Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेची कामे करत आहे. तालुक्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या सभागृहात नगरपरिषदेच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रयत सेनेच्यावतीने सोमवारी, ८ जुलै रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला पं. स.चे माजी सभापती संजय पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, डॉ.संदीप देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल पाटील, उद्योजक संदीप जैन, पॉप्युलर मेडिकलचे संचालक…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर : विद्यार्थ्यांनी भविष्यात संस्काराच्या माध्यमातून यशाची शिखरे गाठावीत. अचूक नियोजनातून ध्येय संपादित करावे, याच वेळेला स्व. वसंतराव नाईक यांनी ज्या पद्धतीने गोरगरिबांची,वंचित, दुर्बल, आदिवासी घटकांची सेवा केली. अगदी त्याचप्रमाणे समाजासह देशाची सेवा करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य संस्काराच्या माध्यमातून भविष्याची वाटचाल करावी. कारण श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होणे केव्हाही चांगले असते, असा उपदेश गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी दिला. जामनेर येथील वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने बंजारा समाजातील दहावी, बारावी, नीट, सीईटी, स्कॉलरशिप व पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणगौरव सोहळा वाकी रस्त्यालगतच्या जि.प.केंद्रीय शाळेत घेण्यात आला. त्यावेळी…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : शहरात पोलिसांकडून चोरट्यांवर पायबंद घालण्यासाठी ‘चाळीसगाव शहर – रात्र गस्त’ असा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. यासाठी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि सूचना देऊन नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले आहे. पोलिसांतर्फे ‘चाळीसगाव शहर – रात्र गस्त’ उपक्रमामुळे रात्री ५ मोटरसायकलवर १० कर्मचारी, पिटर मोबाईल १, गुन्हे शोध पथक मोबाईल १ असे शहरात गस्तकामी नेमण्यात आली आहेत. रात्री गस्त दरम्यान पोलिसांना विविध अनुभव आल्याने नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने त्याचा चोरटे फायदा घेत आहे. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. यासाठी पोलिसांतर्फे काही महत्त्वाच्या टिप्स आणि सूचना…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर : तालुक्यातील केकनिंभोरा येथील स्व. राजमल शंकर पाटील दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. संस्थेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या ४५ वर्षांपासून ही संस्था काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित नाना पाटील यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, यावेळी ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाप्रणित डॉ. प्रशांत भोंडे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलने प्रस्थापित राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी पॅनलचा १६ विरुद्ध १ असा दणदणीत पराभव केला आहे. यावेळी झालेल्या नवनियुक्त सदस्यांच्या बैठकीत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. त्यात चेअरमनपदी आशाबाई ज्ञानेश्वर थाटे तर व्हाईस चेअरमनपदी कमलबाई भगीरथ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांसह चेअरमन, व्हॉईस…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/जळगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी समाजातील महिलांना लाभ मिळावा, यासाठी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीला संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, उपाध्यक्ष सचिन बाटूंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, सदस्य प्रदीप नेतलेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, नरेश बागडे, राहुल दहियेकर, संदीप बागडे, पंकज गागडे, संतोष इन्द्रेकर, जयेश माछरे, कार्तिक बाटूंगे, गणेश बागडे, पिंट्या नेतलेकर, महेंद्र बागडे, प्रकाश दहियेकर, नितीन नेतले, राकेश बागडे, सुदाम बागडे आदी समाजबांधव उपस्थित होते. कंजरभाट समाजाच्या महिला आज कागदपत्रे तयार करण्यासाठी वणवण फिरत आहेत.…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/धानोरा, ता. चोपडा : मोदी सरकारच्या सर्व योजना घराघरापर्यंत पोहचविणार आहे. तळागाळातील सर्वसामान्य घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त कशा प्रकारे होईल, त्यावर माझे विशेष लक्ष असणार आहे. धानोरासह परिसरातील विविध प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठीही प्रयत्नशिल असणार आहे. तसेच मंत्रीपदाच्या माध्यमातून युवकांसाठी कल्याणकारी योजना आणणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षाताई खडसे यांचा धानोरा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कारासह साखरतुलाचे येथील सतपंथ ज्योत मंदिरात आयोजन केले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ‍मतदारांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांच्या…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव : शहरातील प्रभाग १० मधील हंस चित्र मंदिराकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने काँक्रिटीकरण रस्त्याचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. मात्र, थोटे रस्ता होत असताना कामावर येत नसल्याने कामाची गुणवत्ता ठेकेदारामार्फत राखली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आ.मंगेश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता बैसाने यांना सूचना करून उच्च दर्जाचे काम करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत. काँक्रिटीकरणाचे काम करत असताना त्यात सिमेंट गज वाळू ज्या पद्धतीने वापरली पाहिजे त्या पद्धतीने न वापरता कमी प्रतीचे मटेरियल वापरले जात आहे. या…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर : वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पाऊले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘एक रोप आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरीष ऋषी टेकडीवर दोन मिनिटात दोन हजार २२२ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमळनेरचे सूपुत्र तथा नागपुरचे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उप वनसंरक्षक ए.प्रवीण उपस्थित होते. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबरीष ऋषी टेकडीला संरक्षित वन क्षेत्र जाहीर व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी वन क्षेत्रासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. पुढीलवर्षी तालुक्यातील सर्वच टेकडींवर एकाचवेळी एका मिनिटात असंख्य वृक्षांची लागवड करुन वर्ल्ड रेकॉर्ड करू, असे आयकर…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर : तालुक्यातील अनुराबाद राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी कोळेकर, अनुराबाद येथील कृषी सहाय्यक जी.डी. नमायते, सरपंच ज्ञानदेव ढगे, उपसरपंच निलेश फिरके, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक किरण अहिरे, अनिल मास्कर, प्रकाश चव्हाण, कृषी मित्र तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक जी.डी. नमायते यांनी शेती शाळेची प्रार्थना घेऊन मागील शाळेचा आढावा घेऊन सोयाबीन, कापूस, तूर पिकांना शिफारशीनुसार लागणारी खताची मात्रा कशी काढावी, किती द्यावी व कशी द्यावी, अतिरिक्त खताचा वापर कसा टाळावा, विद्राव्य खतांचा वापर तसेच दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच दशपर्णी अर्क…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल : येथील खरेदी विक्री संघात शहरातील भाजपाच्या सर्व बूथ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन तसेच यावल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात शहराध्यक्षपदी राहुल पंढरीनाथ बारी, कार्याध्यक्ष किशोर भिकाजी कुलकर्णी तर महिला अध्यक्षपदी नंदा राजेंद्र महाजन यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस नवमतदार नोंदणी आणि ‘माझी लाडकी बहीण योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच प्रयत्न करण्यासाठी डॉ.कुंदन फेगडे, पी.एस.सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीत राकेश फेगडे, शहराध्यक्ष राहुल बारी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, हेमराज फेगडे, गोविंदा बारी, भूषण फेगडे, योगेश चौधरी, रितेश बारी, सागर चौधरी, डॉ.अभय रावते, सिद्धांत घारु,…

Read More