साईमत/जळगाव/प्रतिनिधी : हरीभक्त परायण, समाजमनातील श्री समर्थ सद्गुरु सुखदेव महाराज (जळगावकर) यांचे गुरुवारी, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराजांच्या अंत्ययात्रेस जनसागर उसळला होता. दुपारी ३ वाजता निघालेल्या भव्य ट्रॉलीत सजवलेल्या अंत्ययात्रेत असंख्य भक्तगण सहभागी झाले होते. मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, भजन-कीर्तन आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी वातावरण दुमदुमले होते. यावेळी कंजरभाट समाजाचे मोहन गारुंगे यांनी आरती करून दर्शन घेतले. तसेच नरेश बागडे, उमेश माछरे, राहुल नेतलेकर आदी समाजबांधवही उपस्थित होते. सुखदेव महाराज हे निर्भय सद्गुरु सत्संग मंडळ संस्थेमार्फत अनेक अनुयायांना अध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. ते कंजरभाट समाजातील श्री…
Author: Sharad Bhalerao
‘शावैम’ अधिष्ठातांसह कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे समाजातून कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन बी. जे. मार्केट परिसरात बुधवारी, २२ रोजी एक महिला व एक पुरुष बेवारस अवस्थेत पडलेले आढळले. ही माहिती मिळताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी तत्काळ धावून गेले आणि दोघांना उपचारासाठी दाखल करून दोघांचे प्राण वाचवले. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून माहिती दिली की, मार्केटमध्ये ही दोन्ही आजारी आहेत. दिवाळी सणाच्या व्यस्त वातावरणातही, मार्केटमध्ये कोणी उपस्थित नसतानाही डॉ. ठाकूर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी स्मार्ट सर्व्हिसेसचे सुपरवायझर राहुल सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना दिली. राहुल सोनवणे यांनी योगेश कासार, निलेश…
रक्ताची नाती नाहीत, पण मनाची नाती जुळली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : दिवाळी म्हणजे नात्यांचा, प्रेमाचा आणि आनंदाचा सण. मात्र समाजात असेही काही लोक आहेत, ज्यांना कुणाचा आधार नाही, ज्यांच्याकडे कुटुंब नाही. अशा बेघर, आशाळभूत भावांसोबत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे भाऊबीज साजरी करण्यात आली. अशा उपक्रमातून प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचा संदेश देत ‘नारीशक्ती’च्या बहिणींनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. ‘नारीशक्ती’ संस्थेच्या कार्यकर्त्या बहिणींनी शहरातील नवीन बसस्थानकालगतच्या बेघर निवारा केंद्रातील परिवारा आपले मानत हा सण साजरा केला. यावेळी त्यांनी भावांना ओवाळून भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. ज्यांना रक्ताची नाती नाहीत, त्यांना मनाचा आधार देण्याचे काम ‘नारीशक्ती संस्थे’च्या बहिणींनी केले. भाऊबीजेच्या ओवाळणीसोबत त्यांनी…
अनोख्या पद्धतीने ‘दिवाळी पहाट पाडवा’ साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मुक्ताई कॉलनीत आधार ज्येष्ठ नागरिक संघात ‘दिवाळी पाडवा’ निमित्त ‘दिवाळी पहाट’ सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम गायिका सुनंदा चौधरी यांच्या मधुर स्वरांनी सजलेला आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला डॉ. संभाजी देसाई, जुलाल पाटील, अमृत पाटील, उदय बापू पाटील, गजानन देशमुख, सचिव प्रकाश पाटील, रत्नमाला देसाई, प्रतिभा देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातीला सुनंदा चौधरी, निकिता जोशी, प्रशांत ठाकूर, मयूर मोरे, योगेश पाटील तसेच टीव्ही मालिकेतील (“विन दोघातली ही तुटे ना”) अभिनेत्री मीनाक्षी सुधीर निंबाळकर यांचा अध्यक्षांच्या हस्ते रुमाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष डॉ. संभाजी देसाई यांनी…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समर्पित टीमने अपघातातील जखमी ३५ वर्षीय रुग्ण पंकज गोपाळ यांच्या जीवघेण्या ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’वर यशस्वीरित्या मात केली. ही दुर्मिळ आणि गुंतागुंतीची स्थिती व्यवस्थापित करणे वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय मानले जाते. मलकापूर महामार्गावर अपघात झाल्यानंतर दोन्ही मांडीच्या हाडांचे गंभीर फ्रॅक्चर झालेल्या रुग्णास तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. तपासणीत ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’ची तीव्र लक्षणे आढळल्याने रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून बायपॅप व्हेंटिलेटरी सपोर्ट, अँटिकोअग्युलेशन, ऑक्सिजन थेरपी आणि हेमोडायनॅमिक मॉनिटरिंग सुरू केले. तीव्र रक्ताक्षय असूनही डॉक्टरांच्या अचूक देखरेखीमुळे रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर दोन्ही मांडीच्या फ्रॅक्चरची…
संघटनात्मक कामाची पावती म्हणूनच पक्षाने सोपविली जबाबदारी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हा ऑटो स्कुल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्ष पदावर प्रमोद अण्णा वाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे तसेच खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश(राजूमामा) भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस नितीन इंगळे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, मुकुंद मेटकर, माजी शहराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, शहराध्यक्ष नीतू परदेशी,…
दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या हस्ते उद्घाटन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षांपासून निखील पाटील आणि वेदांत चाळसे हे युवक शिक्षण घेत असतानाच समाजासाठी उपयोगी कार्य म्हणून शहरातील काव्यरत्नावली चौकात “ना नफा ना तोटा” तत्त्वावर दिवाळी फराळ स्टॉल लावत होते. यंदाही ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी दोन विद्यार्थ्यांना संधी दिली. बी.फार्म.चे विद्यार्थी पार्थ पाटील आणि राहुल पिसाळ यांनी यंदा स्टॉलचे आयोजन सांभाळले. त्यांच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. स्टॉलचे उद्घाटन दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोदभाऊ बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सुनील खडके, भास्कर पाटील, बापूसाहेब पाटील, माजी नगरसेवक अमित भाटिया, नंदू पाटील, माजी शहर अभियंता शशिकांत बोरोले, विक्की…
त्रिपदी परिवार शाखेतर्फे भक्तिभावाने उजळले मंदिर साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : शहरातील कुलकर्णी प्लॉटमधील नाना महाराज तराणेकर यांच्या मंदिरात त्रिपदी परिवार शाखेतर्फे धनत्रयोदशी आणि गुरुद्वादशी ह्या पवित्र योगावर बाबा महाराज तराणेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वा दत्तयाग नुकताच पार पडला. हा योगायोग नाना महाराजांच्या कृपेने घडून आला. यजमानांनी श्रीराम राजूरकर यांच्या पौराहित्यानुसार आहुती देऊन समारंभ पार पडला. हा धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव भाविकांसाठी अत्यंत स्मरणीय ठरला. त्यामुळे मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघाला. याप्रसंगी परिवारातील वंदना गालफडे, श्री व सौ. यावलकर, मंगला अशोक पुराणिक, सुरेश घन, वासुदेव इंगळे, श्री.भोळे, सुजाता पुराणिक यांच्यासह संपूर्ण त्रिपदी, मित्र परिवार तसेच गुरुबंधू उपस्थित होते. समारंभात घोरकष्टोरण स्तोत्र म्हणून…
पांझरापोळ गोशाळेचा परिसर “ गौ माता की जय ” घोषणांनी दणाणला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा न्यायालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन “गोवत्स बारस”निमित्त “सामूहिक गौ सेवा-एक अनुष्ठान” उपक्रमांतर्गत सेवाभावी कार्य केले. यावेळी गौसेवाव्रती ॲड. विजय काबरा यांच्या आवाहनानुसार जिल्हा न्यायालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी परिवारासह पांझरापोळ गोशाळेत उपस्थित राहिले. त्यांनी गौमातेचे पूजन करून तिला लापशी खाऊ घालत गौसेवा अर्पण केली. यावेळी “देशधर्म का नाता है, गौ हमारी माता है”, “गौ माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी ॲड. विजय काबरा यांनी उपस्थितांना गौसेवेचे धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व पटवून दिले. गौमातेचे पंचगव्य मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक घरातून दररोजची पहिली…
सजावट, फराळ अन् खरेदीसाठी धडाक्यात रंगला बाजार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजल्या आहेत. त्यातच शहरातील फुले मार्केट, महात्मा गांधी रोड, नवीपेठ आणि इतर प्रमुख बाजारपेठ परिसर जळगावकरांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. अशा ‘बंपर’ खरेदीमुळे स्थानिक अर्थकारणाला मोठा चालना मिळाली असून, कोट्यवधींची उलाढाल नोंदवली जात आहे. दरम्यान, सजावट, फराळासह विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजार धडाक्यात रंगल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरभर उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी आकाशकंदील, रांगोळी साहित्य, रेडीमेड तोरणे, विविध प्रकारच्या पणत्या व विद्युत रोषणाईसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. घरातील सजावटीसाठी वस्तू, नवीन कपडे, मिठाई आणि दिवाळी फराळही मोठ्या…