Author: Sharad Bhalerao

सावखेडा, उटखेडा, भाटखेडात झाला ‘कृतज्ञता संवाद’ साईमत/रावेर/प्रतिनिधी: राजकारणासोबत समाजकारण सुद्धा झाले पाहिजे, या उद्देशाने युवा नेते धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून त्यांनी सुरु केलेल्या गाठी-भेटीचे सत्र बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा खु., सावखेडा बु., उटखेडा व भाटखेडा अशा चारही गावांपर्यंत पोहचले. युवा नेते धनंजय चौधरी यांच्या ‘कृतज्ञता संवाद’ यात्रेला गावागावत प्रतिसाद मिळत आहे. गावांमध्ये सर्व समाजघटकांना भेटून त्यांनी संवाद साधला. रावेर विधानसभा मतदारसंघात आ.शिरीषदादा चौधरी यांनी केलेला ‘विकास व भविष्यातील योजना’ यावर प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यासाठी सुरु असलेल्या कृतज्ञता संवाद दौरा प्रारंभी सावखेडा बुद्रुक गावात प्रथम राम मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन…

Read More

कवली गावात सर्वेक्षणाला प्रारंभ साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : कवली गावात डेंग्यूसदृश तापाच्या संशयित महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मंगळवारी आरोग्य विभागाच्या तीन पथकांनी कवली गावात ताप रुग्ण सर्वेक्षण घेऊन पाच रुग्णांची रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. दरम्यान, महिलेला बाहेरगावी तापाची लागण झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. दुसरीकडे डेंग्यूसदृश तापामुळे आरोग्य विभाग हादरला आहे. त्यामुळे गावात सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे. आनंदाबाई सुकलाल अहिर (वय ५८) या महिलेचा डेंग्यूसदृश तापाने सोमवारी मृत्यू झाल्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगर येथील खासगी वैद्यकीय सूत्रांनी मंगळवारी तालुका आरोग्य विभागाला पाठविला होता.मंगळवारी डास सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.कुंडलीकर यांनी कवली गावात भेट देऊन घटनेची…

Read More

विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरी साईमत/सोयगाव/प्रतिनिधी: ‘माझी वसुंधरा’ उपक्रमातंर्गत जरंडी ग्रामपंचायतीच्यावतीने शाळेतील चिमुकल्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली.निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना हुतात्मा स्मारक येथे लावण्यात आलेल्या झाडांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधून अनोखी रक्षाबंधन साजरी केली आहे. त्यांनी रक्षाबंधनातून पर्यावरणाचा संदेश दिला आहे. सर्व राख्या टाकाऊ वस्तूंपासून मुलांनी पालकांच्या मदतीने तयार केल्या होत्या. त्यातील काही राख्या झाडांना बांधण्यात आल्या. झाड आपणाला ऑक्सिजन, सावली, फळे, फुले देते. त्यामुळे तोच खरा माणसाचा आधार आहे. त्याची जाणीव ठेऊन झाडालाच भाऊ समजून राखी बांधली, असे चिमुकल्यांनी सांगितले. यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, लिपिक…

Read More

तापी नदीत युवकाचा बुडवून मृत्यू : सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : देवीच्या पुजेसाठी हतनूर धरणाच्याखाली तापी नदीवर गुलाब सुरेश तायडे (वय २६, रा.मदिना नगर, सावदा, ता.रावेर) हा त्याचे मित्र प्यारेलाल रामकृष्ण लोखंडे याच्यासोबत सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी गेला होता. तिथे त्याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा पोलिसांसह नातेवाईकांनी शोध घेतला. तेव्हा त्याचे प्रेत मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास रायपूर, ता.रावेर शिवारातील नदीपात्राच्या किनाऱ्यालगत मिळून आले. याबाबतची खबर सावदा येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी अनिकेत जीवन सुरवाडे यांनी दिल्यावरून सावदा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे. मयत तरुणावर २१ ऑगस्ट रोजी सकाळी अंतिम संस्कार…

Read More

पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत हे गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी पाचोरा येथे येत आहे. ते पाचोरा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे भारत डेअरी येथुन सकाळी ९ वाजता शहरात आगमन होणार आहे. तेथुन बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. बाईक रॅली जामनेर रोडमार्गे शिवसेना कार्यालयाजवळ येणार आहे. तेथे स्वागत व शिवध्वजारोहण होणार आहे. शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन केल्यानंतर भुयारी मार्गे, भडगाव रोड, राजे संभाजी चौक, महाराणा प्रताप चौकमार्गे शहरातील अटल मैदानावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मेळाव्याला संपर्क प्रमुख संजय सावंत, वैशाली सूर्यवंशी व…

