पाळधीला शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश साईमत/पाळधी ता. धरणगाव/प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील गंगापुरी, पष्टाणे, अंजनविहिरे येथील शंभरहून अधिक तरुणांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. विरोधकांच्या टीकेला आम्ही नेहमी विकास कामांच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. पुढेही टीकेला उत्तर कामांतून देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे भिल्ल समाजाच्या व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळी बोलत होते. जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकास कामाचा वसा जोपासणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव…
Author: Sharad Bhalerao
बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात घेतला शोध साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील एम. जे. नगरातील फिर्यादी विनोद प्रकाश बारी यांनी त्यांच्या मालकीचे शिवाजी चौकातील जगेश्वर पापड केंद्र, पिठाची गिरणीतून त्यांचा सात हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन आणि तीन हजार ३२० रुपये रोख असा दहा हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत फिर्याद दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन, रोख रुपये व अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले होते. पथकातील पोलीस…
100 सीड्स बॉल थ्रो आऊट करून क्लबच्या सदस्यांनी केले वृक्षारोपण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : पाटणादेवी ट्रिप आणि सीड्स बॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण प्रोजेक्ट यशस्वीरित्या नुकताच राबविण्यात आला. सुरुवातीलाच क्लब डिस्ट्रिक्ट आयसो योगिता बंग यांनी लिंबू पाणी एनर्जी ड्रिंक दिले. अतिशय जोशात नियमबद्ध पद्धतीने सर्व मैत्रिणी उपस्थित राहिल्या. क्लबच्या सीसी मोहिनी कापडणे यांनी सीड्स बॉल प्रोजेक्ट सुचविला. त्याला अनुसरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर दिनेश देशमुख, सामाजिक वन्य जीव विभागाचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अशोक मोरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कोतकर आणि वनविभाग कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी बनविलेले 100 सीड्स बॉल पायवाटेने निसर्ग रम्य वातावरणात थ्रो आऊट करून क्लबच्या सदस्यांनी वृक्षारोपण करण्यास सहकार्य केले.क्लब अध्यक्षांनी त्यांना…
मालदाभाडी हायस्कूल येथील ‘ग्रीन आर्मी’चा स्तुत्य उपक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी : ‘झाडे’ ही मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत सच्च्या मित्राप्रमाणे साथ देतात. या भावनेने प्रेरित होऊन मैत्री दिवसाचे औचित्य साधून मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत ‘ग्रीन आर्मी’च्या स्वयंसेवकांनी वृक्षांना ४०० पेक्षा जास्त फ्रेंडशिप बँड बांधले. अध्यक्षस्थानी करूणा महाजन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाटील, नितीन पाटील उपस्थित होते. परिसरात काळसड, हिवर, भोकर, टेंभुर्णी यासारख्या दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प ‘ग्रीन आर्मी’ने केला आहे, अशी माहिती ‘ग्रीन आर्मी’चे प्रमुख विजय सैतवाल यांनी दिली. यशस्वीतेसाठी जी.टी.पाटील, आर. एल. कोळी, एन. एस. पाटील, मनोज जैन, ग्रीन आर्मीचे स्वयंसेवक दिव्या मंगळकर, कोमल…
तहसीलदार निता लबडे यांना निवेदनासह मशीन केले सुपूर्द; सर्व्हर समस्या लवकर सोडविण्याची मागणी साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्यावतीने सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी ‘ई-पोस मशीन जमा करो’ आंदोलन करून तहसीलदार निता लबडे यांना निवेदन देऊन पुरवठा विभातील गुरव यांच्याकडे भुसावळ तालुक्यातील ई पोस मशीन जमा करण्यात आल्या. सर्व्हर समस्या लवकर सोडण्यात यावी, अशी मागणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी केली. तहसीलदार निता लबडे यांच्याशी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट घेऊन ई-पोस मशीन सर्व्हर अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पुरवठा विभागातील गुरव यांच्याकडे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सोबत आणलेल्या ई-पोस मशीन देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील स्वस्त धान्य…
जलाभिषेक, दुग्धाभिषेक, महाआरतीसह भाविकांना प्रसादाचे वाटप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा जागृत स्वयंभू महादेव मंदिरात महादेव शिवलिंग दुग्धाभिषेक, १५ जोडप्यांच्या हस्ते महाआरती, केळीचा प्रसाद वाटप, श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी भाविकांनी मंदिरात गर्दी केल्याने सोनी नगरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’ असा जयघोष केला. पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्याजवळील सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी पहाटे मधुकर ठाकरे, नरेश बागडे यांनी महादेव शिवलिंगाचा जलाभिषेक केला. त्यानंतर १५ जोडप्यांच्या हस्ते महादेव शिवलिंगाचा दुग्धाभिषेक करून बेलपत्राने सजविण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण मेंगडे, गणेश जाधव, प्रशांत…
मंडळाधिकारी बबीता चौधरी यांची माहिती साईमत/यावल/प्रतिनिधी : तालुक्यात महसूल पंधरवाडा म्हणजे १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट २०२४ पर्यंत महसूल विभागातर्फे शासनाच्या विविध प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून बामणोद मंडळ स्तरावर विभागातर्फे बामणोद येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यात शासनाच्या विविध प्रकारच्या योजना त्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ वृद्धासाठी चारधाम यात्रा, दाखले वाटप, पिक विमा योजना आदी योजनांची माहिती मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी सविस्तरपणे दिली. तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या शंकाचे, समस्यांचे निरसन करून लोकाभिमुख विविध कामांना नियमित वेळेवर प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. यावेळी सरपंच गिरीश विलास तायडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे,…
शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा रवीकांत तुपकर यांनी दिला आहे. मलकापूर परिसरात डॉ.प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. हा व्यापारी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सोयाबीन-कापूस पैसे न देता खरेदी करून फरार झाला आहे. या व्यापाऱ्याने जवळपास ९० कोटीपेक्षा…
रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशीर्वाद साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : ज्येष्ठ निरूपणकार तीर्थस्वरूप पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपूत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले. खान्देशसह अमळनेर तालुक्यात आप्पासाहेब यांचा अतिशय मोठा सेवक परिवार आहे. अमळनेर येथे नियमित त्यांच्या बैठका होत असतात. मंत्री अनिल पाटील हे संपूर्ण सेवाभावी परिवाराशी श्रद्धेने जुळले आहे. अनेक उपक्रमात ते व त्यांचा परिवार सहभागी होत असतो. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सदिच्छा भेटीनिमित्त ते त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह रेवदंडा येथे गेले होते. तेथे त्यांच्या निवासस्थानी आशीर्वाद घेतल्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी सामाजिक कार्याबाबत हितगुज…
चौक सुशोभीकरण भूमिपूजनाने दुर्लक्षित असलेल्या चौकाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकाचे धुळे-मालेगाव रोड वाय पॉइंट येथे आ.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ.मंगेश चव्हाण यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार होणाऱ्या चौकामुळे विकसित चाळीसगाव शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष ठाणसिंग पाटील, उमा पाटील, विकास पाटील, भुरा पाटील, डॉ.राऊळ, मच्छुभाऊ राठोड, ए. ओ. पाटील, शैलेंद्र पाटील, आण्णा राजपूत, डॉ. सुनील राजपूत, डॉ. अनुप परमार, इंद्रसिंग राजपूत, आशालता चव्हाण, योगेश अग्रवाल, घृष्णेश्वर पाटील, संजू पाटील, नितीन पाटील, धर्मा वाघ, धनंजय मांडोळे,…