साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव । तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे ‘विधायक संदेश विवेकी समाज’ या सोशल मिडीयाच्या घोषवाक्याप्रमाणेच व्हॉटसॲप गु्रपच्या माध्यमातून मागील आठवड्यात जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान वृक्षदिंडी उपक्रमाचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आई-वडिलांचे झाड, लेकीचे झाड’ संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील भूमिपुत्र ज्यात न्यायाधीश, आयुक्त, तहसीलदार, वकील, सेवानिवृत अधिकारी, प्राध्यापक आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सेवा बजावणारे आर्मी, नेव्हीतील सैनिक, शिक्षक, पोलीस दलात सेवा बजावत असलेले बांधव, व्यापारी, शेतकरी आदींचा समावेश आहे. त्यातील अनेक बांधव गावापासून शेकडो मैल दूर असतांना गावाप्रती बांधीलकी व आपण गावाचे काही तरी देणे…
Author: Sharad Bhalerao
साईमत/ न्यूज नेटवर्क । पहुर, ता . जामनेर । विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश मिळवावे, आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रारंभी सातवीच्या विद्यार्थिनींनी समूह नृत्याने उपस्थितांचे स्वागत केले. नववीच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव घोंगडे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पहुर कसबेच्या सरपंच आशा जाधव होत्या. सुरुवातीला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमांचे पूजन…
साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव। गेल्या अनेक वर्षांपासून न्यू बीजे मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा सफाई झालेली नाही. पावसाचे पाणी काढण्यासाठी मार्केट बाहेर पंप आहे. मात्र, बऱ्याच वर्षांपासून तो नादुरुस्त पडलेल्या अवस्थेत आहे. वेळोवेळी असोशियशनद्वारे पत्र व्यवहार केले. मात्र, कोणताही उपयोग झालेला नाही. दरम्यान, एकीकडे अधिकारी मस्त तर दुसरीकडे व्यापारी त्रस्त असल्याची स्थिती आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात पावसाचे आगमन झाले आहे. अशातच शहरातील मध्यवर्ती ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या न्यू बीजे मार्केटची पावसामुळे दुर्दशा झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. पावसामुळे न्यू बीजे मार्केटमधील दुकानांसमोर पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे खरेदी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. गटारीतील पाणीही दुकानांसमोर…
साईमत/ न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर । संत मुक्ताबाई महाविद्यालयात २८ जून रोजी इसाफ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या सेलच्या अंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन केले होते. यामध्ये बी.ए, बी.कॉम, बी.एससी व एम.कॉमचे ५५ विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. त्यापैकी २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. इसाफ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे चेतन शहारे आणि प्रतीक शिरसाठे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये असिस्टंट कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह व कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसर मुलाखतीचे आयोजन केले जाते हा खरोखर ह्या महाविद्यालयाचा मोठा उपक्रम असल्याचे बँकेचे व्यवस्थापक चेतन शहारे यांनी सांगितले. संस्थेचे…
साईमत/ न्यूज नेटवर्क । धानोरा, ता.चोपडा । धानोऱ्यासह परिसरातील देवगाव, बिडगाव, मोहरद, वरगव्हाण, कुंड्यापाणी, पुनगाव, पिंप्री, मितावली, पारगाव, पंचक आदी परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडला नव्हता. जेमतेम पडणाऱ्या पावसावर शेतकरी वर्गाने उडीद, मूग, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी झाली आहे. मात्र, शेतकरी वर्गाला जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. शेतकरी वर्गाचे चातक पक्षाप्रमाणे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र, गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धानोऱ्यासह परिसरात पेरण्यांनी जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावलेला दिसून येत आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंतेच सावट अखेर देवानेच कमी केल्याने बळीराजा देवाचे आभार व्यक्त करताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या…
साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव । शेतकऱ्याने बँकेतून पैसे काढून ते नायलॉनच्या पिशवीत ठेवून ती दुचाकीला अडकवली. नंतर इलेक्ट्रीक दुकानात पाण्याच्या मोटरचे स्टार्टर घेण्यासाठी गेला. ही संधी साधून १८ वर्षाच्या मुलाने दुकानाबाहेर लावलेल्या दुचाकीला लटकावलेली पिशवी घेऊन पोबारा केल्याची खळबळ घटना २६ जून रोजी दुपारी १२.५१ वाजेच्या सुमारास गणेश रस्त्यावरील सुयोग संगम इलेक्ट्रीक दुकानासमोर घडली. पिशवीत एक लाख ४२ हजार रूपयांची रोकड आणि बँकेचे चेकबुक होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील चितेगाव येथील शेतकरी पंकज मच्छिंद्र पाटील यांनी २६ जून रोजी चाळीसगाव येथील बँक ऑफ बडोदा…
साईमत/ न्यूज नेटवर्क । लोहारा, ता.पाचोरा । येथील नवीन बांधकाम सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरुन अज्ञात चोरट्यांनी नऊ हजारांचे साहित्य लांबविल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लोहारातील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सुरू होऊन त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून पूर्णपणे झाली आहे. सोलर पॅनलही लावलेले आहे. त्याची उर्वरित कामे करण्यासाठी सनस्रोत टेक्नॉलॉजी कंपनीचे कर्मचारी सोलर सिस्टिमकडे गेल्यावर सोलर सिस्टिमचे केबल, आर्थिंग रॉड, डीसी केबल, पीव्हीसी पाईप हे लावलेले दिसत…
साईमत/ न्यूज नेटवर्क । जामनेर। येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना जामनेर शहरात गुटखा येत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जळगाव रस्त्यालगतच्या मराठा मंगल कार्यालयाजवळ सापळा लावून जामनेरमध्ये चार लाखांचा गुटखा पकडला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत समाधान चिकटे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी (क्र. एमएच १९ ३७७१) पाठलाग करून गाडीची झाडाझडती घेतली होती. तेव्हा त्यात १० पोते व १० गोण्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचे दिसून आले. त्यांची किंमत ४ लाख रुपये आणि स्विप्ट कारची किंमत ४ लाख असा ८…
साईमत/ न्यूज नेटवर्क । रावेर । रावेर तालुक्यातील आदिवासी भागातले दोन प्रमुख रस्ते पाल- रावेर वाया कुसंबा आणि पाल-रावेर वाया आभोडा, या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी धनंजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रास्ता रोको’ आंदोलन थेट ११ वाजेपासून चार वाजेपर्यंत केले. हे आंदोलन आभोडा आणि कुसुंबा फाटा येथे केले. दरम्यान, आदिवासी भागातील रस्त्यांसाठी युवा नेते धनंजय चौधरी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. रस्ते २०२२ महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर केले होते. त्यानंतर महायुती सरकारने मंजूर कामे स्थगित केले. स्थगिती हटविल्यानंतर जळगाव उत्तर विभागाने या कामांना कार्यारंभ आदेश दिला. पण या रस्त्यांची दुर्दशा अशी की निव्वळ राजकीय दबावाने बांधकाम…
साईमत/ न्यूज नेटवर्क । जामनेर । दिव्यांग हा समाजातील अति दुर्लक्षित आणि गरजू घटक आहे. ही बाब लक्षात घेवून समाजातील एक गरजू घटकाला न्याय देण्यासाठी महान मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडु यांनी १३ जून २०२४ रोजी शासन निर्णय काढून दिव्यांगांची दरमहा पेन्शन तीन हजाराहुन वाढवून सहा हजार रुपये केलेली आहे. या व्यतिरिक्त तेलंगणा तसेच देशातील अन्य काही राज्यातही तीन हजार किंबहुना त्यापेक्षा अधिक पेन्शन दिली जाते. त्यामुळे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या संबंधीचा निर्णय घेवून तात्काळ प्रभावाने ही पेन्शन योजना सुरु करुन राज्यातील अत्यंत दुर्लक्षित अशा घटकाला शाश्वत असे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विश्वशांती दिव्यांग…