Read More

अडावदला शांतता समितीच्या बैठकीत सपोनि प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन साईमत/अडावद, ता.चोपडा/प्रतिनिधी : गुलालऐवजी फुलांची उधळण केल्यास सणांचा आनंद द्विगुणित होईल. जो कायद्याचा आदर करतो आम्ही त्याचा आदर करतो, असे प्रतिपादन नव्यानेच हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले. अडावद येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बबन खा तडवी होते. प्रथम काही सदस्यांनी सपोनि यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आगामी येणारे सण कसे शांततेत साजरे होतील, यावर सपोनि यांनी सदस्यांशी चर्चा केली. बैठकीत तंटामुक्तीचे अध्यक्ष साखरलाल महाजन, माजी सरपंच कबीरोद्दीन शेख, पिंटू दहाड, सचिन महाजन, अमजद कुरेशी, पिरू सेठ, फजल…

Read More

‘भाऊंच्या’ वाढदिवसानिमित्त आग्रहाची अन्‌ प्रेमाची साद जळगाव जिल्ह्यात राजकीय, सामाजिक, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात वावरणाऱ्या वाघ कुटुंबियांना कै.आप्पासाहेब ओंकार वाघ यांचा समर्थ आणि कृतिशील असा वारसा आहे. कै.आप्पा साहेबांच्या हयातीतच दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या परिसरात धडाडीने नेतृत्व करायला सुरुवात केली. सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण, बेरोजगार वेळोवेळी निर्माण होणाऱ्या मतदारसंघातील समस्या, दुष्काळ, अन्याय, अत्याचार अशी फार मोठी भाऊंच्या जनहिताच्या कामाची जंत्री आहे. ते सदैव जनतेबरोबर राहिले आणि त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आघाडीवर राहून नेतृत्व करत राहिले. अशी कोणतीही सहकार अथवा राजकीय क्षेत्रातील निवडणूक नाही की, ज्या निवडणुकीत निष्ठावान योग्य आणि कृतिशील कार्यकर्त्यांना संधी मिळवून देण्यासाठी ते स्वतः झटले नाहीत.…

Read More

मेळाव्यात विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका मांडणार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप वाघ यांच्या समर्थकांचा सारोळा रस्त्यालगतच्या समर्थ लॉन येथे गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात माजी आमदार दिलीप वाघ आपली राजकीय भूमिका मांडणार आहेत. मेळाव्यात समर्थकांचे विचार, सूचना, मत ऐकून आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात माजी आमदार दिलीप वाघ हे पुढील भूमिका समर्थकांसमोर मांडणार आहे. मेळाव्याला पाचोरा, भडगाव तालुक्यातील पक्षांचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, हितचिंतक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Read More

मुस्लिम समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी: संपूर्ण इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद (स) यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांचा व संपूर्ण इस्लाम समाजाचा अपमान करणारे एवढेच नव्हे तर इस्लाम धर्माचा अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून टीका करणारे रामगिरी महाराज यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील एकही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला नाही. म्हणून जळगावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना पाचोरा वासियांच्या तीव्र भावना निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यात एका तरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. याप्रकरणी अभ्यास करून व माहिती जमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने शिष्टमंडळाला…

Read More

नूतन कार्यकारिणी निवड करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर, नागारोव जाधव यांचे ‘आदर्श विचार संग्रह-३’ चे प्रकाशन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील शिवाजी नगरातील दा. शा. पाटील स्मृतीभवनात जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकती घेण्यात आली. पुढील काळात जिल्हा व राज्यभरात संस्थेचे नावलौकीक व्हावे म्हणून साहित्य चळवळ वाढीसाठी पुढील जबाबदारी तरुण पदाधिकाऱ्यांकडे देत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले. पुढील सुत्र नूतन कार्यकारिणीच्या हाती देणार असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डी. बी. पाटील, सुधाकर बी. चौधरी, प्रा.एस.आर. महाजन, प्रा. सौ.पी.एस. महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कडुबा पाटील, सचिव…

Read More