Author: Sharad Bhalerao

उबाठाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली कार्याची दखल साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील रहिवासी तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश साळुंके यांची उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उबाठाच्या महाराष्ट्र संघटकपदी नुकतीच निवड केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तमाम पारधी समाज बांधवांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रभर दौरा केला आहे. गरजू, वंचित शोषित पारधी समाज बांधवांना न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करत आहे. त्यांनी आदिवासी पारधी क्रांती संघटनेची स्थापना करून महाराष्ट्रातील पारधी समाज बांधवांना एकजूट करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अशा सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुकेश साळुंके यांची…

Read More

चोपड्यात ज्योती पावरा अन्‌ आदिवासी बांधवातर्फे जनआक्रोश मोर्चासह रास्ता रोको आंदोलन साईमत/चोपडा /प्रतिनिधी : आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिकांनी १३ जिल्ह्यातील १७ सेवा संवर्ग आदिवासी पेसा अंतर्गत भरतीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासनाचा तीव्र निषेध करण्यासाठी सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा, आदिवासी बांधवातर्फे शासकीय विश्रामगृहापासून ते धरणगाव रस्त्यावरील तिरंगा चौकापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तिरंगा चौकात मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर रास्ता रोको ठिय्या आंदोलनात झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि अनिता धनगर (उबाठा)हे सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्यावतीने ज्योती पावरा यांच्यासह नामसिंग शेवाळे, सलीम तडवी, प्रवीण पावरा व सुमारे ऐशी ते नव्वद स्वाक्षरी असलेले प्रमुख आठ मागण्यांचे…

Read More

छोट्या टपात घरीच मूर्ती विसर्जन करण्याचा विद्यार्थ्यांनी केला संकल्प साईमत/धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी : येथील कै. झिपरू तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजात रविवारी मुख्याध्यापक के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्यावतीने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविणे उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य योगेश पाटील, उपमुख्याध्यापक नवल महाजन यांनी धानोरा गावातील मूर्तीकार विशाल भगवान कुंभार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हरितसेना शिक्षक देविदास महाजन यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम, न विरघळणाऱ्या मुर्त्या व त्यांचे विषारी रंगामुळे नदी, विहीर, तलावाच्या पाण्यातील वाढणारे विषारी तत्व, पाण्यातील मासे आणि इतर सजीवांना त्यामुळे होणाऱ्या जीवघेण्या त्रास…

Read More

दिवसातून आठ ते दहा वेळा विद्युत पुरवठा होतोय ‘गुल’, महिलांसह व्यापारी वर्ग त्रस्त साईमत/लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी : येथे वीज महावितरण कंपनीचा मनमानी कारभाराला ग्रामस्थ कंटाळले आहे. लवकरच रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत. कारण लोहारा हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकवस्तीचे आहे. गावात नेहमीच खेड्यावरून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आपापली कामे (इलेक्ट्रिकल्स उपकरणे) करण्यासाठी येत असतात. मात्र, गावात लाईट नसल्यामुळे ग्राहकांची वेळेवर कामे होत नसल्याने व्यापारी वर्ग नाराज आहेत. तसेच ऑनलाइन कामेही पूर्ण होत नाहीत. पिठाची गिरणी वेळेवर सुरु नसते. कारण लाईटच नसते. त्यामुळे महिला वर्ग त्रस्त झालेल्या आहेत. दिवसातून तब्बल सात ते आठ वेळेस लाईट ‘गुल’ असते. कोणतीही वेळ…

Read More

प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.तेजस राणे यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी: हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीत अनेक गोष्टींमुळे शरीरावर परिणाम होत आहे. अनेक व्यक्तींना नानाविध व्याधी जडत आहे. त्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत उत्तम निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यावश्यक आहे. दैनंदिन आहार योग्य प्रमाणात, योग्यवेळी घेतला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी रोज विशिष्ट प्रमाणात कॉर्बोहायड्रेड्सचे सेवन झालेच पाहिजे. सायंकाळचे जेवण साधारणतः रात्री आठ वाजेच्या आत घेणे उत्तम. तसेच जेवणानंतर किमान १-२ तासानंतर शतपावली करावी. लागलीच फिरायला गेलात तर अपचनाचा त्रास होतो. सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी सेवन केले पाहिजे. सर्वात उत्तम प्रोटीन्स अंड्यातून मिळत असल्याने रोज किमान एक उकडलेले अंडे आहारात…

