Author: Sharad Bhalerao

जळगाव जिल्ह्यात ९१ कोटींचा निधी, अमळनेर मतदारसंघातही मोठी मदत: मंत्री अनिल पाटील यांची माहिती साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : जानेवारी ते मे २०२४ या चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात ९१ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. अमळनेर मतदारसंघातील अमळनेर आणि पारोळा तालुक्यात सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक २५ कोटींच्या आसपास मदत मिळणे सुरू झाले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ही मदत दिली जात आहे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांना…

Read More

पाचोरा तालुकाध्यक्षपदी गोवर्धन जाधव यांची नियुक्ती साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समाज भूषण पुरस्कार प्राप्त भानुदास आप्पा विसावे होते. बैठकीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या आदेशानुसार जिल्हा व पाचोरा तालुका कार्यकािरणी जाहीर करण्यात आली. पाचोरा येथे सुरू असलेल्या समाज मंदिराच्या कामासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आणि निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही श्री. विसावे यांनी समाज बांधवांना दिली. बैठकीत नूतन कार्यकारिणीच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी गोवर्धन देवचंद जाधव, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल नन्नवरे, तालुका सचिव मोतीलाल नारायण पवार, तालुका युवाध्यक्ष रमेश रामदास पवार, तालुका युवा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सीताराम पवार, तालुका युवा सचिव नंदलाल मोहन आगारे,…

Read More

तालुकाध्यक्षपदी गणेश वाघ तर सचिवपदी दत्तू अहिरे यांची निवड साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : येथील शासकीय विश्रामगृहात एकलव्य आदिवासी संघटनेची नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष सुधाकरराव वाघ होते. बैठकीत नवनिर्वाचित पाचोरा तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी संघटनेचे पाचोरा, भडगाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश नामदेव वाघ, तालुका उपाध्यक्ष प्रताप कृष्णा भील, तालुका सचिव दत्तू अहिरे, तालुका कार्याध्यक्ष संतोष हिरामण महाले, तालुका संघटक राजू कौतिक सोनवणे, तालुका संपर्कप्रमुख वसंत धुडकू भील, तालुका सल्लागार बबन देवराव मोरे, तालुका खजिनदार राजू गायकवाड, तालुका सहसंपर्क प्रमुख ईश्वर गुलाब ठाकरे, युवा तालुकाध्यक्ष गणेश अशोक भील, तालुका युवा…

Read More

झोडगाला जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात निवृत्ती तांबे यांचे प्रतिपादन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी: मातंग समाजातील युवकांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगीकारुन स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी एकजुटीने समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांचा त्याग करावा, असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांनी केले. झोडगा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विचार व्यक्त करताना ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा रविवारी, २५ रोजी १०४ वा जयंती उत्सव सोहळा झोडगा येथे पार पडला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हा संघटक मेजर शंकर आव्हाड, तालुकाध्यक्ष गणेश क्षीरसागर, एकनाथ आव्हाड, ग्रा.पं.सदस्य कडु कोऺगळे, कैलास मोरे, जनार्दन कोळंगे, समाधान आव्हाड, जगदेव वाघमारे,…

Read More

यशस्वी लोकांचे उदाहरणे देऊन करिअरसंदर्भात मार्गदर्शन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : येथील महालपुरे मंगल कार्यालयात महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखेतर्फे रविवारी गुणवंत, ज्ञानवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी यादवराव विठ्ठल सिनकर होते. यावेळी संस्कार वाणी मंचचे प्रमुख योगेश येवले होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन करून झाली. प्रास्ताविकात योगेश शेंडे यांनी डी.आर.कोतकर यांनी म.वा.युवा मंच राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतील फायदे, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना अभ्यासासोबत कौशल्य असणे महत्त्वाचे आहे, असे मनोगत व्यक्त केले. योगेश येवले यांनी समाज खेड्यातून शहराकडे, परदेशात स्थलांतरित होत असल्याची चिंता व्यक्त केली. प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी यशस्वी लोकांचे उदाहरणे देऊन…

