Author: Sharad Bhalerao

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन साईमत/न्यूज नेटवर्क/जामनेर : तालुक्यातील मोयगाव – पिंपळगाव रस्त्याला लागून माळरानावर महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोयगाव व पिंपळगाव गोलाईत गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आई भवानी ‘देवराई’ आकारास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आई भवानी ‘देवराई’प्रमाणे अनेक ‘देवराया’ निर्माण व्हाव्यात, असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते येथील परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या क्षेत्रात गेल्या ४ जुलै रोजी पहिल्या टप्प्यात एक हजार रोपे लावण्यात आली होती तर रविवारी, २८ जुलै रोजी पुन्हा एक हजार रोपे लावण्यात आली. सकाळपासूनच वृक्षप्रेमींचा मोठा जनसमुदाय वृक्ष लागवडीत व्यस्त होता. ग्रामस्थांच्या…

Read More

केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा, मंत्री अनिल पाटील, खा.स्मिता वाघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश साईमत/न्यूज नेटवर्क/अमळनेर : निम्न तापी पाडळसरे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होताना दिसत आहे. नुकतीच धरणाला केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि जल परिवर्तन मंत्रालयाने फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याने धरणाचा केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. मंत्री अनिल पाटील, खा.स्मिताताई वाघ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ही मान्यता मिळाली आहे. मान्यतेसाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने 3 मे 2024 रोजी तत्त्वता मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी…

Read More

सप्ताहात विविध उपक्रम राबविले साईमत/न्यूज नेटवर्क/पहुर, ता. जामनेर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै दरम्यान सर्वच शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. अशातच पहूर कसबे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार विद्यालयात शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. शैक्षणिक सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित केला होता. ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश होता. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा असल्यामुळे, शिक्षणाविषयी जनजागृती, पर्यावरण रक्षण (वृक्ष लागवड) विषयी संदेश देण्यात आला. विविध उपक्रमांचा समावेश शिक्षण सप्ताह दरम्यान दररोज विविध…

Read More

पक्षाच्या ब्लॉकस्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका साईमत/न्यूज नेटवर्क/चोपडा : चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस (आय) कमिटीच्यावतीने सोमवारी, २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पक्षाचे ध्वजारोहण, मासिक सभा तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने ब्लॉकस्तरीय बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील होते. बैठकीत चोपडा विधानसभेच्या जागेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्यात कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी, अशी आग्रही भूमिका ॲड. संदीप पाटील यांच्याकडे मांडून जागा निवडूनच आणू, असा चंग बांधला. बैठकीत राजेंद्र पाटील, विक्रम पाटील, प्रदीप पाटील, डॉ.पराग पाटील, प्रमोद देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप पाटील…

Read More

विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्याचे ‘गणित ऑलिम्पियाड’ परीक्षेत यश साईमत/न्यूज नेटवर्क/चोपडा : येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी भुवनेश्वर जगदीश कंखरे याने सीपीएस ‘गणित ऑलिम्पियाड’ परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यामुळे `विमानातील सहल´ प्रवासासाठी त्याच्या आई-वडिलांसह त्याची निवड झाल्याने शनिवारी, २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ‘भुवनेश्वर’ त्याच्या आई-वडिलांसह इंदोर ते दिल्ली विमानप्रवास केला. दिल्ली दर्शन करून परतीचा प्रवास रेल्वे वातानुकूलित पूर्ण बोर्डचे आयोजन सीपीएस गणित ऑलिम्पियाड संस्थेतर्फे दिले जात आहे. ‘भुवनेश्वर’ला विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, संस्थेचे…

Read More

अमळनेर तालुक्याला सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणारा ‘पाडळसरे’ प्रकल्प साईमत/न्यूज नेटवर्क/अमळनेर : तालुक्याला सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणारा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पाडळसरे प्रकल्प. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांनी जोमाने प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे नेहमीच प्रयत्नशील आहेत. जो कोणी पाडळसरे धरणासाठी निधी आणेल, त्याला माझी साथ राहील. म्हणून कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याबरोबर धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी एकत्र लढा देणार असल्याचे सांगितले. यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्यासह मा. नगरसेवक, अनिलदादा मित्र परिवारातील आणि माजी कृषीभूषण साहेबराव मित्र परिवार उपस्थित होते. दरम्यान, अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मंत्री अनिल पाटील यांनी…

Read More

वीज महावितरणाने कानावर ‘हात’ ठेवले, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या अर्जाची चौकशी करण्याची मागणी साईमत/न्यूज नेटवर्क/अडावद, ता.चोपडा : येथील वीज महावितरणाचा भोंगळ कारभार हा दर दिवसाला चव्हाट्यावर येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे.अशातच 24 तासात दिवसाला व रात्री अधून-मधून आठ तासावर वीज गुल असते. असा प्रकार सध्या अडावद वीज महावितरणमध्ये सुरु आहे. याकडे वरिष्ठ लक्ष देतील का? त्यांच्या सुट्ट्यांचा अर्ज आहे की नाही, त्याची चौकशी करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुसरीकडे वीज महावितरणाने कानावर ‘हात’ ठेवले आहेत. अडावदला कुठे जीर्ण तार तुटतात तर कुठे रोहित्रे आवाज करते. असे सर्व सुरु असताना जर परमिट कोणी वायरमॅनने घेतले असेल तर वीस मिनिटाच्या…

Read More

भुसावळला दुकानदारांच्या बैठकीत राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील यांनी केली घोषणा साईमत/ न्यूज नेटवर्क/ भुसावळ : येथील शामा मुखर्जी उद्यानात रविवारी, 28 जुलै रोजी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघ, जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्याची स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत रावेर विभागाच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल अध्यक्षपदी वरणगाव येथील संतोष माळी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी.एन.पाटील, सचिव सुरेंद्र यादव, राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांच्या आदेशाने ज्येष्ठ नेते भागवत पाटील यांनी केली. अध्यक्षस्थानी भागवत पाटील होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, जिल्हा सचिव…

Read More

रोटरी क्लब वेस्टतर्फे वृक्षांसह ट्री गार्डचे वाटप साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव : दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने निसर्गाचा समतोल ढासळत जात आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व्हावे, या हेतुने सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या परिसरात रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगावतर्फे 30 वृक्षासह ट्री गार्डचे वाटप रविवारी, 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते वृक्ष लावून उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला जागृत स्वयंभू महादेवाची आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. वृक्षारोपणप्रसंगी रोटरी क्लब वेस्टचे ट्री गार्ड प्रोजेक्ट चेअरमन अंकित जैन यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षारोपणासाठी खड्डे करणारी मशिन संजय शाह यांच्याकडून मोफत उपलब्ध करून…

Read More

क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल उपशिक्षक अनिल पाटील यांचे कौतुक साईमत/न्यूज नेटवर्क/अमळनेर : येथील शिक्षक अनिल नथू पाटील, डॉ.बळीराम पवार लिखित आणि संपादित ‘भारतातील क्रांतिकारी महिला’ पुस्तकाचे प्रकाशन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शनिवारी, २७ जुलै रोजी करण्यात आले. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल उपशिक्षक अनिल पाटील यांचे कौतुक केले. पुस्तकात राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई, ताराबाई शिंदे, वि. मालिनीताई राजुरकर अशा विविध थोर महिलांचे लेख समाविष्ट आहेत. पुस्तकाचे प्रकाशक संस्कृती पब्लिकेशन, लातूर हे असून पुस्तकाला ISBN नंबर प्राप्त आहे. अनिल पाटील हे उपशिक्षक आहेत. ते विजयनाना पाटील आर्मी स्कुल…

Read More