घटनेनंतर ट्रक चालक पसार, घटनास्थळी जमला मोठा जमाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी: जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी शहरातून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गानजीकच्या मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंपादरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भीषण अपघातात एक वर्षांचा चिमुरडा मुलगा जखमी झाला आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला आहे. सविस्तर असे की, शहरातील खोटेनगर परिसरातून मानराज पार्ककडे येणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतरतीवरून दोन्ही महिला ह्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून…
Author: Sharad Bhalerao
भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर कठोर कारवाईची मागणी साईमत/चोपडा/प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने आम आदमी पार्टी चोपडा शाखेतर्फे घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. विद्यमान सरकारने फक्त प्रसिद्धीसाठी देशातील कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे चोपडा तालुका आम आदमी पार्टीतर्फे घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दुर्दैवी घटनेला जबाबदार भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व मंत्र्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून गेल्या ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणनजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. तो पुतळा अवघ्या आठ महिन्यात म्हणजे २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा…
पाचव्या थरावर जाऊन सागर कोळी, नवल कोळी ठरले ‘गोविंदा’ साईमत/लोहारा, ता. पाचोरा/प्रतिनिधी : येथील बस स्टॉप परिसरात सालाबादप्रमाणे भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी गोपाळकाल्याचा (दहीहंडी) उत्सव साजरा करण्यात आला. सुरुवातीला ‘टेबल दहीहंडी’ फोडण्यात आली. ‘टेबल दहीहंडी’ फोडण्याचा बाल गोविंदाचा मान साई बापू चव्हाण याने मिळविला. उत्सवात येथील पोलीस, आर्मी भरतीचा सराव करणारे मुले तसेच गावातील विविध मंडळ, कुस्तीगीर पहिलवान ग्रुप स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. अथक प्रयत्नानंतर पाच थरांवर जाऊन सागर कोळी, नवल कोळी याने दहीहंडी फोडून ‘गोविंदा’चा मान मिळविला. लोहारासह परिसरातील लहान, थोर अबालवृद्ध दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. जय अंबिका डफ मंडळाने वाजंत्री वाजवून सर्व गोपाळांचा उत्साह…
काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन व्यक्त केला निषेध साईमत/चोपडा/प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने संबंधित घटनेला जबाबदार अधिकारीच नव्हे तर सरकारही आहे. त्यामुळे भारतीयांची मान शरमेने खाली झुकली आहे. महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणावर अपमान झालेला आहे. म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्यावतीने सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी निषेध मूक आंदोलन केले. यावेळी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,…
महायुती सरकारच्या निषेधार्थ हवेत सोडले ‘काळे फुगे’ साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे ‘महायुतीचे काळे कारनामे’ असा निषेध कार्यक्रम गटनेते संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. यावेळी संजय वाघ यांनी राज्यात झालेली आर्थिक विकासाची घसरण, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे संकट, कर्जमाफीचा उडालेला फज्जा, राज्यातील उद्योगांचे स्थलांतर, राज्यावर वाढते कर्ज दुष्काळावरील दुर्लक्ष, फसवी पीक योजना हे सगळे राज्य सरकारचे काळे कारनामे आहे. त्याचा निषेध करण्यात येत असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून…
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : येथील मकरंद नगर भागात २३ ऑगष्ट रोजी घरफोडी झाली होती. त्यामध्ये रोख रकमेसह किमान सहा लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी वरणगावच्या भाविकांसोबत मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे गाव चिंताग्रस्त होते. अशा परिस्थितीत चोरट्यांनी मात्र आपला हात साफ करून घेतला आहे. यामुळे मकरंद नगर व परिसरात खळबळ उडाली आहे. दुसऱ्या दिवशीही मकरंद नगर टु या भागात चोरटे आले होते. अशी चर्चा झाल्याने पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी संदीप वाघ यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मकरंद नगरमधील रहिवासी संदीप…
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयी मोहीम साईमत/जामनेर /प्रतिनिधी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत उपकेंद्र तळेगाव येथे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सर्वेक्षणाचे काम व स्वच्छतेविषयी मोहीम सुरू आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये डेंग्यू डासाबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी तळेगाव येथील दैनंदिन वापरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळीनाशक टाकून टाक्यांमधील डास अळ्या नष्ट करण्यात आल्या. यावेळी विक्रमसिंग राजपूत, आरोग्य सहाय्यक सुनील बोरसे, स्वप्निल महाजन, अनंत गंगातीरे, धीरज पाटील, हेमंत पाटील, आरोग्य सेविका दुर्गा जाधव, रंजना कांबळे, गीता माळी, आशा सेविका यांनी सहकार्य केले.
शिवसेना उबाठा आक्रमक, टक्केवारी राज्य सरकारने राजीनामा द्यावा : वैशालीताई सूर्यवंशी साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : राज्य सरकारला फक्त टक्केवारीत रस असल्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली. ही घटना वेदनादायी आहे. अशा घटनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘सरकारने राजीनामा द्यावा’ अशा घोषणा दिल्या. राज्य सरकारने आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या ३५ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही घटना दुदैवी आणि निंदनीय आहे. राज्य सरकारला फक्त टक्केवारीत रस असल्याने कुठे पैसे खावेत आणि…
राजकीय पक्षाच्या उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार साईमत/यावल/प्रतिनिधी : रावेर तालुक्यात सावदा कुलसुमबाई सभागृहात प्रहार जनशक्तीतर्फे आयोजित आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघासाठी प्रहार जन शक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू यांनी अनिल चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी, मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ.बच्चू कडू यांनी समाजात असलेली आर्थिक असमानता दूर झाली पाहिजे, असे प्रतिपादन केले. खासदार, आमदार प्राध्यापक, कलेक्टर यांना लाखो रुपये पगार तर ग्राउंड लेव्हलवर काम करणारे सर्व लोक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना मात्र अतिशय कमी पगार ही आर्थिक विसंगती आहे.…
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा सत्कार साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अंतर्गत उपकेंद्र नांद्रा येथे नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले, सीएचओ डॉ. गिरीष पाटील, डॉ. फिरोज शेख, डॉ.नामदेव पाटील उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने डॉ.राजेश सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा दिवाकर पाटील, माजी पोलीस पाटील आप्पासाहेब रघुनाथ पाटील, भगवान पाटील, नवल वाघ, संतोष गांगुर्डे यांनी शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.संदीप कुमावत, डॉ.मोहित कुमार जवरे, बशीर पिंजारी, आशा कुवटे, आरोग्य सहाय्यक दिनकर माळी, सोपान राठोड, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, गणेश पाटील,…