सोयगाव तहसिलचा कारभार खोळंबला साईमत/सोयगाव /प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीपूर्वी व बदली पात्र असलेल्या बारा महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, ‘त्या’ जागेवर केवळ एकच कर्मचारी रुजू झाला आहे. त्यामुळे सोयगाव तहसिलचा कारभार खोळंबला आहे. सोयगाव तहसिलचा एकही अधिकारी स्थानिक राहत नाही. तहसिलदारांसह सर्वच नायब तहसीलदार अपडाऊन करतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनचीही गंभीर स्थिती झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन वर्षे पूर्ण झालेल्या आणि बदलीस पात्र ठरलेल्या सोयगाव तहसिल कार्यालयातून तीन लिपिक, दोन अव्वल कारकून, एक मंडळ अधिकारी, सहा तलाठी अशा बारा महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहे. त्यांच्या जागेवर केवळ एकच लिपिक सोयगाव तहसील कार्यालयात रुजू झाला आहे. त्यामुळे कार्यालयीन महसूल…
Author: Sharad Bhalerao
८० श्रवण यंत्र, ६८ तीन चाकी सायकल, ३९ जणांना व्हीलचेअरचा समावेश साईमत/सोयगाव /प्रतिनिधी : शहरातील पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील २४० पात्र दिव्यांगांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे मागीलवर्षी दिव्यांगांची तपासणी केली होती. तपासणीत सोयगाव तालुक्यातील २४० दिव्यांग पात्र ठरले. भारत सरकार अंगीकृत अलिम्को संस्थेद्वारे २४० पात्र लाभार्थ्यांमध्ये सहा जणांना बॅटरीवर चालणारी सायकल, ६८ जणांना तीन चाकी सायकल, ३९ जणांना व्हीलचेअर, ८० जणांना श्रवण यंत्र तर ४७ जणांना वॉकिंग स्टिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सोयगाव गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, बाजार समितीचे…
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे मानले आभार साईमत/फैजपूर,ता.यावल/प्रतिनिधी : यावल तालुक्यातील पिंपरुड येथील यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी अनुदानित मुला-मुलींची आश्रमशाळा नुकतीच सुरू झालेली आहे. ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तक, निवासी जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे. या शाळेला दिल्ली शिक्षण विभागाकडून नुकताच ‘यु-डायस’ नंबर प्राप्त झालेला आहे. ‘यु-डायस’ नंबर प्राप्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री खा.रक्षा खडसे यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी आभार मानले आहेत. ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने अनुदानित शाळा सुरू केलेली आहेत. संस्थेचे…
अखेर रजिस्टर पोस्टाने पाठविले निवेदन साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशभरात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसोबत लैंगिक शोषणाच्या घटना सातत्याने घडत आहे. शाळेतही असा प्रकार घडल्यापासून १३ वर्षीय पीडितासह अनेक मुलींनी कायमची शाळा सोडून दिली. निवेदन घेण्यास शाळेचे युनूस नामक इन्चार्ज शिक्षकांनी घेण्यास नकार देणे ही खेदाची बाब आहे. त्यामुळे त्यांची असंवेदनशीलता व मनमानी स्पष्ट दिसून येते. निवेदनाची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी जळगाव, रावेर पं.स.चे गटशिक्षणाधिकारी यांना पाठविली आहे. संबंधितांवर काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील ॲंग्लो उर्दु हायस्कुलमध्ये महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती संघटनेचे सावदा शहराध्यक्ष फरीद शेख, रावेर तालुकाध्यक्ष युसूफ शाह हे २२ ऑगस्ट…
घोसलाला आदिवासी जयंती उत्साहात साजरी साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील घोसला येथे आदिवासी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण देशासह आदिवासी बहुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. घोसला येथे आदिवासी पारंपरिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य, तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी ‘कलाविष्कारांचे’ आदिवासी बांधवांकडून दर्शन घडविण्यात आले. यावेळी भव्य अशा मिरवणुकी दरम्यान ‘जय आदिवासी’, ‘बिरसा मुंडा की जय’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अश्या घोषणांनी परिसर दणाणला होता. मनमोहक दृश्य पाहण्यासाठी घोसला येथील नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला कन्नड येथील उद्योजक पवार यांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शनही…
शासकीय यंत्रणेचे काम शेतकऱ्यांच्या मारले जातेय माथी साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केल्यामुळे शेतकरी कामाला लागला आहेत. परंतु तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये नेटवर्क नसल्याने तसेच शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने ई-पीक पाहणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे अँड्रॉईड मोबाईलअभावी ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ‘डोकेदुखी’ ठरत आहे. तालुक्यातील सावळदबारा, सोयगाव, जरंडी, बनोटी अशा चारही महसूल मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यातच काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेल्या पिकांची पाहणी करण्याकरिता ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वे नंबर एकूण क्षेत्र पोट खराब क्षेत्र तसेच शेतातील पिके यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांनी…
एरंडोल महाविद्यालयात व्याख्यानमालेला मिळाला प्रतिसाद साईमत/एरंडोल/प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे डी. डी. एस. पी. महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्यावतीने चार दिवशीय “मानसमित्र” व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अमित पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. तेव्हाच ते स्वतःचे व समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी आयुष्यात जीवन कौशल्य करिअर प्लॅनिंग करताना खूपच उपयुक्त ठरतात, असे सांगितले. व्याख्यानमालेत ‘लाईफ स्किल आणि करिअर प्लॅनिंग’ विषयावर मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व नंदुरबार येथील जी. टी. पी. कॉलेज कॉलेज येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.…
जुनी पेन्शन योजनेसह अन्य मागण्या मंजूर न झाल्यास मूलभूत सेवा बंद करण्याचा इशारा साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेंशन योजना लागू करणेसाठी गुरुवारी, २९ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायतीमधील २००५ नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी केली नसून जुनी पेंशन योजना बंद केली आहे. त्यामुळे राज्य संवर्गातील जवळपास तीन हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील साठ हजाराच्यावर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे पाचोरा नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. जुनी पेन्शन योजनेसह अन्य प्रमुख मागण्या मंजूर न झाल्यास मूलभूत सेवा बंद करण्याचा इशारा…
चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात गुरुवारी, २९ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल-टेनिस, बॅडमिंटन अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे होते. त्यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पूजन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पी.एस.पाडवी यांनी क्रीडा साहित्याचे पूजन केले. यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पिकलबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू अंजली भूपेंद्र पोळ, जिनिषा संदेश क्षीरसागर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीश सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रवींद्र पाटी, सुधाकर बाविस्कर…
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.के.डी निमगडे, प्रा.जी जी अत्तरदे, प्रा.संजय क्षीरसागर, प्रा.दिनेश महाजन, प्रा.हर्षा दहिलेकर, सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा प्रा.सविता महाजन, क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.सोनुसिंग पाटील, प्रा.विजेता परदेशी, प्रा.वैशाली पाटील, प्रा.कांचन पाटील, प्रा.रुपाली पाटील, प्रा.पूजा पाटील आदी शिक्षक उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी करणारे मिताली मिस्तरी, जान्हवी पाटील, प्राची थोरात, सलोनी न्हावी (राज्यस्तरीय…