Author: Sharad Bhalerao

एकाला पोलीस खात्यात मिळाली ‘खाकी’ तर दुसरा बनला आरोग्य खात्याचा ‘सेवक’ साईमत/पहुर,ता.जामनेर/प्रतिनिधी : ‘भगवान के घर देर है…पर अंधेर नही’ अशा उक्तीची प्रचिती येऊन जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील दोघेही जिगरी मित्र एकाच दिवशी नोकरीला लागल्याचा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करुन जिद्दीमुळे दोन्ही मित्रांचे ‘भाग्य’ उजाळले आहे. याबद्दल गावातील सरपंच हर्षल चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी दोघांचा नुकताच सत्कार केला. हलाखीच्या जीवनातील दोघांचेही अनुभव महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती युवा कीर्तनकार ह.भ.प. अविनाश महाराज चौधरी (नाचणखेडेकर) यांनी ‘साईमत’ला दिली. जामनेर तालुक्यातील पाळधी येथून जवळील नाचणखेडा येथील सागर तानाजी चौधरी हा वयाच्या १८ व्यावर्षापासून स्पर्धा परीक्षांचा सराव…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकार्य लाभले. याप्रसंगी एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधीक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) महेश ढाके, साठवणूक विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अर्चना मेढे, एल. एम. पवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जैव विविधत जपता यावी, यासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. या सृजनशील उपक्रमात जळगाव…

Read More

‘नारी शक्ती’ संस्थेतर्फे हास्य फुलविण्याचे काम साईमत/जळगाव/प्रतिनिधी: संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात ‘नारी शक्ती’ बहुउद्देशीय संस्थेतर्फे रक्षाबंधन सणाच्या पूर्व दिवशी निराधार आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम ‘नारी शक्ती’ तर्फे करण्यात आले. निराधार वृद्ध आजोबांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. ते आपले उरलेले जीवन कसेतरी कंठत आहेत. अशा आजोबांना एक आशेचा किरण दाखविण्याचे काम ‘नारी शक्ती’ तर्फे केले जात आहे. आपणही कुणाचे रक्षण करू शकतो, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. जळगाव येथील बेघर निवारा केंद्रातील निराधार आजोबांना राखी बांधून त्यांच्या मरगळलेल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जळगाव येथील ‘नारी शक्ती’ संस्थेतर्फे करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष मनिषा पाटील, सचिव ज्योती राणे, कार्याध्यक्ष…

Read More

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित साईमत/यावल/प्रतिनिधी : तालुक्यातील सावखेडा परिसरातील भोनक नदीवरील निंबादेवी धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात तालुक्यातील निमगाव टेंभी येथील २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. तालुक्यातील निमगाव – टेंभी येथील वेदांत सूर्यवंशी (वय २०) हा तरुण सोमवारी दुपारी निंबादेवी धरणावर सांडव्याच्या पाण्यात गेला होता. तेव्हा अचानक पाण्यात बुडून त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा श्वास गुदमरला. त्याला तात्काळ किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले होते. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, निंबादेवी धरणावर काही वर्षांपूर्वी अशाच घटना घडलेल्या आहेत.…

Read More

अनेकांकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव साईमत/अडावद, ता.चोपडा/प्रतिनिधी : मुस्लिम समाजातील कार्यकर्ते तथा नेहमी अल्पसंख्यांक समाजातील कामात अग्रेसर असणारे रियाजोद्दीन कबिरोद्दीन शेख (रा.अडावद, ता.चोपडा) यांची अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शोहेब खाटीक यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हाध्यक्ष अल्ताफ पटेल यांनी चोपडा तालुकाध्यक्षपदी रियाज शेख यांची नुकतीच निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महिला प्रदेशाध्यक्ष फरहत देशमुख, जळगाव जिल्हाध्यक्ष अल्ताफ पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अजीज खाटीक, महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मुराद पटेल, तालुकाध्यक्ष फिरोज कादरी, शहराध्यक्ष सलमान खान, सचिव वसीम शेख, नासिर शेख, अल्पसंख्याक विकास मंडळाच्या राज्य कार्यकारिणीने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Read More

जरंडीच्या खडकी नदीला दुसऱ्यांदा पूर साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : सोयगावसह परिसरात सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता अचानक तीस ते चाळीस मिनिटे धुव्वाधार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. जरंडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जरंडीत खडकी नदीला जुलै महिन्यानंतर दुसऱ्यांदा सोमवारी पूर आला होता. त्यामुळे महिन्याभरानंतर दुसऱ्यांदा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. सोयगाव परिसरात ८ ऑगस्टपासून अकरा दिवसांचा खंड पडला होता. त्यामुळे कपाशीच्या पिकांनी ऊन धरले होते. मात्र, सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने कपाशी, मका पिकांना तग धरला आहे. मात्र, तालुक्यातील निम्म्या भागात पाऊस नसल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती होती. दहा गावात पावसाची जोरदार हजेरी सोयगावसह जरंडी, निंबायती,…

Read More

कीटकनाशके फवारणी करतांना जरंडीत घडली घटना साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : कपाशी पिकांवर फवारणी करतांना विषबाधा होऊन सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शेतमजुराचा जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सात वाजता घडली. दरम्यान, याप्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. युवराज दलपत पवार (वय ३५, रा.जरंडी, ता.सोयगाव) असे कीटकनाशके फवारणी करतांना विषबाधा होऊन मृत झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील कर्त्या तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात बुधवारी (दि.१४) शेतात कीटकनाशके फवारणी करतांना विषबाधा झाली होती. त्यानंतर त्यास तातडीने बुधवारी रात्री उपचारासाठी तातडीने जळगाव येथे दाखल केले…

Read More

कवलीला घडली घटना, गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील कवली गावातील ५८ वर्षीय महिलेचा डेंग्यू सदृश तापाने छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण करून दोन रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. कवली गावात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे तापाची रुग्ण आढळून येत असताना गावातील अंजनाबाई सुकलाल अहिर (वय ५८) यांना (दि १२) किरकोळ तापाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पिंपळगाव (हरे.), शेंदुर्णी येथे खासगी उपचार करण्यात आले. मात्र त्यांचा ताप नियंत्रणात येत नसल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, ताप अधिकच वाढल्याने त्यांची रविवारी रात्री उपचारदरम्यान प्राणज्योत मावळली.…

Read More

२२ शाळांमधील ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्यावतीने जळगाव शहरातील शालेय स्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेदिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत शहरातील २२ शाळांमधील आठवी, नववी, दहावीतील ५९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच ५० संघ व्यवस्थापक उपस्थित होते. सकाळच्या प्रथम सत्रात के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले यांच्या हस्ते यज्ञ प्रज्वलित करीत शंखनाद व मंत्रोच्चारात स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. यावेळी ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी मनोगतातून संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार व विकासासाठी…

Read More

जागतिक छायाचित्रणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सूर साईमत/जळगाव/प्रतिनिधी: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर असोसिएशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रणा दिनानिमित्त कॅमेरा पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर्ट गॅलरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचा सूर जागतिक छायाचित्रणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांमधून उमटला. अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील होते. भ्रमणध्वनीद्वारे आ.राजूमामा भोळे, डॉ.केतकीताई पाटील, शिवसेनेचे शरद तायडे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनीष जैन, जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष चतुर्भुज सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी…

Read More