Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर : अवैधरित्या कंटेनरमधून वाहतूक होत असलेला गुटखा नाशिक आयजी पथकाच्या पोलिसांनी मुक्ताईनगर येथे शनिवारी, 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता पकडला. कंटेनरसह गुटखा असा एक कोटी सहा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या कंटेनरमधून कोटा राजस्थान येथून भरून येत असलेला पानमसाला गुटखा मुक्ताईनगरमार्गे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात जात असताना नाशिक पोलीस महानिरीक्षक (आय जी) यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुली येथे 20 जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास कंटेनरची तपासणी केली. तेव्हा त्यात गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. पोलीस पथकाने कंटेनर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये आणला.…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर : जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येथे येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला रवाना झाले. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून मंगळवारी, १६ जुलै रोजी दुपारी दीड वाजता पंढरपुरसाठी जाणाऱ्या गाडीस भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. “विशेष आषाढी रेल्वे” गाडी बुधवारी, १७ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल तर रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून परतीला निघणार आहे. गुरुवारी, १८ जुलै रोजी भुसावळ येथे परतणार आहे. अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे राज्यमंत्री श्रीमती खडसे यांच्यामार्फत जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : तालुक्यातील रोहिणी, हिरापूर, खडकी येथून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शाळा महाविद्यालयात चाळीसगाव येथे येत असतात. मात्र, चांदवड-जळगाव महामार्गावरून अनेक बसेस रोहिणी, हिरापूर, खडकी या बस थांब्यावर न थांबता धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसने प्रवास करता येत नाही. बस थांबत नसल्यामुळे शाळा, महाविद्यालय येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे चांदवड-जळगाव महामार्गावरून धावणाऱ्या सर्व बसेसला रोहिणी, हिरापूर, खडकी बस थांब्यावर थांबा देण्याची रयत सेनेने आगार व्यवस्थापकांकडे १६ जुलै रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सकाळी ६ वाजेपासून विद्यार्थी हिरापूर, खडकी बस थांब्यावर येऊन बस थांबण्याची गेल्या…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ सावदा, ता. रावेर : गुणवंतांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप ठेवण्यासाठी अग्रेसर राहणारे मुक्ताईनगर येथील योगराज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा समाजसेवक विनोद नामदेव सोनवणे यांचे सामाजिक व एकूणच कार्य पाहता त्यांना राजयोग असल्याचे सुतोवाच करून अपयशाऐवजी यशाला पचविण्याची क्षमता माणसांनी ठेवली पाहिजे, अन्यथा भविष्यासाठी नुकसानदायक ठरते, असे मोलाचे मार्गदर्शन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. रावेर तालुक्यातील विविध परीक्षेत यशवंत ठरलेल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी, १४ जुलै रोजी येथे योगराज फाउंडेशनच्यावतीने पार पडला. यावेळी विशेष पाहुणे म्हणून फैजपूर सतपंथी मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, सावदा येथील महानुभाव पंथाचे मानेकर बाबा, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे व ‘झी मराठी’ टिव्हीवरील…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ बोदवड : जळगाव जिल्ह्यासह आणि जिल्ह्याबाहेरील भागात जाऊन दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना बोदवड पोलिसांनी भुसावळ आणि वरणगाव शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, बोदवड शहरातील विजय पुंडलिक माळी यांची दुचाकी (क्र.एमएच १९ सीए ५१८७) ही चोरी झाल्याची घटना गेल्या १९ जून रोजी दुपारी घडली होती. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी भुसावळ शहरातील जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे (वय ३१) याने चोरी…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर : वारकरी संप्रदायात ज्ञान, कर्म व भक्ती ही साधनेची द्वारे आहेत. ती व्यापक आहे. त्याचा विवेकाने वापर करून पंढरपूरमध्ये प्रवेश करावा, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे थोर विचारवंत चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. पंढरपूर येथील डिंगम्बर महाराज मठाचे भव्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा चैतन्य महाराज आणि ॲड.जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते सोमवारी, १५ जुलै रोजी झाला. अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते. भरकटणारी व्यसनाकडे जाणारी युवक पिढी कायद्याने बदलणार नाही तर त्या आध्यात्मिक संस्काराने बदलतील. त्यासाठी तरुणांसाठी ज्ञानेश्वरीचे विचार व ज्ञान प्रसार करण्यासाठी त्यातील संस्कार युवकांना रुजविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. यावेळी ॲड.…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ भुसावळ : जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या चिखली ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्यांनी काम सुरू होण्याआधीच या मार्गातील हजारो डेरेदार वृक्षांची कत्तल केलेली होती. आज या महामार्गाचं कामकाज पूर्ण होऊनही कंपनीने फक्त दहा टक्केच वृक्ष लागवड केलेली आहे. तसेच दीपनगर येथील दोन मोठे विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू करणाऱ्या ठेकेदार कंपनीने त्या ठिकाणी शेकडो वृक्षे तोडून टाकलेली आहे. त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी नियमानुसार वृक्ष लागवड केलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भुसावळचे आ. संजय सावकारे यांनी विधानसभेत केली. यंदाच्या उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४७ अंशाच्यावर जाऊन पोहचला होता. यामुळे जळगाव जिल्ह्यातील…

