Author: Sharad Bhalerao

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शासनाचा व्यक्त केला निषेध साईमत/चोपडा/प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्यावतीने तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी, २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ‘जोडे मारो आंदोलन’ करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी चोसाकाचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, के.डी.चौधरी, प्रदीप पाटील, गोविंदा महाजन, शेख आरिफ शेख सिद्दिकी, नंदकिशोर पाटील, तुकाराम पाटील, शिवसेनेचे देवेंद्र पाटील, सुनील बडगुजर, कम्युनिष्ट नेते अमृतराव महाजन, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद, नेमीचंद जैन,…

Read More

संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दूचाकी रॅलीसह निघाली पालखी मिरवणूक साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : श्रीसंत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिर कृष्णापुरी येथे विठ्ठल रुख्मिणी, श्रीसंत सेना महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पूजन करुन स्थापना करण्यात आली. सकल नाभिक संस्थेच्या जागेवर आ.किशोर पाटील यांच्या आमदार निधीतून सभा मंडपाचे कार्य पूर्ण झाले. त्यानिमित्त सभा मंडपाचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. द्वारकाधीश नगर, कृष्णा रेसिडेन्सीजवळ जुना अंतुरी रोड येथून द्वारकाधीश नगर ते श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. दुपारी १२ वाजता आरती करून महाप्रसाद कार्यक्रम झाला. दुपारी पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ९ वाजता ह.भ.प. गोविंद महाराज, पाचोरेकर यांच्या…

Read More

जळगाव, दोंडाईचातील भाविकांचा असणार समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : धुळे तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने-कापडणे शिवारातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र कंजर महाराज यात्रेत दरवर्षी राज्यभरातील विविध भाविकांची गर्दी असते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी यात्रा आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याने यात्रेत जळगाव, दोंडाईचासह राज्यभरातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कंजर महाराज यात्रा भरते. यात्रेत दोंडाईचा येथील कंजरभाट समाज सेवा समितीचे राजन मलके, पूनम मलके, रमेश नेतले, रामलाल बाटुंगे, श्रीकांत मलके, अमर नेतले, सुरज तमायचे, करन तमायचे, गणेश ईंद्रेकर, महेंद्र नेतले यांच्यासह कंजरभाट समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

Read More

सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात १०० भाविकांच्या हस्ते ‘महाआरती’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्रावण महिन्यातील दर सोमवारी जागृत स्वयंभू महादेव मंदिरात आरती ठेवण्यात आली होती. जवळपास १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरती केल्याने पिंप्राळ्यातील सोनी नगरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. श्रावण सोमवारीच २ सप्टेंबर रोजी पोळा आल्याने भाविकांनी महादेवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून श्रावणमासाच्या उपवासाची सांगता केली. ‘बोल बम का नारा बाबा ऐक सहारा है’, ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’ च्या जयघोषाने भक्तीमय वातावरणात स्वयंभू महादेव मंदिरात पाचव्या श्रावण सोमवारी सकाळी साडे सात वाजता पाच जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महादेव मंदिरात नंदीदेवता व महादेवाच्या शिवलिंगाला पहाटे मधुकर ठाकरे, नरेश बागडे यांच्या…

Read More

उपाध्यक्षपदी संजय करंदे यांचा बिनविरोध निवडीत समावेश साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से. हायस्कुल पाचोरा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या अध्यक्षपदी पर्यवेक्षक ए.बी.अहिरे तर उपाध्यक्षपदी शाळेचे क्रीडा प्रमुख संजय करंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नियुक्तीनंतर पतपेढीच्या अध्यक्षा पी.एम. वाघ, सचिव आर. एल.पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड.महेश देशमुख, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, वासुदेव महाजन, शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी अभिनंदन केले आहे.

Read More

जेसीबीच्या साह्याने मिळाले ‘जीवदान’ साईमत/जामनेर/प्रतिनिधी: शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून अंडर ग्राउंड गटारी, साईड गटारी व कॉलनी भागातील ९ मीटर व १२ मीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी खड्डे, चिखल पसरला आहे. अशातच धनपुष्प कॉलनीतील साईनाथ नगर भागात काम सुरु आहे. साईड गटारीच्या कामासाठी चाऱ्या खोदून काँक्रीटचे ओतीव काम सुरु आहे. सोमवारी, २ सप्टेंबर रोजी सर्जाराजाचा पोळा सण असल्याने कॉलनीतील शेतकरी नाना चोपडे आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. नाना चोपडे यांनी आपले बैल कॉलनीत असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये चराईसाठी सोडले होते. रविवारी खांदबैलीच्या आणि पोळ्याची तयारी करण्यासाठी त्यांनी आपले बैल घराकडे हाकलले. त्यातील एक बैल गटारीवरून…