Read More

पावसात भक्तगण झाले ओलेचिंब, गिरणा नदीच्या जलाने केला अभिषेक साईमत/जळगाव/प्रतिनिधी- शहरातील पिंप्राळा भागातील सोनीनगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरातून श्रावणमास कावड यात्रा गिरणा नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्यावर “हर हर गंगे’’च्या जयघोषात गिरणा नदीची महिला शिवभक्तांनी विधीवत पूजा करून कावडातील पात्रात जल घेऊन भर पावसात ओलेचिंब भिजून भाविकांसह महिलांनी डोक्यावर तांब्याचे कळस तर काहींनी खांद्यावर कावड घेऊन जागृत स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगाला गिरणानदीतून आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी रविवारी दुपारी एक वाजता सावखेडा येथील गिरणानदीतून कावडीतील पात्रात जल घेऊन पावसाचा आनंद द्विगुणित करत ओलेचिंब भिजून संगिताच्या तालावर पाय थिरकत महादेवाचा जयघोष करत शिस्तीने रस्त्याच्या कडेने चालत होते. कावड यात्रेत गणपती नगर, ओंकार पार्क,…

Read More

‘रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम…!’ मथळ्याखाली प्रसिध्द केलेला मजकूर समाज घटकात प्रचंड प्रमाणात व्हायरल नेपाळमधील बस दुर्घटनेत जिल्ह्यातील ज्या २५ जणांनी जीव गमावला. त्यांचे कुटुंबिय विरहाच्या दु:खातून अद्यापही सावरलेले नाही. मात्र, रविवारी जळगावमधील ‘लखपती दीदी’ समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या दुर्घटने दुर्घटनेबद्दल ज्या शब्दात पिडा व्यक्त केली, त्यातून त्यांच्यातील संवेदनशिलतेचे आणि लोकांप्रतीच्या आत्मनियतेचे दर्शन घडले. त्या दुर्घटनेविषयी बोलतांना ते पुढे म्हणाले, दुर्घटनेची माहिती मिळताच नेपाळ सरकारशी संपर्क साधण्यात आला आणि आमच्या केंद्रीयमंत्री रक्षाताई यांना तातडीने नेपाळला जाण्याचे सांगितले. दुर्घटनेतील मृतदेह वायुसेनेच्या विमानाने येथे आणण्यात आले आणि जे जखमी आहेत. त्यांच्यावर चांगल्या पध्दतीने उपचार सुरु आहेत. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला श्री.मोदींनी ‘इसी धरती…

Read More

डॉ. राजेश मानवतकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : शेतात कोळपणीचे काम सुरू असतांना गवताच्या झुडपात दडून बसलेल्या घोणस जातीच्या विषारी सर्पाने शेतकऱ्याच्या पायास चावा घेतला. ही बाब लक्षात येताच शेतकऱ्याने यावल येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी त्यांना घेवून जळगाव गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुसावळच्या तापीनदी पुलावर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने भुसावळातील डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन शेतकऱ्याला ‘जीवदान’ मिळाले आहे. सात दिवसाच्या उपचारानंतर शेतकरी समाधान वाघ यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने डॉ. मानवतकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे…

Read More

गावावर पसरली शोककळा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : नेपाळ येथील बस अपघातात मयत झालेल्या पुरुष-महिलांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील अंगणवाडी मदतनीस आशाबाई बाविस्कर यांचा समावेश होता. या घटनेमुळे सुकळी गावावर शोककळा पसरली होती. २३ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह सुकळी येथे आणण्यात आला होता. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. मयत आशाबाई यांना एक मुलगा अविनाश (वय ३०) हा सध्या पुणे येथे कंपनीत कामाला आहे. त्यांना दोन मुली आहे. त्यापैकी मोठी मुलगी अर्चना (वय ३३) तिचे लग्न झाले असून तिला आसोदा, ता.जळगाव येथे दिले आहे. दुसरी लहान मुलगी सुलोचना (वय २७) हिला सुनोदा येथे दिलेले आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आशाबाई यांचे पती…

Read More

पडक्या घरांचा नगर परिषदेने सर्व्हे करून नागरिकांना दिलासा द्यावा साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : शहरातील गजानन महाराज मंदिराजवळील साईचंद्र नगरमध्ये रविवारी, २५ ऑगस्ट रोजी तीन इमारती दुपारी कोसळल्याने शहरात खळबळ उडाली. मात्र, या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा प्रकरणाची नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन शहरातील मुख्य नागरी वसाहत व मार्गावरील धोकेदायक इमारती जमीनदोस्त करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे. सविस्तर असे की, सतारे शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळील साईचंद्र नगरमध्ये सततच्या पावसामुळे जमीनीचा भराव वाहुन गेल्याने दुपारी तीन वाजेदरम्यान भुसख्खनामुळे घरांची पडझड झाली. त्यात तीन रहिवाशी घरांचा समावेश होता. घराचे अंदाजे १५ ते २०…

Read More