Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क । धानोरा, ता. चोपडा । देवगाव, बिडगाव, मोहरद, वरगव्हाण, कुंड्यापाणी, पुनगाव, पिंप्री, मितावली, पारगाव, पंचक आदी परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे जेमतेम पडणाऱ्या पावसावर शेतकरी वर्गाने उडीद, मूग, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे लागले असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. परिसरात शेतकऱ्यांनी महागड्या किंमतीचे बि- बियाणे घेऊन पेरण्या केल्या. मात्र, अजुनही जोरदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. बोंडअळीच्या ॲटकमुळे शेतकरी धास्तावले गेल्यावर्षी कापूस पिकावर भाव कमीने अचानक ॲटक केल्याने कापसाचे जेमतेम उत्पन्न हाती आल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । जामनेर । जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत धडक अंगणवाडी तपासणी मोहिमेंतर्गत तपासणी झालेल्या बालकांमधून कुपोषित बालकांसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे विशेष तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरी पुजनाने करण्यात आले. शिबिराचे आयोजन आरोग्य विभाग, महिला बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. इंडियन पेड्रीयाट्रिक असोसिएशनचे शिबिरास सहकार्य लाभले. त्यात डॉ.अमोल शेठ, डॉ.सतीश चौधरी, डॉ.संदीप पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.राहुल निकम या बालरोग तज्ज्ञांमार्फत कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्यात २८३ जणांच्या तपासणीतून ३४ बालकांना जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले. समता फाउंडेशनमार्फत अतिरिक्त औषध…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव । सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल बिलाखेड शाळेतील सातवीची विद्यार्थिनी ज्ञानदा सचिन सोनवणे (रा. चाळीसगाव) हिने मुंबई (अंधेरी) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. ज्ञानदाने १४ वर्ष आतील गटात सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेत ७ देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. ज्ञानदाच्या यशात चाळीसगाव येथील कुंगफू कराटे मास्तर फिरोज खान यांनी मार्गदर्शन केले. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलच्या प्राचार्य सिस्टर बिंदू अँटोनी यांनी तिचे ट्रॉफीसह पदक देऊन शाळेतर्फे गौरव केला. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक योगेश शिंदे यांच्यासह सर्व शिक्षकांनी कौतुक केले. ज्ञानदा ही शास्त्रीनगर प्रभाग ४ च्या माजी नगरसेविका रंजना सोनवणे यांची नात, अंधशाळेचे…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । यावल । येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेले घरकुलांचे थकीत हप्ते मार्च २०२४ पासून लाभार्थ्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे ते लवकरात लवकर वितरित करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्याची तात्काळ दखल घेत नगरपरिषदेने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थकीत हप्ते जमा केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. घरकुल याजनेचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी, ता.यावल येथुन वितरित करण्यात येतात. पण बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे अनुदान रखडलेले होते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी यांच्याशी संपर्क करून लाभार्थ्यासह बँक समोर आंदोलन करु, असा…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर । येथील न.पा.मार्फत शासनाच्या रमाई घरकुल योजनेसह विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे संजय उर्फ भाऊसाहेब सरदार यांच्यासह आदींनी निवेदन देऊन अर्धनग्न आंदोलन करत २४ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेमार्फत मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आर.ओ. फिल्टर बसविण्यात आला होता. परंतु तो आर.ओ. फिल्टर आजपर्यंत सुरु केला नाही. या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. न.प. मलकापूरमार्फत दलीत मागासवर्गीय लोकांसाठी हक्काचे घर मिळावे, म्हणून…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ । शहरासाठी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यासाठी मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनचे पालक सलीम शेठ चुडीवाले यांनी जागा, ५० लाख रुपये, इतरांनी विविध स्वरूपात डोनेशन देऊन वृक्षारोपणासह मोफत हॉस्पिटलची निर्मिती करत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून इतर समाजानेही त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले. येथील मुस्लिम नुमाइदा फाउंडेशनद्वारा खडका रोड भागातील रॉयल पार्क भागातील निर्माण होणाऱ्या मल्टिनॅशनल हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनतर्फे शहरातील गरजू लोकांसाठी मोफत मल्टिनॅशनल हॉस्पिटल निर्माण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । यावल । वृक्ष लावण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असते. जी सामान्यत: जून ते सप्टेंबरपर्यंत असते. कारण माती ओलसर असते आणि पावसामुळे झाडाला आवश्‍यक पोषक द्रव्ये मिळतात. विशिष्ट प्रदेश, जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात आणि मातीच्या प्रकारासाठी वृक्षांची योग्य प्रजाती निवडून वृक्ष लागवड केली जाते. त्याचे निमित्त साधून तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ अभियान यावल येथे डॉ.कुंदन फेगडे यांनी आपल्या आईसोबत राबविले. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावल येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ अभियान संपूर्ण देशभर राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानिमित्त…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर । शहरात होणारा पिण्याचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसांवर होत आहे. तसेच नळाला येणारे पाणी अस्वच्छ असून मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात यावे, अशा मागणीसाठी शहरातील विविध परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत निवेदन देण्यात आले. गत काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा संपूर्ण विस्कळीत झालेला आहे. १० ते १५ दिवसांवर शहराला नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर नळाद्वारे येणाऱ्या पाणीमध्ये विविध जिवाणू , कीटक निघत आहे. मानवी आरोग्यास हानिकारक अशा प्रकारचे पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना योग्य मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिकाही असमर्थ दिसून येत…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर । वरखेड येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह संभाजी शिर्के यांनी दाताळा उपकेंद्रावर रात्री ९ वाजता धडक देत रात्री अभियंत्यांना जाब विचारत ताबडतोब वीज पुरवठा सुरू झाला पाहिजे, यासाठी यंत्रणा कामाला लावण्याची विनंती केली. त्याची दखल घेत अभियंत्यांनी ताबडतोब यंत्रणा कामाला लावून रात्री वरखेड शिवारातील वीज पुरवठा सुरू केला. तसेच दुसऱ्या दिवशी कंत्राटदार आणि एमएसईबीचे कर्मचारी मिळून पूर्ण फिटरचे मेन्टेनन्स केल्या जाईल, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली. पूर्ण फिटरची मेन्टेनन्स होऊन व्यवस्थित मार्गी न लागल्यास नंतर आक्रमक आंदोलन करण्यात येईल, अशा पद्धतीचा इशारा संभाजी शिर्के यांनी अभियंत्यांना दिला होता. यावेळी वरखेड येथील सरपंचासह ३० ते ४० युवक…

Read More

साईमत/न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर । येथील अमृत २.० अभियान अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या वाढीव किमतीस मान्यता तसेच बोदवड येथील दोन्ही पाणीपुरवठा योजनांची आचारसंहितेनंतर निविदा निघणार असल्याची माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. निविदा प्रक्रियेचे २१ दिवस कमी करावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या महिन्याभरात योजनांच्या कामांना सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शिंदे गट विधानसभेचे प्रमुख सुनील पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास ६ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३२ कोटी १४ लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता दिलेली होती. योजनेत तांत्रिक बाबी नसल्याने…

Read More