Read More

माजी पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार समर्थकांसह शिंदे शिवसेनेच्या गटात साईमत/पाचोरा/प्रतिनिधी येथील आमदारांच्या निवासी शिवालय शिवसेना कार्यालयात रविवारी भाजपला धक्का देत कार्यकर्त्यांसह पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांनी  शिवसेनेत घर वापसी केली. त्यांच्यासमवेत कोकडी तांडा, वडगाव जोगे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे, भोकरी, सावखेडा परिसरातील  कार्यकर्ते विविध क्षेत्रातील, पक्षातील आणि तांडातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यात नंजय मोहन राठोड, भूमेंद्रसिंग भिमसिंग राठोड, सचिन टेकचंद राठोड, दिनकर जगन चव्हाण, बालचंद हरी चव्हाण, विजय सोनसिंग राठोड, सोनसिंग काळू राठोड, निखिल टेकचंद राठोड, विकास अण्णा जाधव, राहुल आलासिंग राठोड, प्रशांत प्रेमसिंग राठोड, अनिल मखराम राठोड, विनोद मोरसिंग राठोड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आ.…

Read More

अमेरिकेतील मिशीगन येथील नॉर्थव्हिले येथे पार पडले पहिले लेवा संमेलन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : साता समुद्रापलीकडे ही आपली लेवा संस्कृती आपले लेवा बांधव टिकवून आहे, याचा खुप अभिमान वाटतो. त्याचा प्रत्यय आला अमेरिकेतील मिशीगन राज्यात असलेल्या नॉर्थव्हिले येथील लेवा समाज बांधवांच्या आयोजित केलेल्या पहिल्या संमेलनाच्या माध्यमातून लेवा समाजाचे अस्तित्व परदेशात टिकून राहत असून, समाजाची अस्मिता जपली जात आहे. अमेरिकेतील मिशीगन राज्यातील नॉर्थव्हिले येथील लेवा समाज बांधवांच्या आयोजनातून नुकतेच पहिले लेवा संमेलन उत्साहात पार पडले. एप्रिल २०१९ दरम्यान विशाल महाजन आणि नितीन नारखेडे यांनी मिशीगन लेवा समाजातील बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देश्यातून एक ग्रुप सुरू केला. एकेक करत ७-८ परिवारांचा ग्रुप आज ४० परिवारांच्या…

Read More

>> महाराष्ट्र सकल धोबी समाजाचा सर्वोच्च न्यायलयात जाण्याचा निर्णय साईमत/पुणे/प्रतिनिधी : देशात अठरा राज्यात धोबी जात सद्या सुद्धा अनुसूचित जातीत समाविष्ट असतांना महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६० मध्ये राज्यातील धोबी जातीला असलेले अनुसूचित जातीचे आरक्षण परस्पर हिसकावून घेण्यात आले,याविरुद्ध समाजाच्या संघटनांनी अनेक आंदोलने करून आवाज उठवला तरीही राज्यकर्त्यांनी धोबी जातीवर सातत्याने अन्याय झाला असून यापुढे सुद्धा राज्य सरकार व सामाजिक न्याय विभाग पूर्ववत असलेले आरक्षण देणारच नाही याची समाजाला खात्री झाल्याने आता यापुढे न्यायिक लढा उभारून राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब झाले. महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समितीची निर्णायक बैठक आज रविवार, १ सप्टेंबर रोजी…

Read More

ज्योती पावरा यांनी डॉ.चंद्रकांत बारेला यांना बांधली राखी साईमत/चोपडा/प्रतिनिधी : माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आणि पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांची राजकारणातील चाणाक्षता सर्वज्ञात आहे. मात्र, त्याप्रमाणे त्यांनी केलेली एक कृती त्यांच्या मानवीयतेचे प्रतीक ठरली आहे.एकाच कुटुंबातील दोन भावा-बहिणींच्या दुराव्याला त्यांनी दूर करण्याचा पुढाकार घेतला आणि एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे दोघा भाईंनी भावा-बहिणीतील कौटुंबिक कटुता संपविली आहे. याप्रसंगी वसंतभाई गुजराथी, आशिष गुजराथी, सुनील जैन, अतुल ठाकरे, सुनील पावरा, गोपाल सोनवणे, शशिकांत पाटील, इंद्रजित पाटील, किशोर दुसाने, अमोल राजपूत, सुरेश बारेला, सलीम तडवी आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा आणि डॉ.चंद्रकांत बारेला हे दोघेही सख्खे भावंड आहेत.…

Read More