Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : येथील रहिवासी तथा महात्मा ज्योतिबा फुले सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पवन माळी यांच्या आजी धोंडाबाई किसन बावस्कर यांचे गेल्या ५ जुलै रोजी निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया व गंधमुक्तीचा विधी विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते नुकताच पार पडला. आजीच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करण्यात आली. महाजन यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यात एक हजाराची देणगी दिली. जामनेर शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने विधी केल्याने उपस्थित समाज बांधवांनी कौतुक केले. विधी करण्याची प्रेरणा महाराष्ट्र राज्याध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, विधीकर्ते भगवान रोकडे, प्रचारक रमेश वराडे यांच्याकडून मिळाली. कार्यक्रमाला सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, मुख्याध्यापक कडू बावस्कर, संदीप रोकडे, बाळू महाजन,…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव : पिंप्राळा परिसरातील सोनी नगरकडे सावखेडा जाणाऱ्या रस्त्यावर चैतन्य किराणा दुकानासमोर नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पाण्यातून वाहुन येणारे साप नागरिकांच्या घरात येत असल्याने महिलांमध्ये भीती पसरली आहे. रस्त्याच्या कामाचा आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. ठेकेदाराने रस्त्यावर खडी टाकुन ठेवली आहे. मात्र, काम का रखडले? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तलावातून जाणाऱ्या वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक पावसात सावखेडा, सोनी नगर, बाबुराव नगर, श्रीराम नगर, ओंकार पार्क, गणपती नगरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सावखेडा रस्ता मंजूर झाला असून रस्त्यावर खडी टाकुन…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव : मनपाच्या आरोग्य विभागातर्फे फुले मार्केट, दाणा बाजार परिसरात रविवारी, १४ जुलै रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दोन पिकअप गाडी करुन चार ट्रीपात अंदाजे १० टन कचरा जमा करण्यात आले. वार्ड क्रमांक पाचमधील फुले मार्केट, दाणा बाजार, गांधी मार्केट तसेच दाणा बाजाराच्या मागील गल्लीत, कबूतर खाना परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यात सुमारे १० टन कचरा जमा करण्यात आला. स्वच्छता अभियानात मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, यु. आर. इंगळे, नागेश लोखंडे, युनिट प्रमुख सुरेश भालेराव, अजय चांगरे, मुकादम शरद पाटील, आनंद मरसाळे, मुकेश थांबेत, शंकर अंभोरे, इम्रान भिस्ती, किशोर भोई, मुकादम भीमराव सपकाळे तसेच वॉटरग्रेस मुकादम…

Read More

साईमत/ जिल्हा प्रतिनिधी/ जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यातून १२५ हून अधिक बसेसचे नियोजन केले आहे. याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही गावातून ४० पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात विविध आगारातून दररोज किमान २५ बसफेऱ्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध गावांमधून भाविक जमतात. जळगाव जिल्ह्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विविध आगारांमधून दररोज २५ ते ३० जादा बस सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. १३ ते २२ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे होणारी यात्रा तसेच गुरुपौर्णिमा हा दिवस वारकरी,…

Read More

साईमत/ जिल्हा प्रतिनिधी/ जळगाव : खान्देशातील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील वारकऱ्यांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घडण्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी “भुसावळ-पंढरपूर-भुसावळ” मोफत विशेष रेल्वे गाडीचे नियोजन केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या मोफत रेल्वेगाडीच्या सुविधेची यंदा दशकपूर्ती आहे. बुधवारी, १७ जुलै रोजी आषाढी एकादशीसाठी रेल्वेगाडी भुसावळ स्थानकावरून मंगळवारी, १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता निघेल तर पंढरपूरहून १७ जुलैला रात्री १० वाजता परतीचा प्रवास होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातून हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईंच्या पालखीसह जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानची मुक्ताबाई रामपालखी आणि अमळनेर येथील…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ मलकापूर : पावसाळी अधिवेशनात आ.राजेश एकडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संकटात आलेल्या दुग्ध व्यवसायासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी दुधावरील शासनाचे अत्यल्प अनुदानाचे वास्तव विशद केले. दरम्यान, त्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून तात्काळ दखल घेण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. मात्र, चारा, सरकी, ढेप आदींचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात आलेला आहे. पशुधनांना जगविण्यासाठी पशुखाद्याची नितांत गरज असते. पशुखाद्याचे भाव वाढल्यामुळे दुधाच्या उत्पन्नापेक्षा पशु चाऱ्यासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. दुधाचा दर आणि खर्चाचा ताळामेळ हा मात्र कुठेच येत नाही. त्यामुळे दुग्ध…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : विद्यार्थ्यांनी ध्येय, परिश्रम आणि चिकाटी या त्रिसुत्रीद्वारे शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांग सुंदर विकास साधावा. त्यामुळे समाजासह देशाची सेवा करता येईल. हे करत असताना आई-वडील व गुरु यांच्या संस्कारावर आपले विचार मार्गक्रमित करावे आणि संस्कारशील भारताचा सक्षम नागरिक होऊन दाखवावे, असा उद्बोधनपूर्वक उपदेश चैतन्य धाम तथा गुरुदेव सेवाश्रमाचे संस्थापक-अध्यक्ष प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी केला. तालुक्यातील लिहा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप झाल्यामुळे त्‍यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. यावेळी वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल जाधव, तालुकाध्यक्ष बन्सीलाल चव्हाण, गोकुळ महाराज, दीपक चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव : प्लास्टिक बॅग्समध्ये असलेल्या रसायनांमुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आल्यास कर्करोग, हार्मोनल विकार आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक आणि स्वस्त अशा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर यांनी केले. येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात ४८ एनसीसी महाराष्ट्र बटालियन, धुळेच्या आदेशानुसार महाविद्यालयाचा एनसीसी विभागामार्फत आयोजित ‘पेपर बॅग्स डे’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. प्लास्टिक बॅग्सच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. कागदी पिशव्या नैसर्गिकरित्या विघटनशील असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कागदी…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघात वरूणराजाचे जोरदार आगमनासोबतच मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास कामांच्या निधीचीही मतदारसंघात जोरदार बरसात सुरू झाली आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल २५.८० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. महत्वपूर्ण रस्त्यांसह काही पुलांचे काम त्यातून मार्गी लागणार आहे. शहरात नवीन रस्त्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यात अमळनेर येथील तहसीलदार निवासस्थानाची दुरावस्था झाल्याने अधिकाऱ्यांच्या निवासाची गैरसोय होत असताना निवासस्थान बांधकामासाठी ८० लाख रुपये मंजूर झाल्याने नवे निवासस्थान त्यातून उभे राहणार आहे. मंत्री अनिल पाटील यांनी सुरवातीपासून शहर व ग्रामीण रस्त्यांच्या नुतनीकरणाकडे अधिक लक्ष दिल्याने बहुसंख्य रस्ते नवीन झाले…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : शहरातील बसस्थानक आवारात नियंत्रण कक्षासमोवर गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार ११ जुलै रोजी रात्री ११ ते १२ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहरात पीएसआय सुभाष पाटील, पो.हे.कॉ. राहूल सोनवणे, नितीश पाटील, पो.ना. महेद्र पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रवींद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण हे पेट्रोलिंग करत होते. त्यातील पो.कॉ.समाधान पाटील, अमोल पाटील हे चाळीसगाव बसस्थानक…

Read More