Read More

श्वानाच्या मागोव्यात झाले स्पष्ट साईमत/सोयगाव /प्रतिनिधी तालुक्यातील घोसला शिवारात झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यासाठी सोमवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरचे श्वान पथक दाखल झाले. त्यामध्ये श्वान ‘जुलिया’ने घटनास्थळी चोरट्यांचा माग घेतला असता चोरटे एका शेतातून दुसऱ्या शेतातच शेडजवळ घुटमळत असल्याचे श्वान ‘जुलिया’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संशयित चोरटे हे परिसरातीलच असल्याचा अंदाज पोलिसांना आला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे. सोयगाव तालुक्यातील घोसला शेती शिवारात अनिल भिका बोरसे, ज्ञानेश्वर गवळी आणि सुभाष हरणे यांच्या शेतातील शेडमधील कुलुप तोडून एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगरचे श्वान पथक घोसला शिवारात दाखल झाले होते. यावेळी…

Read More

सोयगावच्या धारकुंड धारेश्वर येथील घटना साईमत/सोयगाव/प्रतिनिधी येथून जवळील धारेश्वर (धारकुंड) येथील धबधब्याखाली अंघोळ करत असताना पाय घसरून कुंडात पडल्याने एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि.२६) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. तरुणाचे नाव गजानन राघु माने (वय ३५, रा. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) असे आहे. श्रावण सोमवारनिमित्त गजानन दर्शनासाठी आला होता. दर्शनाआधीच त्याचा कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. वाडीसुतांडा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील धारकुंड धारेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत असतो. अत्यंत घनदाट जंगलात हे धार्मिक स्थळ आहे. पायवाटद्वारे येथे भक्तगण मोठ्या प्रमाणावर येत असतात. श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत…

Read More

दुसऱ्या बसमधील भाविकही घरी परतले…! साईमत/वरणगाव/प्रतिनिधी नेपाळ दुर्घटनेत सात जखमींना काल सायंकाळी मुंबईला आणले आहे. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर एक-दोन दिवसातच त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती काठमांडूच्या डॉक्टरांनी दिली आहे. चार वाजेच्या इंडिगो विमानाने मुंबईला पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे हे सर्वांच्या संपर्कात आहेत. दुसऱ्या बसमधील भाविकही घरी परतले आहे. काठमांडू येथे प्रशांत पाटील, अतुल झांबरे, गोलू पाटील, अमोल जावळे हे पूर्ण परिस्थिती कळवित आहे. मुंबईला केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करून त्यांना एक ते दोन दिवसात घरी पाठविले जाईल. राज्याचे मंत्री गिरीष महाजन मुंबई येथील व्यवस्था करीत आहेत. दुर्घटनेतील असे आहेत सात जखमी…

Read More

मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यासाठी शासन स्तरावरील सर्व विभागांसह अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून मदतकार्य केल्याने मृतदेह वेळीच आणण्यात यश मिळाल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला उत्तर काठमांडू (नेपाळ) कडे जाताना भीषण अपघात झाला होता. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस खोल नदीत कोसळून बसमधील २६ भाविकांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली. दुथडी भरुन वाहणाऱ्या नेपाळमधील नदीत काही भाविक…

Read More

११० कि.मी.च्या रस्त्यांसाठी चार कोटी; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधान साईमत/विशेष प्रतिनिधी/जळगाव एखाद्या लोकप्रतिनिधीला काम सांगताच ते कामच झाले आणि समस्या मार्गी लागली, असे उदाहरण सद्याच्या अस्थिर राजकारणामुळे दुर्मिळ म्हटले पाहिजे. पण लोकांच्या विश्वासाला खरे उतरून कायम दुर्लक्षित व अत्यंत दुरावस्था झालेल्या सुमारे ११० कि.मी. लांबीच्या शेतरस्त्यांसाठी आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांनी मनावर घेत शासनाच्या मदतीशिवाय मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सुलभता यावी म्हणून तब्बल चार कोटी रुपये स्वतः खिशातून खर्च करून शेतरस्ते दुरुस्तीचा धडाका लावून एक नवीन पायंडा पाडला आहे. आमदारांच्या अशा निर्णयामुळे रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी…

Read More