Author: Sharad Bhalerao

हजारोंच्या उपस्थितीत रात्री मयतांचे देह झाले ‘अनंतात विलीन’ साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील भाविकांनी भरलेल्या बसचे चाक खड्ड्यात पडताच बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने भुसावळसह वरणगाव परिसरात शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे. विमानाने जळगाव येथे आणलेल्या सर्व मयतांवर रात्री १२ वाजेदरम्यान हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आल्याने मयतांचे देह ‘अनंतात विलीन’ झाले आहेत. अपघातग्रस्त बसच्या मागून प्रवास करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक इब्राहिम याने नेपाळ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा अपघात डोळ्यासमोर घडल्याचे सांगितले. अपघातग्रस्त बसचे चालक मुर्तजा यांनी ब्रेक लावत खड्ड्यात पडलेल्या बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ती पलटी होऊन नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच गोरखपूर आणि…

Read More

एक लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लांबविला साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : गावालगतच्या शेत शिवारातील पत्र्याची शेडचे कुलूप तोडून चार ठिकाणी डल्ला मारून लोखंडी साहित्यासह एक लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घोसला शेत शिवारात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घोसला गावालगत बनोटी रस्त्यावर अनिल भिका बोरसे गट क्र.६८, सुभाष हरणे गट क्र.२२४, ज्ञानेश्वर गवळी गट क्र. २२१ यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचे एकाच रात्री कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३१ हजार रुपयांचे शेती उपयुक्त साहित्य चोरी करून पोबारा केला आहे. दरम्यान रविवारी सकाळी सात वाजता…

Read More

सोयगावला तहसिलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : भारतीय मजदूर युनियनशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शुक्रवारी सोयगाव तहसील कार्यालयावर शेतमजूर, ग्रामीण कष्टकरी, निराधार, बेघर व भूमीहीन रोहयो मजूरांचा धडक मोर्चा सोयगावला तहसील कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील शिवाजी चौकापासून सुरू झालेल्या मोर्चात सोयगाव तालुक्यातील सुमारे ३०० शेतमजूर, रोहयो मजूर, भूमीहीन, गायरान धारक, निराधार, ग्रामीण कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदलापूर तसेच पुणे आणि इतर ठिकाणी झालेल्या घटनेचा लाल बावटा शेतमजूर युनियन, भाकपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. मोर्चेकरांनी गायरान जमीनीचे पट्टे नावावर करा, वनजमीनीचे पट्टे नावावर करा,…

Read More

माजी खा.उन्मेष पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : नार-पार प्रकल्पासाठी माजी खा. उन्मेष पाटील यांनी केलेल्या आंदोलनास शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी पाठिंबा देऊन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली. राज्य सरकारने नार-पार प्रकल्पाला मंजुरी देण्याचा आव आणला असला तरी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी आधीच हा प्रोजेक्ट रद्द केल्याची घोषणा करून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला विरोध म्हणून माजी खासदार पाटील यांनी गिरणा नदीच्या पात्रात आंदोलन सुरू केले. ते रात्रभर गिरणा नदीच्याच पात्रात उभे होते. नार- पार प्रकल्प पूर्ण झाल्यास चाळीसगाव व पाचोरा-भडगाव अशा दोन्ही मतदारसंघाला लाभ होणार आहे. त्यामुळे गिरणाकाठ समृध्द होणार…

Read More

चोपडा येथे भाकपतर्फे जातीगत जनगणना परिषदेत साहित्यिक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन साईमत/चोपडा /प्रतिनिधी : भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती, जमातीविषयक माहिती जाहीर करण्यात आली. २०१४ पासून सरकारने मात्र जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी आहे, असा दावा करून विरोध चालविला आहे. खरे म्हणजे १९३१ नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही. जातीगत जनगणना ही ब्रिटिशांची देणगी आहे. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी जातीगत जनगणना करणे टाळले. ज्या काही जनगणना झाल्या त्या फक्त एससी, एसटी याची आकडेवारी बाहेर काढली. दुसरीकडे संविधानानुसार सर्व थरातील मागास जातीचा आर्थिक, सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे अधोरेखित आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना मागास…

