन निवडणुकीत निष्क्रिय राहिल्याचे चित्र असतांना आता खा.रक्षाताई खडसे यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने जावळे यांच्याकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्याच्या आनंदाचे उसने अवसान दाखवले जात आहे. लोकसभा निवडणूकसाठी आपली उमेदवारी निश्चित असल्याच्या अविर्भावात असलेले अमोल जावळे यांचा पत्ता कट झाल्यावर आणि रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर,यावल व वरणगाव भागातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा नाट्य गाजले होते. दरम्यान, रक्षाताई यांना भाजपा कार्यालयात मंत्री गिरीष महाजन यांच्यासमोर जाब विचारणाऱ्या एका कार्यकर्त्याचा…
विकास पाटील, साईमत, जळगाव : ना. रक्षा निखिल खडसे (जन्म इ.स. १९८७) लोकसभेच्या सदस्य म्हणून नुकत्याच भाजपचा गड रावेर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. भाजपच्या श्रीमती खडसे यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला. त्या आता सलग तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघाच्या खासदार झाल्या आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघ २००८ च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला. येथे पहिल्यांदा २००९ मध्ये निवडणूक झाली. भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी मोठा विजय नोंदवला. तेव्हापासून ही जागा भाजपकडे आहे. या आधी २०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आल्या. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन यांचा…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदात स्थान मिळाले आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता भाजपा पक्षनेतृत्त्वाकडून रक्षा खडसे यांना आज फोन आला होता.त्यानुसार,त्या आज शपथविधीसाठी दिल्लीला रवाना झाल्या आहेत.त्यांच्याबरोबर त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेही दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दाटलेल्या कंठातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. “रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटतं की, गेले अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचे श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपावर ठेवलेली निष्ठा याचे फळ म्हणून…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी अंतर्धान समाधी सोहळा साजरा झाल्यावर आईसाहेब मुक्ताईना आलेला थकवा क्षीणभाग घालविण्यासाठी प्रक्षाळ पूजा शुक्रवारी, ७ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १० वाजेपर्यंत महाआरती व पूजा अभिषेक करून झाली. प्रक्षाळ पूजा संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते पार पडली. याप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मूळ मंदिर व्यवस्थापक उध्दव जुनारे महाराज, राम जुनारे, विनायक व्यवहारे, दुर्गा मराठे, कल्पना हरणे, गीता जुनारे, गणेश आढाव यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. २५ मे ते ४ जूनपर्यंत संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. हजारो भाविकांनी अकरा दिवसात दर्शन घेतले. यात्राकाळात मंदिर २४…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी गेल्या २६ मे रोजी झालेल्या वादळामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. नवीन विद्युत पोल, पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा, कृषी पंपाचे विद्युत कनेक्श्न यासह अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आ.राजेश एकडे यांनी ६ जून रोजी वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.तायडे यांच्यासोबत चर्चा करुन ही समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. झाडे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने १ हजार विद्युत पोल क्षतीग्रस्त झाले होते. तसेच अनेक विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जनावरांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने पाण्याअभावी जनावरे मृत पावले होते. अनेक गावे अंधारात बुडालेली होती. अजुनही बहुतांश ठिकाणी बऱ्याच…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यावर ६ जून रोजी ‘एक दिवस महाराजांसाठी’ प्रतिष्ठानतर्फे तसेच यावल शहरातील सकल हिंदू बांधवांतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रम व भव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शहरातील श्याम शास्त्री महाराज यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे राज्याभिषेक पूजन शास्त्रोक्त पद्धतीने करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. पुजनासाठी अथर्व बयानी महाराज यांनी सहकार्य केले. त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्यापासून यावल शहरातून मेन रस्त्यावरून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रामध्ये चुंचाळे येथील गुरुमाऊली भजनी व म्युझिकल बँड सोबत वडोदा येथील महिलांचे व पुरुषांचे भजनी मंडळ त्यानंतर शिवरायांची पालखी, शिवरायांचा सजीव देखावा, बुरझड, जि.धुळे येथील सरस्वती बँड,…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शेतमालास असलेला कवडीमोल भाव आणि उत्पन्नापेक्षा वाढलेला उत्पादन खर्च अशा विविध संकटांशी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांना आता शेत शिवारातून शेती साहित्य चोरणाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेत शिवारात सध्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शेतीपयोगी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रारी देऊन गुन्हे नोंदविले आहेत. अर्जुन मोतीलाल घोंगडे यांच्या खर्चाणे रस्त्यावरील गट क्रमांक १७६ या शेतातून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले १ बोअरवेल पंप, फाईव्ह एचपी पाणबुडी कृषी पंप, थ्री एचपी कृषीपंप, १२५ लोखंडी मेखा, घन, व्हायब्रेटर यंत्र, पत्र्याची पेटी असा ८० हजार रुपयांचा ऐवज…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा येथील कोळीवाडा जवळील वटुकेश्वर महादेव मंदिरातील नागदेवता व त्रिशूल चोरी झाल्याची घटना गुरुवारी, ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात लेखीनोंद केली आहे. मंदिरात चोर आहे की, भाविक हे लक्षात येत नसल्याने चोरांनी त्याचा फायदा घेत सकाळीच मंदिरातील पाच किलोचा पितळी नागदेवता व दोन किलोचा पितळी त्रिशुल चोरून नेला. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी रामानंद नगर पोलिसात लेखी सह्यासहीत तक्रार केली आहे. यावेळी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. गेल्या महिन्याभरापासून सोनी नगर जवळील श्रीराम नगरातील हनुमान मंदिरातील हनुमान मुर्तीला चांदीचे दोन डोळे लावले होते. ते चोरी झाल्याची…