पत्रकार परिषदेत मंडळ पदाधिकाऱ्यांसह केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर आरोप साईमत/रावेर/प्रतिनिधी : गेल्या जून महिन्यापासून निंभोरा फळबागातदार शेतकरी मंडळाद्वारे निंभोरासह परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी परप्रांतात पाठविल्या जात अाहे. त्यामुळे येथील छोट्या-मोठ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात मोबदला समाधानकारक मिळत आहे. मात्र, हे सुरू असताना निंभोरा स्टेशन येथून पाठवला जाणारा केळी भरलेला वॅगन्स रॅक बंद पडावा, यासाठी रावेर येथील केळी युनियनच्या शिष्टमंडळाने प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप निंभोरा येथील फळबागायतदार शेतकरी मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळ पदाधिकाऱ्यांनी व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत मंडळाचे संचालक किरण नेमाडे, केळी उत्पादक शेतकरी ललित कोळंबे, ॲड.चंद्रजीत पाटील यासह…
Author: Sharad Bhalerao
अंबिलहोळला आयोजित आरोग्य शिबिराप्रसंगी श्याम चैतन्यजी महाराज यांचा साधकांना उपदेश साईमत/जामनेर/प्रतिनिधी : सर्वांचे आयुष्य निरोगी व निरामय राहो, यासाठी डॉक्टर हे देवदूतच असतात. मात्र, त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार आपण स्वतःचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. व्यसनापासून मुक्तता तसेच सकस आहार या दोघांच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगले पाहिजे. “सबके आरोग्य की कामना, यही आज के दिन की साधना !” या माध्यमातून आजचा दिवस जन सामान्यांसाठी निरामय आयुष्य आणि त्यांच्या मनोकामनासाठी समर्पित करतो, असे आशीर्वचन श्याम चैतन्यजी महाराज यांनी दिले. ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्यजी बापू यांचे कृपा पात्र शिष्य तसेच गुरुदेव सेवाश्रम चैतन्य धामचे गादीपती श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जीएम फाउंडेशन तसेच न्यू…
अंत्योदय कार्ड बेकायदा रद्द केल्याचे उघड, कारवाईकडे लक्ष साईमत/प्रतिनिधी/यावल : येथील एक स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला धान्य कमी देत असल्याची तक्रार एका ग्राहकाने केली म्हणून संबंधित रेशन दुकानदार आणि यावल पुरवठा अधिकारी यांनी संगनमत करून ग्राहकाला धडा शिकवण्याच्या कारणातून त्याचे रेशन कार्डच रद्द केल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात उघड झाल्याने त्या ग्राहकात आणि तक्रार करणाऱ्यांमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून बेकायदा कारवाई करणाऱ्याविरुद्ध आता काय कारवाई होणार..? याकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) आकाश सतीश चोपडे यांनी ३० जुलै २०२४ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. तेव्हा उपजिल्हा…
संगीतमय श्रीराम कथेच्या कथासमाप्तीप्रसंगी हनुमानदासजी महाराज यांचे आशीर्वादपर वचन साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर : जगाच्या कल्याण संतांच्या विभूती उक्तीप्रमाणे विश्वात सुख, शांती, समाधान, आनंद आणि भरभराट निर्माण करण्यासाठीच साधू, संत, महंत यांचे जीवन आहे. संत आणि प्रभू सेवेत समर्पित मानवाला जीवनातील परमोच्च सुखाची अनुभूती मिळते. म्हणून या जन्मात प्रत्येक मानवाने संतचरण आणि प्रभूस्मरण यातून मोक्षप्राप्ती साधून घ्यावी, असे आशीर्वादपर वचन मध्य प्रदेशमधील अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री प.पू. हनुमानदासजी महाराज यांनी व्यक्त केले. ते फैजपूर येथील श्री खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व साकेतवासी ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून संगीतमय श्रीराम कथेच्या कथासमाप्ती व संतदर्शन सभेत बोलत…
राष्ट्रीय महामार्गावर सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोकोचा इशारा साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : गोरगरीब मेंढपाळ लोकांकडून शिवार चराईच्या नावाने अन्यायकारक रितीने वसुली करणाऱ्या मेहुणबारे येथील पीक संरक्षक सहकारी सोसायटीवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन येथील सकल धनगर समाजाच्यावतीने मेहुणबारे येथील सहायक पोलीस निरीक्षक यांना नुकतेच देण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील पीक संरक्षण सोसायटी संस्थेचा नोंदणी क्रमांक १२०३५ व नोंदणी ३० ऑगस्ट १९४७ आहे. संस्थेचे मुख्य कार्य शिवारातील शेत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे, पिकांचे, झाडाझुडपांचे, इलेक्ट्रिक पंपाचे, इतर मालमत्तेचे चोर व सुनाट गुरांपासून संरक्षण करणे आहे. त्याकामी आवश्यक असणाऱ्या उपायोजना करणे,…