Read More

समितीच्या सदस्य सचिवपदी तहसिलदारांची नियुक्ती साईमत/साक्री/प्रतिनिधी : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, पोषण आहार सुधारणा तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा प्रारंभ केला आहे. योजनेचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. त्यात सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी साक्रीतील भाजपाच्या नगरसेविका जयश्री विनोदकुमार पगारीया यांची निवड केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी साक्रीच्या आ.मंजुळा गावित तसेच सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश सोनवणे यांची अशासकीय निवड केली आहे. साक्री आणि पिंपळनेर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प (वरिष्ठ) अधिकारी, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)…

Read More

सुरक्षाबाबत दक्षतेची गरज, जि.प.शाळांमध्ये कॅमेरे नाहीत साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रात बाललैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक संस्था पुढे आलेल्या आहेत.बदलापूर व अन्य ठिकाणी शाळेतील मुलींवर अन्याय अत्याचार होऊन शोषण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत सक्रिय कॅमेरे असले पाहिजेत.तसेच मुलींच्या सुरक्षेबाबत राज्य शासनाने नुकतेच महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केलेले आहेत. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सहा शाळा आहेत. त्यात तब्बल २५०० च्यावर विद्यार्थी अध्ययन करत आहेत. त्यात दोन जि.प.शाळा वगळता अन्य शाळांमध्ये कॅमेरे बसविलेले आहेत. लहान मुलांसाठी कॅमेरे अत्यावश्यक आहेत, असा सर्वत्र सूर उमटत आहे. सर्वाधिक कॅमेरे धानोरा आश्रमशाळेत आहेत तर धानोरा जिल्हा परिषद तसेच बिडगाव, कुंड्यापाणी, बढाई, मोहरद येथील शिक्षक…

Read More

पाहणीत ३५ पैकी दहा पाणी साठ्यात आढळली ‘लारव्हा’ अळी साईमत/सोयगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील कवली येथील डेंग्यूसदृश तापाने महिलेच्या मृत्यू प्रकरणी शुक्रवारी आरोग्य सहायक संचालक पथकाने भेट दिली. पथकांने गावातील साठवण केलेल्या पाणी साठ्यांची पाहणी करून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यामध्ये घरात साठवण केलेल्या कंटेनरमधील पाणी साठ्यांची पाहणी केल्यावर ३५ पैकी दहा पाणी साठ्यात ‘लारव्हा’ अळी आढळून आली आहे. त्यामुळे गावात डेंग्यूसदृश तापाने शिरकाव केल्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना सहाय्यक संचालक पथकातील कीटक समहारक अनिल शेजवळ यांनी तालुका आरोग्य विभागाला दिल्या आहे. तालुक्यातील कवली गावात शुक्रवारी पुन्हा तीन रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहे. यावेळी पथकातील अनिल शेजवळ, विजय जक्कल, आरोग्य…

Read More

वाहनधारकाने लहान रोपटे लावले खड्ड्यात, संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न साईमत/चोपडा/प्रतिनिधी : चोपडा- यावल आंतरराज्य मार्गावरील माचला फाट्याच्या अलीकडे असलेला छोटाश्या पुलावर एक मोठा खड्डा झालेला आहे. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. मोटरसायकल, चारचाकी वाहने हे जलद असतात. त्यामुळे जोरात खड्ड्यात आदळतात. वाहनधारकास पाणी तुंबलेल्या ठिकाणचा खड्डा लक्ष्यात न आल्याने दुचाकीवर बसलेले महिला, लहान मुले हे वाहनावरून बाजूला फेकली जातात. आजच लहुश धनगर, वर्डी यांच्या डोळ्यात देखत अशीच घटना घडली. वाहन धारकास पाणी तुंबलेल्या ठिकाणचा खड्डा लक्षात यावा, म्हणून त्यांनी लागलीच लहान रोपटे त्या खड्ड्यात लावले. संभाव्य अपघात टाळण्याचा लहानसा प्रयत्न केला. सद्यस्थितीला चोपडा – यावल…

Read More

विकासोच्या प्रांगणात साचले ‘पाणीच पाणी’ लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून वरुणराजा रुसला होता. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा तडाका सहन करावा लागत होता. आता मात्र दोन दिवसांपासून वरूणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. शनिवारी मात्र दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यातच गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात दमदार पावसामुळे पाणीच पाणी साचले होते. यासोबतच आठवडे बाजारात ‘चिखलाचे स्वरुप’ प्राप्त झाले होते. दुसरीकडे शेत शिवारातील छोटे-मोठे बंधारे ओसंडून वाहत होते. त्यामुळे जमिनीची ओल आणि लोहारा धरणात पाण्याची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. परिसरात शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. ग्राहकांअभावी बाजारपेठेत पसरली…

Read More