रावेरचे आ.शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास साईमत/न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल निर्माण झाल्यास स्थानिक ग्रामीण भागातच प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित होईल. भावी काळात नोकऱ्या मिळणे आणखी अवघड होणार असल्याने ॲग्रीकॉस विद्यार्थ्यांची इंडस्ट्री समाजाला पुढे नेऊ शकते, असा विश्वास रावेर विधानसभेचे आ.शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला. येथील शासकीय कृषी महाविद्यालयास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कृषी शास्त्राचे शिक्षण उपजिविकेचे साधन आहे. म्हणूनच शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश केला आहे. ग्रामीण भागातील मनुष्यबळ शहराकडे न जाता गावांमध्येच टिकून ठेवले तर विकास साधता येईल, असेही ते म्हणाले. पाल येथे मधुस्नेह…
Author: Sharad Bhalerao
आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, आठ शासकीय विभाग एका छताखाली येणार साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांत, तहसील व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. बहुतांश कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. किरकोळ कामांसाठी कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागते. ही कार्यालये शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने वाहतुकीची कोंडी होणे यामुळे नागरिकांसह विविध शासकीय विभागांची गैरसोय होत होती. अशातच अनेक तालुक्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्याने चाळीसगाव तालुक्यात ती असावी, अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती.…
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर साईमत/न्यूज नेटवर्क/धरणगाव : येथील नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर आणि अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधांच्या संदर्भात निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. धरणगाव नगरपरिषदेमार्फत १० ते १२ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा गढूळ आणि दूषित स्वरूपाचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील पाईपलाईनच्या कामांमुळे वारंवार खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. बंद पडलेले पथदिवे, तुडुंब भरलेल्या गटारी अशा अनेक समस्यांच्या संदर्भात…
अडावद पोलिसांची यशस्वी कामगिरी साईमत/ न्यूज नेटवर्क/ अडावद, ता.चोपडा: येथून जवळील विष्णापूर, ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरावर छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अडावद पोलिसांच्या धडक कारवाईने जिल्ह्याभरातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे. याबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सविस्तर असे की, विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला (वय ३६) हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने शनिवारी, २७ रोजी पहाटेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ.कुणाल सोनवणे, पो.नि. कावेरी कमलाकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे स.पो.नि. संतोष चव्हाण, पो.उ.नि. राजु थोरात, पो.हे.काॅ. भरत नाईक,…
चार दिवसात दुसरी कारवाई, गुटखा माफीयांचे धाबे दणाणले साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर : मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांच्या पथकाने मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर सापळा रचून चार लाख 38 हजारांच्या गुटख्यासह वाहन असा 22 लाख 38 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, चार दिवसात झालेल्या दुसऱ्या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहे. याप्रकरणी चालक अजीज शेख याला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने गेल्या 20 जुलै रोजी मुक्ताईनगर येथे 76 हजाराचा अवैधरित्या वाहतूक…
एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले साईमत/ न्यूज नेटवर्क/ भडगाव : वाळू वाहतुकीचा व्यवसाय करताना कारवाई न करण्यासाठी दोन लाख ६० हजारांची मागणी करत तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला जळगाव येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किरण रवींद्र पाटील (वय ४१, रा. भडगाव) असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सविस्तर असे की, तक्रारदार हे भडगाव शहरातील रहिवाशी आहे. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. यापूर्वी तक्रारदारावर भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत दोन गुन्हे दाखल आहे. दरम्यान, तक्रार यांना सुरळीत वाळू वाहतूक…
रयत सेना, ‘माझी वसुंधरा’ अभिमानातर्गंत स्तुत्य उपक्रम साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : निसर्गाचा लहरीपणा तसेच दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत जात आहे. म्हणून वृक्ष लागवड करणे खूप गरजेचे झाले आहे.वृक्ष लागवड होवून त्याचे संगोपन व्हावे, या हेतूने पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रयत सेना आणि चाळीसगाव नगरपरिषद ‘माझी वसुंधरा’ अभिमानातंर्गंत प्रभाग क्रमांक दहामध्ये ५० वृक्षासह ५० ट्री गार्डचे नागरिकांना नुकतेच वाटप करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावणे गरजेचे आहे. झाडे अनेक पक्षी आणि सस्तन प्राण्यांना अन्न, संरक्षण आणि घरे देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा…
जळगावसह धरणगाव तालुक्यातील भजनी मंडळांना तीन टप्प्यात 177 साहित्याचे वाटप साईमत/न्यूज नेटवर्क/पाळधी, ता. धरणगाव : पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी चार हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार आहे. संत कार्यासाठी सदैव झटत राहणार आहे. ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रतर्फे आयोजित भजनी मंडळ साहित्याच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. अत्यंत शिस्तबद्ध, अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत…
डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीलाही मंजुरी, दीड कोटींचा भरीव निधी साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर : तालुक्यातील फाफोरा येथील वळण बंधारा व त्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत विशेष दुरुस्ती अंतर्गत एक कोटी ५२ लाख ९२ हजार ४१४ रुपये एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय 23 जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर बोरी काठावरील गावामध्ये आनंदोत्सवात साजरा होऊन या कामासाठी विशेष पाठपुरावा करणाऱ्या मंत्री अनिल पाटलांचा जयघोष करण्यात आला. कामाबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले की, बोरी नदीवरील ब्रिटीश कालीन बंधारा,…
विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिले डेंग्यूविषयी धडे साईमत/ न्यूज नेटवर्क/ अडावद, ता.चोपडा : जिल्ह्याभरात १ जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यासह अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये “डेंग्यू प्रतिरोध” विषयी जनजागृती करण्यात येत आहे. अडावद येथील सार्वजनिक खासगी प्राथमिक शाळा तथा माध्यमिक विद्यालय अडावदमधील शालेय विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने किटकजन्य आजारात, डासांपासून होणारा प्रामुख्याने डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे डेंग्यू आजाराविषयी शंका निरसन करून डेंग्यू आजार होऊ नये, यासाठी…