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव : चोपडा येथील मुक्ताई फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक समाजसेविका इंदिरा जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ताई फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना नुकतेच पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच समाजसेवेत वाहून घेणाऱ्या इंदिरा जाधव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ताई फाउंडेशनतर्फे झालेल्या राज्यस्तरीय दुसरे कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले . हा पुरस्कार इंदिरा जाधव यांना प्राप्त झाल्याने त्यांचे साहित्य, सामाजिक क्षेत्र आणि मित्र परिवारातून त्यांचे कौतुक केले…
चैतन्य धाम गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/न्यूज नेटवर्क/जामनेर : तालुक्यातील अंबीलहोळ देवीचे येथे जीएम फाउंडेशन आणि जामनेरच्या न्यू रुबी स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य निदान शिबिर गुरुवारी, १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री रामदेवजी बाबा मंदिर येथे आयोजित केले आहे. शिबिराचे आयोजन चैतन्य धाम गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टने केले आहे. शिबिराचे उद्घाटन जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड उपस्थित होते. शिबिरात डॉ. नितीन गायकवाड, डॉ. सुरुची डहाके, डॉ. शिवानी पाटील,…
कुऱ्हा दूध डेअरीचे चेअरमन भगवान धांडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार साईमत/ न्यूज नेटवर्क/ भुसावळ : जिल्ह्यात कुऱ्हे पानाचे येथे चेअरमन भगवान धांडे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून दूध डेअरीची इमारत उभारण्यात आली आहे. याबद्दल जळगाव येथे दूध संघाच्या चेअरमन कार्यशाळेत संस्थेचे चेअरमन तथा माजी सरपंच हे भगवान धांडे यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालकांचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. संस्थेने स्वतःच्या मालकीचा प्लॉट विकत घेऊन त्यावर लोकसहभागातून तालुक्यात उभारण्यात आलेली पहिली इमारत आहे. लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी एकत्र येवून केलेले कार्य म्हणजेच लोकसहभागातून विकास होय. ग्रामीण विकासात लोकसहभागाचे…
३२ हजाराच्या मुद्देमालासह गावठी कट्टा, काडतूस जप्त साईमत/न्यूज नेटवर्क/अडावद, ता.चोपडा : एक जण हातात पिस्तूल घेऊन निर्जनस्थळी गावठी कट्टयाने फायरिंग करीत असतांनाचा व्हीडीओ व्हाट्सॲपवर प्राप्त झाला असल्याची गोपनिय माहिती पो.ह.हरीलाल पाटील यांना २७ जुलै रोजी मिळाली होती. तो अज्ञात व्यक्ती असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांनी पीएसआय अनिल जाधव, स.फौ.अतुल वंजारी, पो.ह. हरीलाल पाटील, विष्णु बिऱ्हाडे, हेमंत पाटील, प्रदीप सपकाळे, भारत पाटील, प्रदीप चवरे असे पथक तयार केले होते. दरम्यान, गावठी कट्टा बाळगणाऱ्याला एलसीबीने अटक केली आहे. पथकाने फायरिंग करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेतल्यावर तो विशाल राजेंद्र ठाकुर, (रा.इंदिरा नगर, अडावद) असे असल्याचे निष्पन्न केले. त्याने…
धरणगावातील महिलांचा गढूळ पाणी प्रश्नी नगरपरिषदेवर ‘एल्गार’ साईमत/न्यूज नेटवर्क/धरणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. अशा पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. दुसरीकडे वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत संतापलेल्या नागरिकांनी मातीमिश्रित, चिखलयुक्त पिवळसर गढूळ पाण्याच्या बॉटल सोबत घेत नगरपरिषदेवर मोर्चा काढून प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. शहरातील विविध पक्षांकडून, नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही पाणीप्रश्न तडीस जात नसल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी एल्गार पुकारुन नगरपरिषदेवर धडक दिली. नगरपालिकेवर मोर्चा धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत…