साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव । नेहमीच्या मारहाणीला कंटाळून तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरुड येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत प्रेत तहसील आवारातून हलविणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर चौघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली आहे. त्यानंतर तब्बल तीन तासानंतर प्रेत तहसील आवारातून हलविण्यात आले. विलास भाईदास घिसाडी (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबांसमवेत शिरुड गावी वास्तव्यास होता. त्याच्या घराच्या मागील बाजूस रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर, सुदाम भुरा वडर…
Author: Sharad Bhalerao
साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव । प्रलंबित वेतन निश्चितीची रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दहा हजारांची लाच मागून स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कुलच्या मुख्याध्यापकाला जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. संदीप प्रभाकर महाजन (वय ४४) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. निपाणेतील श्री संत हरिहर हायस्कुलमध्ये ३३ वर्षीय तक्रारदार शिपाई आहेत. त्यांच्या मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या फरकाची रक्कम दोन लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्ताव मंजुरीचे काम आरोपी महाजन यांनी स्वतःच्या ओळखीने करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून मंजुर रकमेच्या पाच टक्क्याप्रमाणे १२ हजार पाचशे…
साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव । महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नव तेजस्विनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील ओझर शिवारात रेडिमेड गारमेंट युनिट सुरू केले आहेत. त्यात तालुक्यातील ३० महिलांना स्वयंरोजगार मिळाला आहे. त्याचे नुकतेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माविम जळगावचे उपजीविका तज्ज्ञ प्रशांत पाटील, व्यवस्थापक आशिष मोरे, चाळीसगाव कोओर्डीनेटर राजश्री राजपूत, कर्मचारी पंकजा बागुल, रंजना अहिरे आदी उपस्थित होते. प्रकल्पासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध होती. मात्र, जागा नसल्याने गेली अनेक वर्षे हा प्रकल्प सुरू होत नव्हता. ही बाब आ.मंगेश चव्हाण यांना सांगितल्यावर त्यांनी आपली ओझर येथील लावण्या सिटीमधील खासगी जागा निशुल्क उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज हा…
साईमत/ न्यूज नेटवर्क । पहुर, ता.जामनेर । येथे सध्या मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. शेतशिवारात अशा मोकाट गुरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ग्रामपंचायतीने त्वरित मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वीरेंद्र लोढा यांनी केली आहे. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी ग्रामपंचायतींशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अद्याप ग्रामपंचायतीने मोकाट गुरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पहुर हे जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील गाव आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच ही मोकाट गुरे इतरत्र बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असतो. तसेच शेत शिवारात रात्रीच्या वेळेला 40 ते 50 गाईगुरे शेतांमध्ये जाऊन नुकसान…
साईमत विशेष प्रतिनिधी (विवेक ठाकरे) | जळगाव : ‘ तो मी नव्हेच…!’ हे आचार्य अत्रे यांचे लोकप्रिय मराठी नाटक बहुतेकांना माहिती आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी एका बदमाशाची भूमिका साकारत अजरामर केली होती. त्यानंतर जेव्हा केव्हा कोणीही आपल्याच वागण्यातून दुरंगीपणा दाखवला त्यावेळी या नाटकाचा दाखला दिला जातो. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी संपूर्ण फी माफिचा निर्णय जळगाव येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमात जाहीर केला होता. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर सुद्धा मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्यांना त्यांचीच घोषणा लक्षात राहावी म्हणून स्मरणशक्ती तल्लक ठेवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अँड.रोहिणीताई खडसे -खेवलकर यांनी बदाम पार्सलने पाठवणार…
साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर । गेल्या २६ मे २०२४ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे समर्पण लोन येथे अंगावर भिंत पडल्यामुळे मंगल गेट मारुती मंदिराजवळ मलकापूर येथील विशाल प्रल्हाद चोपडे मरण पावल्यामुळे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तहसीलदारांकडून चार लाख रुपये मयत व्यक्तीच्या वारसाला त्यांच्या पत्नी शिला विशाल चोपडे (रा.मंगल गेट, मारुती मंदिराजवळ, मलकापूर, जि.बुलढाणा) यांना २६ जून रोजी तहसील कार्यालयात धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार एस.एस.उगले, देवेंद्र कुऱ्हे, नायक नाझर जी.यु.खुळे, तलाठी धीरज जाधव, ओम शांती समितीचे सचिन भंसाली, हनुमान सेनेचे अमोल टप, वीरेंद्र कासे, प्रहार संघटनेचे अजय टप, शालिग्राम पाटील, दिलीप पाटील, बळीराम बावस्कर उपस्थित होते.
साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. त्या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. आणीबाणी लागू करणारेच विरोधक आता हातात संविधान घेऊन जनतेला भूलथापा देऊन देशाचे संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे प्रतिपादन आ.संजय सावकारे यांनी केले. आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशासह राज्यात सत्तेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. प्रत्येकवर्षी भाजपकडून दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो.…
साईमत/ न्यूज नेटवर्क । वरणगाव । शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत शिवारातील रस्ते तयार करण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, फुलगाव व पिंप्रीसेकम भागातील शेतकऱ्यांच्या शेताची वाट बिकट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अडचणीवर मात करीत शेती शिवार गाठावे लागत आहे. दीपनगर प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमालाची शेतीच्या बंधाऱ्याहून थेट बाजारपेठेत सुलभ वाहतूक व्हावी, यासाठी शेत शिवारातील रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, तालुक्यातील फुलगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती फुलगाव व पिंप्रीसेकम शिवारात आहे. या शेत शिवाराकडे एक फुलगाव ते पिंप्रीसेकम तर दुसरा फुलगाव ते दीपनगर वीज निर्मितीकडे कोळसा वाहून…
साईमत/ न्यूज नेटवर्क । फैजपूर । पुनर्रचित हवामानावर आधारित ‘फळ पिक विमा योजना आंबिया बहार’ २०२२ मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजतागायत पिक नुकसानीबाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण तथा क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मागणीनुसार तसेच तत्कालीन कृषीमंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केली होती. समितीकडे पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या ११ हजार २२ शेतकऱ्यांपैकी आठ हजार १९० शेतकऱ्यांनी दाद मागितली होती. समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या सहा हजार ६८६ शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रलंबित लाभ मिळण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज…
साईमत/ न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर। राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मुक्ताईनगर तालुक्यातून न करता पूर्वीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करणे तसेच रस्त्याचे सध्या सुरु असलेले देखभाल दुरुस्ती तात्काळ सुरु करण्याबाबत ठेकेदाराला आदेश देण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली. त्यावर त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले आहे. जमीन संपादनाबाबत नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते. रस्ता पूर्वीच्या मार्गाने न करता मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती.…