Read More

साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव : तांबापुरातील शाह-ए-अवलिया मशीदजवळील तार गल्लीतील रहिवासी हनिफ अजीज बागवान हा युवक ख्वाजामिया दर्गाजवळ गोकुळ स्वीट समोर हातगाडीवर फळ विक्रीचा व्यवसाय करतो. तो नित्यनेमाप्रमाणे रात्री तांबापुराकडे येत असतांना त्याला रिंग रोडवर हॉटेल सायलीजवळ एक मनी पॉकेट सापडले होते. ते उघडून पाहिल्यावर त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) सह काही रोकड रक्कमही होती. शिवाय काही अती महत्त्वाचे पुरावे होते. अशावेळी ‘हनिफ’ने मनात कुठलीही लालस न ठेवता पाकिटाच्या मूळ मालकाशी संपर्क साधून त्यांना पाकीट सुपूर्द केले. ‘हनिफ’ने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण घडवून आणले आहे. ‘हनिफ’ने स्वतःच्या घरी येऊन निवांतपणे पॉकेटची झाडाझडती…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघाला पुन्हा एकदा १५६ कोटी इतका भरीव निधी मिळविण्यात आ.मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांची लक्षवेधी कामगिरी ठरली आहे. विशेषता तालुक्यातील सिंचन, रस्ते, पूल, शासकीय इमारत आदी सर्वच विभागात निधी मिळाल्याने सिंचन क्षमता वाढणार असून दळणवळणाला गती मिळणार आहे. त्यामुळे जनतेतून आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वरखेडे लोंढे प्रकल्पाच्या कामाला १०० कोटी, गिरणा धरणावरील पांझण डावा कालवा दुरुस्तीसाठी १९ कोटी ५४ लाख तसेच मन्याड धरणावरील मन्याड उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामांना १४ कोटी ५६ लाख असा भरघोस निधी मिळाला आहे. वरखेडे धरणाच्या…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर : भोरटेक ते अमळनेर रेल्वे स्टेशन दरम्यान १२ जुलै रोजी गाडी क्र.०९०७८ रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबविण्यात आली. त्याठिकाणी रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासंदर्भात अमळनेर रेल्वे स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवि पांडे, एईएन संजय गुप्ता, कार्य निरीक्षक आडेकर, टेलिकॉमनिकेशन इंजिनियर सोनवणे, अमळनेर आयपीएफ विकास कुमार, नंदुरबार आयपीएफ बिजय कुमार, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांची खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी भेट घेतली. या प्रकरणाची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच लवकरात लवकर आरोपींची ओळख पटवून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील, त्यांना तात्काळ अटक…

Read More